अकोट मतदार संघाचा विकास की भकास.. आमदार व नगरपरिषदेच्या राजकीय खेळात जनतेचा मात्र बळी..
RaviRaj 14 June 2024
मागील बरेच दिवसापासून अकोट नगरपरिषद चा भोंगळ कारभार चव्हाट्यावर येताना दिसतो आहे.. त्यामध्ये विशेषता अग्निशमन दलाचा फारच मोठा वाटा आहे.
अकोट नगरपरिषद चा मुख्याधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यापासून डॉ.नरेंद्र बेंबरे यांचा कार्यकाल हा अकोटकरांना आश्चर्यचकित करणारा आहे..नगरपरिषदेच्या भव्य इमारतीचे उद्घाटन प्रसंगी नरेंद्र बेंबरे हे मुख्याधिकारी नसून आमदार प्रकाश भारसाकळे यांचे जणू खिशातील कार्यकर्ते असल्यासारखे वागत असल्याचे दिसून आले..आमदार भारसाकळे यांच्या कार्यपद्धतीबद्दल स्तुतीसुमने भर स्टेजवर बेंबरे यांच्याकडून संपता संपत नव्हते..त्यामुळे मुख्याधिकारी नरेंद्र बेंबरे हे प्रकाश भारसाकळे यांचे दत्तक पुत्र तर नाहीत ना..अशी शंका अनेक उपस्थितांच्या मनात येत होती.. प्रकाश भारसाकळे यांनी एकाच महिन्यात नवीन तहसील, ग्रामीण रुग्णालय, तसेच नगरपरिषद नवीन इमारत अशी उद्घाटने घाई घाईने उरकून टाकले.. त्याकरिता कॅबिनेट मंत्री विखे पाटील यांना सुद्धा अकोट मतदार संघातील “कधी न झालेला व यापूर्वी आकोटकरांनी न पाहिलेला विकास” दाखवण्यासाठी विद्यमान आमदाराचा खटाटोप सुरू होता.. परंतु याचा काहीच उपयोग लोकसभा निवडणुकीत झालेला दिसत नाही..
अकोट नगर परिषदेचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न म्हणजे भरपूर वर्षापासून प्रलंबित असलेला अग्निशमन वाहनाचा आहे ..परंतु या समस्येकडे आ. भारसाकळे यांच्या अतिशय विश्वासातील व जवळचे समजले जाणारे डॉ नरेंद्र बेंबरे यांनी सतत दुर्लक्ष का केले ? एवढ्या मोठ्या तालुक्याला सुरक्षा देणारी अग्निशमन वाहनाची समस्या विकास पुरुष आ.भारसाकळे यांच्या माध्यमातून निकाली का काढल्या गेली नाही.. नरेंद्र बेंबरे यांचा पाठपुरावा कमी पडला का? ..की विकास पुरुष प्रकाश भारसाकळे यांना शहरातील आगीवर नियंत्रण आणायचेच नाही ?
किंवा आग लागल्यावर त्याचेही राजकारण आमदाराला करायचे आहे का ?..त्याची वाट आ.भारसाकळे पाहत आहेत का ? नगरपरिषदेमध्ये उपलब्ध असलेले जुने अग्निशमन वाहन हे सुद्धा मागील एक ते दीड महिन्यापासून नादुरुस्त आहे..आगीची एखादी घटना घडल्यास तेल्हारा किंवा आजूबाजूच्या तालुक्यातून आग 🔥 विजवण्याकरिता अग्निशमन वाहन बोलवावे लागते तेही वेळेवर येत नसून खूप मोठी जीवितहानी किंवा नुकसान झाल्यावरच पोहोचण्याची शक्यता असते.. नवीन अग्निशमन वाहन तर सोडाच परंतु जुने वाहन दोन महिन्यापासून दुरुस्त सुद्धा नरेंद्र बेंबरे करू शकले नाहीत..
अग्निशमन वाहनाचे दुरुस्तीच्या वस्तू ह्या कोल्हापूर वरून येणार असल्याची माहिती इंडिया न्यूज च्या टीमला मिळाली..आता कोल्हापूर वरून दुरुस्तीच्या वस्तू ह्या अकोटला चालत येत आहे की..धावत ! हा खूप मोठा गंभीर प्रश्न अकोट करांना पडला आहे कारण दोन महिन्यापासून अग्निशमन वाहनाला लागणाऱ्या दुरुस्तीच्या वस्तू अजूनही अकोट नगरपरिषद मध्ये पोहोचलेल्या नाहीत व पुढील काळात किती महिन्यात व किती वर्षात पोहोचेल याची सुद्धा निश्चिती नाही..त्यामुळे वाहन दुरुस्तीच्या नावावर हा जनसामान्याचा विश्वासघाताचा खेळ रंगलेला आहे का? हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे..दहा वर्षात आकोट मतदार संघाचे विकास पुरुष- विकास महर्षी संबोधल्या जाणारे विद्यमान आ. भारसाकळे यांनी अत्यंत महत्त्वाचा व गंभीर प्रश्न असलेल्या अग्निशमन वाहनाकडे दुर्लक्ष कसे काय केले.. एवढे सर्व उद्घाटने करण्यापेक्षा हा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागावा असे आमदाराला वाटले नाही का..
की मतदारसंघाप्रमाणेच मंत्रिमंडळात सुद्धा आ. प्रकाश भारसाकळे यांचे अस्तित्व शून्य तर नाही ना? असे अनेक प्रश्न आकोट करांना भेडसावणारे आहेत.. तसेच या माध्यमातून अजून कोणती राजकीय खेळी आ.भारसाकळे व नरेंद्र बेंबरे यांच्याकडून खेळल्या जाणार आहे ..त्याची वाट अकोट मतदार संघातील सर्व सुज्ञ जनता बघत आहे