INDIA NEWS

Press

अकोटच्या दिव्यांग धिरजची श्रीनगर ते कन्याकुमारी सायकल वारी मंगळवारी नागपुरात पोहचणार!

RaviRaj 6 March 2023

अकोटचा दिव्यांग धीरज कळसाईत नागपुरात पोहोचणार

अकोटः एक हात व पाय नसतांनाही आत्मविश्वास, जिद्द व चिकाटीच्या भरवशावर दिव्यांगत्वावर मात करत २३ वर्षीय धीरज बंडू कळसाईत या युवक काश्मीर ते कन्याकुमारी सायकलींग १ मार्च रोजी श्रीनगर -काश्मीर लालचौक येथून सुरु केली आहे. उद्या ७ मार्च रोजी सकाळी तो नागपुरात पोहचणार आहे.
धीरजने काश्मिर ते कन्याकुमारी हे ३६५१ कि.मी.चे अंतरापैकी १,७५० किमी अतंर पार केले आहे. त्याच्या विक्रमाची नोंद व्हावी अशी प्रार्थना अकोट शहरातील नागरीक करीत आहेत.रेस अक्रॉस इंडिया या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. धीरज हा महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील अकोट येथील रहिवाशी असून काश्मिर ते कन्याकुमारी हे ३६५१ कि.मी.चे अंतर अवघ्या काही दिवसात कापून गिनीज बुकात त्याच्या विक्रमाची नोंद व्हावी असे ध्येय उराशी बाळगुण आहे. त्याच्या या मोहीमेत अनेकांनी मदतीचा हात देत धीरजचे मनोबल वाढविले असून दिव्यांग क्षेत्रात सायकलींग करणारा सोलो स्पर्धेतील धीरज हा कदाचित पहिला भारतीय ठरणार आहे.

श्रीनगर ते कन्याकुमारी सायकलिंग करताना दिव्यांग धीरज कळसाईत

अकोट येथील धीरज कळसाईत याने या मोहीमेत सहभागी होण्यापूर्वी दररोज ३०० कि.मी. सायकलींगचा सराव केला आहे. श्रीनगर मधुन निघालेल्या या सायकलींग स्पर्धेत धीरज भारतातील जवळपास ११ राज्य व २५ महत्वपूर्ण शहरातून जाणार आहे. एकर हाताची बोटं व एक पाय नसतांना सायकलींग करीत सुसाट्याचा वारा, खडतर मार्ग व आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न डोळ्यात घेऊन नेत्रदपक कामगिरीकरिता निघाला आहे. दररोज रात्रंदिवस
सायकलींग करित असतांना धीरजवर थेट सॅटेलाईट तसेच इतर यंत्रणेव्दारा लक्ष ठेवल्या जाणार आहे. धीरजच्या या मोहीमेत लोकजागर सह विविध शहरातील दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात देत दिव्यांगाचे स्वप्न पूर्ततेकरिता सहकार्य केले आहे. या मोहीमेत संपूर्ण भारतातून जलदगतीने सायकलींग करणारे विविध क्षेत्रातील स्पर्धक सहभागी झाले आहेत.

मात्र एक हात आणि पाय नसलेला महाराष्ट्रातील धीरज कळसाईत हा एकमेव स्पर्धक आहे. धीरज सोबत या स्पर्धेत सहाय्यतेकरिता टिम लिडर म्हणून राजीक अली याचेसह अर्चना गडधे, विशाल सुभेदार व प्रफुल्ल गिरी सोबत आहेत. श्रीनगर ते कन्याकुमारी हे अंतर ३६५१ कि.मी.चे अंतर १० दिवसात पूर्ण करण्याचा संकल्प केल्याचे धीरज
कळसाईत याने सांगितले. धीरज कळसाईत च्या कुटूंबाची आर्थिक स्थिती हलाखीची असून आई, वडील,भाऊ, बहिण हे मजूरी करुन उदरनिर्वाह चालवितात. धीरज ने आर्थिक संकटाला तोंड देत बारावी विज्ञान शाखेचे शिक्षण पूर्ण केले आहे. धीरज ला
जन्मापासून डावा हात मनगटापासून नाही तर अपघातात त्याचा एक पाय निकामी झाला आहे. असे असले तरी धीरजने यापूर्वी सुध्दा महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाईसह इतर शिखर, गडकिल्ले सर केले आहेत. आंतरराष्ट्रीय गिर्यरोहक म्हणून धीरजने रशिया मधिल हिम शिखर माऊंट एल्ब्रुज व दक्षिण ऑफ्रीकेतील माऊंट किलीमंजारो हे हिमशिखर सर करुन भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा फडकविला आहे. राष्ट्रभक्ती व राष्ट्रप्रेम दर्शविणाऱ्या धीरजच्या या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish