अकोट तालुक्यात अवैध धंद्यांना ऊत, अनेकांचे संसार उद्धवस्त.. उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल सपशेल फेल..
RaviRaj 14 Feb 2025

अकोट तालुक्यात अवैध धंद्यांना ऊत, अनेकांचे संसार उध्वस्त
क्लब, वरली मटका, जुगार, गुटखा,अवैध दारू जोमात सुरू
क्लब,वरली माफीयांसमोर पोलीस प्रशासन हतबल
अकोट
मागील एक आठवड्यापासून हेल्मेट सक्तीच्या नावावर गोरगरिबांना वेठीस धरण्याचे काम अकोट पोलिस करीत आहेत दंडाची रक्कम वसूल करून स्वतःलाच शाबासकी देऊन पोलीस मात्र तोऱ्यात उभे आहेत परंतु हेच पोलीस अनेकांचे संसार उध्वस्त करणारे अवैध धंदे यांना मात्र प्रोत्साहन का देत आहेत असा प्रश्न आरपीआयचे तालुकाध्यक्ष दयानंद तेलगोटे यांनी उपस्थित केला आहे एखादे निवेदन दिल्यानंतर तात्पुरती देखावा म्हणून किरकोळ कार्यवाही केली जाते त्याचासुद्धा उहापोह अवैध धंद्यांच्या संबंधितच असलेल्या पत्रकारांकडून केल्या जाते भोळ्या जनतेला अवैध धंद्यांवर पोलिसांचा किती वचक आहे हे दाखवण्यासाठी एक-दोन पत्रकार सदैव पोलिसांच्या सेवेत तत्पर असतात आठ ते दहा दिवस तात्पुरते धंदे बंद करून पुन्हा नव्याने जागा बदलून अवैध धंदे जोमाने सुरू होतात. वरली, मटका, गुटखा, क्लब, जुगार, अवैध दारू असे अनेक अवैध धंद्यांनी अकोट तालुका माखलेला आहे हे माफिया गोरगरिबांची आर्थिक पिळवणूक करीत असून असंख्य वेदना देत ओरबडत आहेत अशा अवैध धंद्यांमध्ये काही पत्रकारांची सुद्धा भागीदारी असल्यामुळे पोलीस प्रशासन हतबल झाले आहे त्यामुळे पोलीस आणि माफियांमध्ये खूप मोठे प्रबळ आर्थिक साठे लोटे असल्यामुळे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद होण्याची शक्यता कमी आहे
उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल यांनी तर हद्दच करून टाकली दयानंद तेलगोटे यांनी अवैध धंदे बंद करण्याबाबत मित्तल यांना विनंती केली असता आपणच चालू असलेल्या अवैद्य धंद्याची माहिती आम्हाला द्यावी त्यानंतर आम्ही कारवाई करणार असे उत्तरच तेलगोटे यांना दिले आहे त्यामुळे शहर आणि ग्रामीणचे दोन्हीही ठाणेदार अमोल माळवे व किशोर जुनघरे यांच्याकडून काय अपेक्षा करणार म्हणूनच दयानंद तेलगोटे यांनी आक्रमक पवित्रा घेत वरिष्ठांना निवेदन देऊन तात्काळ कायमस्वरूपी सर्व अवैध धंदे बंद न झाल्यास अनमोल मित्तल यांच्या कार्यालयासमोर शेकडो कार्यकर्त्यांसह धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे..