अकोट उपविभागातील सर्व कत्तलखाने बंद करण्यात यावे अन्यथा जेल भरो आंदोलन करण्यात येईल..उपविभागीय पोलीस अधिकारी यांना दिले निवेदन..
Sanjay Shelke 9 July 2024
गौहत्या कायद्याला काळीमा फासणारे हे फक्त कत्तलखाना पुरते मर्यादित नसून यांच्यावर कठोर कारवाई न करणे म्हणजेच एक प्रकारचे याला प्रोत्साहन देण्यासारखे आहे अशीच एक गंभीर घटना तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथे झाली आहे.. गौहत्या थांबवण्याकरिता शासनाचे सर्व स्तरावर प्रयत्न सुरू आहेत त्यासाठी अनेक कठोर कायदे सुद्धा केले आहेत परंतु त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही त्यामुळे अनेक समाजसेवी संस्था गौहत्या हद्दपार करण्यासाठी पुढाकार घेताना दिसत आहेत त्यामध्ये गोवंश पकडून दिल्याच्या संशयामुळे हिवरखेड येथील विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे कार्यकर्ते रवींद्र गावंडे यांच्यावर अचानक सहा लोकांनी हल्ला केला त्यामध्ये गावंडे यांना जबर मारहाण झाल्यामुळे हल्ला करणारे आरोपी फिरोज खान ,आझाद खान, रशीद खान व इतर तीन यांच्यावर हिवरखेड पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले.. गोहत्या करणारे व कत्तलखाने चालवणाऱ्यांची एवढी मजल वाढली आहे की खुन्नस ठेवून मारहाणीत संशय घेऊन जीवघेणा प्रकार सुद्धा सुरू आहे त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बाबत खूप मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे असे निवेदन विश्व हिंदू परिषद तसेच बजरंग दल आकोट यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल यांना दिले आहे
सोबतच अकोट उपविभागातील मोहाळा ,अकोलखेड, मुंडगाव, हिवरखेड ,अडगाव, तळेगाव ,पंचगव्हाण ,रेल धारेल, दहीहंडा या परिसरात गोमांस विक्री होताना दिसून येत असून खूप मोठ्या प्रमाणात अवैध गोवंश कत्तलखाने सुरू असल्याचे विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांनी अनमोल मित्तल यांना ठासून सांगितले..व यापुढे पोलिसांनी अशा गोहत्या करणारे व खुलेआम कत्तलखाना चालवणाऱ्यांवर कठोर पावले उचलली नाहीत तर गोवंश कत्तल गोमांस विक्री वाहतूक विरोधात जिल्ह्यातूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून जेलभरो आंदोलन करण्यात येईल..असा इशारा विश्व हिंदू परिषद व बजरंग दल अकोट यांच्याकडून अकोट पोलीस प्रशासनाला देण्यात आला आहे..