अकोट : येथील दंगल मधील मुख्य आरोपी असलेला जाकीर शाह रशीद शाह यांने पुन्हा एकदा चोहोट्टा बाजार येथील व्यावसायिक नंदू राणे यांना शेतीच्या वादातून जीवे मारण्याची धमकी…
चोहोट्टा बाजार: अकोट येथील दंगल मधील मुख्य आरोपी असलेला जाकीरशाह रशीदशाह यांने अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार येथील नंदू राणे यांच्या शेत जमिन हडप करण्यासाठी अनेक गुंडांकडून जाकीर शाह यांने जीवे मारण्याची धमकी देऊन नंदू राणे यांना आत्महत्येला प्रवृत्त करीत सतत मानसिक त्रास देत आहे… नंदू राणे या प्रकाराची तक्रार लवकरच अकोला पोलीस अधीक्षक यांच्याकडे दाखल करणार..
D.n.mandve 16 Oct 2022
चोहोट्टा बाजार : येथील हॉटेल व्यवसायिक नंदू राणे यांनी 2009 मध्ये हसनूर बी पिता हैदरशा यांच्याकडून ३८ आर शेत जमीन खरेदी केली नियमानुसार सर्व व्यवहाराची देवाणघेवाण झाली महसूल रेकॉर्डमध्ये नंदू राणे यांची नोंद झाली असून सातबारा तयार झाला व सर्व दप्तरी नोंद नंदू राणे यांची मालमत्ता नियमानुसार असल्यावरही अकोट दंगल मधील मुख्य आरोपी असलेला जाकीर शाह रशीद शाह यांने हैदरशा यांच्यासोबत असलेले पन्नास वर्षांपूर्वीचे काही किरकोळ नाते व कागदपत्रे सादर करून मा. न्यायालय अकोट येथे नंदू राणे यांच्या विरोधात राणे यांची शेती हडपण्यासाठी २०१२ केस दाखल केली परंतु एवढ्यावरच जाकीरशाह रशीद शाह याचे समाधान झाले नाही व मा. न्यायालयाच्या निर्देशाची वाट न पाहता विद्यमान न्यायालयाला न जुमानता जाकीर शाह यांने नंदू राणे यांच्यावर अनेक गैरमार्गाने मागील दहा वर्षापासून अनेक गुंडांकडून सेटलमेंट च्या नावावर नंदू राणे यांना जीवे मारण्याची धमकी देणे खोट्या केसेस दाखल करणे खंडणी मागणे नंदू राणे च्या सर्व परिवारास जीवे मारून टाकण्याची धमकी देणे अशा स्वरूपाची दादागिरी करून वारंवार पोलीस प्रशासनाकडून तडीपारीचे आदेश असून सुद्धा जाकीरशाह रशीद शाह यांनी पुन्हा एकदा गुंड प्रवृत्तीचे दर्शन घडवले आहे. नंदू राणे यांनी जाकीर शाह रशीद शाह यांच्या मागील दहा वर्षापासून च्या सततच्या मानसिक त्रासामुळे आत्महत्येचा प्रयत्न सुद्धा केला आहे त्यामुळे नंदू राणे व त्यांचे कुटुंब जाकिर शाह रशीद शाह यांच्या दहशतीखाली जगत आहे. विद्यमान कोर्टामध्ये या प्रकरणाची केस सुरू असताना देखील विद्यमान न्यायालयाचा सतत अपमान हा जाकीरशाह रशीदशाह याच्याकडून होत असताना दिसत आहे तसेच जाकीर शाह रशीद शाह हा प्रकरण न्यायप्रविष्ट असताना सुद्धा नंदू राणे यांच्या नावावर असलेली शेती परस्पर विकण्याचा प्रयत्न करीत आहे अशी शहरांमधील मोठ्या व्यवसायिकांमध्ये चर्चा होताना दिसत आहे नंदू राणे यांनी इंडिया न्यूज च्या माध्यमातून माझे मौजे टाकळी येथील गट नंबर 37 असलेले शेत कोणीही विकत घेऊ नये या शेतावर जाकीरशाह सोबत केलेला व्यवहार हा गैर कायदेशीर ठरेल असे आवाहन केले आहे व जाकीर शाह रशीद शाह याच्या विरोधात लवकरच सविस्तर तक्रार ही जिल्हा पोलीस अधीक्षक अकोला, गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, व मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, यांना देऊन मला जाकीर शाह रशीद शाह याचा मानसिक त्रास कमी न झाल्यास लवकरच मी अकोला जिल्हा अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसेल असे जाहीर आवाहन पीडित असलेले नंदू राणे यांनी केले आहे…