INDIA NEWS

Press

अकोट:पुन्हा जाकीर शाह रशीद शाह याचे गुंड प्रवृत्ती व दहशती मुळे निष्पाप गोरगरिबांचा बळी..

D.k.mandve 3 Nov 2022

जाकीर शाह रशीद शाह
पीडित दुर्गाप्रसाद विश्वकर्मा

अकोट: मागील काही दिवसापासून शहरातील अमीनपुरा रहिवासी जाकीर शाह रशीद शाह यांच्या गुन्हेगारीचा पाढा संपत नाही तोच पुन्हा एकदा निष्पाप गोरगरिबांवर जागा खाली करण्याच्या नावावर जबरदस्तीने मारहाण करून त्यांच्या सामानाची तोडफोड करून रात्री बे रात्री निराधार निष्पाप लोकांना बेघर करण्याचे काम जाकीर शाह रशीद शाह याच्या कडून सतत सुरू आहे.

13 ऑक्टोबर 2022 रोजी महिला शिक्षिका यांनी जाकीर शाह विरुद्ध नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून ४ लाख रुपयांची लुबाडून केली आहे अशी सविस्तर तक्रार अकोट शहर पोलीस स्टेशनला दिली आहे. त्याचप्रमाणे सततचे धमकी सत्र गुंड प्रवृत्ती दहशत व मानसिक दबाव अशा अनेक दबाव तंत्राला कंटाळून जाकीर शाह रशीद शाह यांच्याविरुद्ध चोहोट्टा बाजार येथील व्यावसायिक नंदू राणे यांनी सुद्धा दहीहांडा पोलीस स्टेशनला सविस्तर तक्रार नोंदवली आहे. अजूनही शहरातील अनेक लोकांकडून जाकीर शाह रशीद शाह यांने लाखो रुपयांनी गंडा घातलेला असून अनेक लोकांवर मानसिक दबाव व दहशत निर्माण केली आहे याबाबतीत येणाऱ्या दोन दिवसात जाकीर शाह रशीद शाह विरुद्ध अनेक तक्रारी अकोट शहर पोलीस स्टेशनला नोंद होतील त्यामध्ये अजून एक पीडित महिला आहे जाकीर शाह यांने चेक देऊन अनेक महिला वर्गातील व गोरगरीब यांच्याकडून पैसे उकळले आहेत तसेच लक्कडगंज अकोट येथे मागील 70 वर्षापासून राहत असलेले आसाराम दुर्गाप्रसाद विश्वकर्मा व त्यांचे चार भावांचे संपूर्ण कुटुंब असा दहा ते पंधरा लोकांचा परिवार वास्तव्यास होता परंतु कोरोना काळामध्ये शहरांमध्ये अथांग शांतता पसरलेली असताना सुद्धा दि.३/५/२०२० रोजी रात्री एक वाजताच्या सुमारास जाकीर शाह रशीद शाह व ८० गुंड यांनी अचानक विश्वकर्मा यांच्या संपूर्ण परिवारावर हल्ला करीत त्याच्या कौटुंबिक सामानाची तोडफोड करून मारहाण केली विश्वकर्मा कुटुंबाकडून जाकीरशाह रशीद शाह याला कुटुंबातील वयस्कर महिला व मुलांना मारहाण करू नये याकरिता हात जोडून विनंती आसाराम विश्वकर्मा यांनी केली असता परंतु निर्दयी व जागेच्या हव्यासापोटी क्रूर असलेले जाकीर शाह व त्याचे गुंड मारहाण करीत राहिले व गाढ झोपेत असताना अचानक हल्ला झाल्यामुळे विश्वकर्मा कुटुंबाला शंभर गुंडांच्या मदतीने जाकीर शाह ने काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून विश्वकर्मा परिवाराला बेघर केले.

त्यांना जबरदस्तीने तिथे ६० वर्षापासून वास्तव्यास असलेले संपूर्ण विश्वकर्मा कुटुंब अचानक रस्त्यावर आले एवढा सर्व प्रकार सुरू असताना लक्कडगंज हा शहरातील भाग अतिशय संवेदनशील असताना सुद्धा विश्वकर्मा कुटुंबाला कुणाचीही मदत मिळाली नाही हा प्रश्नचिन्ह उपस्थित होतो आहे विश्वकर्मा कुटुंबाकडे त्या जागेची गेली ६० वर्षातील इलेक्ट्रिक बिल, कर पावती असे अनेक प्रकारचे पुरावे असताना सुद्धा व हे प्रकरण न्यायालयीन व दिवाणी स्वरूपाचे असल्यावरही अचानक एका रात्रीत जाकीरशाह रशीद शाह यांने काही अधिकाऱ्यांच्या मदतीने या गरजू गोरगरीब निराधार असलेल्या विश्वकर्मा परिवाराला कोणताही मोबदला न देता रस्त्यावर आणले आहे.

बेलगाम झालेल्या जाकीर शाह याच्यावर कायद्याचा कुठलाही वचक राहिलेला दिसत नाही विश्वकर्मा कुटुंबावर झालेल्या संपूर्ण प्रकाराची आसाराम दुर्गाप्रसाद विश्वकर्मा हे सविस्तर फिर्याद नोंदवून तात्काळ निष्पक्ष या प्रकरणाची चौकशी करावी अशा प्रकारची तक्रार अकोट शहर पोलीस स्टेशन, पोलीस अधीक्षक अकोला व गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना देणार आहेत. तसेच विश्वकर्मा यांना न्याय न मिळाल्यास लकडगंज आकोट येथील त्याच जागेवर आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास गैर कायदेशीर मार्गाने विश्वकर्मा कुटुंबाला मारहाण व जबरदस्तीने बेघर केले व या कट कारस्थान मध्ये जाकीर शाह सोबत अजून कोणते बडे नेते व अधिकारी सामील आहेत की शहरातील मोठे व्यावसायिक याचा उलगडा नक्कीच होईल..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish