अकोट व अकोला पूर्व मतदार संघावर कंत्राटदारांचे वर्चस्व.! बांधकाम विभाग सुद्धा हतबल..
Chanchal pitambarwale 31 Dec 2024
मागील दोन दिवसापासून अकोला भाजप कार्यकारणी मधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आलेला आहे त्यामध्ये स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे यापुढील होऊ घातलेल्या नगरपरिषद व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये याचा फटका भाजपला नक्की बसणार हे निश्चित?
सोबतच अकोट व पूर्व मतदार संघामध्ये रस्ते बांधकामांमध्ये अमर्यादित भ्रष्टाचार हा बोकाडल्यामुळे नागरिक सुद्धा संतप्त झालेले आहेत
अकोट वरून कालवाडी मार्गे पूर्व मतदार संघाला जोडणारा रस्ता हा अतिशय निकृष्ट दर्जाचा होत आहे या रस्त्यावर चक्क मुरुमाच्या जागी मातीचा वापर करण्यात येत आहे पाणी मारून दबाई सुद्धा करण्यात येत नाही कोणतेही प्रकारचे फलक या रस्त्यावर बांधकाम विभागाने लावलेले नाही दोन्हीही मतदारसंघातील आमदारांनी या रस्त्याच्या कंत्राटदारांना मोकाट सोडून दिले आहे त्यामुळे कंत्राट दारावर कोणताही वचक नसल्यामुळे मनमानी कारभार सुरू असल्याचा दावा समस्त गावकऱ्यांकडून केल्या जात आहे
आमदारांनी मनात आणले तर कमीत कमी दहा वर्षे तरी रस्त्याला खड्डा पडू शकणार नाही परंतु आमदार व बांधकाम विभागाचे अधिकारी सोबतच कंत्राटदार यांचे आर्थिक हितसंबंध असल्यामुळे कंत्राट दारावर कुणीही वचक ठेवू शकत नाही असे अनेक आरोप कालवाडी, खापरवाडी, वरुड जऊळका येथील नागरिकांनी केले असून या रस्त्यांचा दर्जा सुधारा अन्यथा रास्ता रोको करून धरणे आंदोलन सुद्धा करण्यात येईल असे आवाहन सर्व शेतकऱ्यांनी केले आहे