INDIA NEWS

Press

अखेर अवैध धंद्यांवर अंकुश !

Salim Khan 30 May 2025

अकोट तालुक्यातील जोमात सुरू असलेले अवैध धंदे वरली, मटका, जुगार, क्लब, हे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी मी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, पोलीस महासंचालक मुंबई, विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती, जिल्हाधिकारी अकोला व अकोल्याचे नवनियुक्त पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांना निवेदन दिले त्यामध्ये अकोट विभागातील सात दिवसात संपूर्ण अवैध धंदे कायमस्वरूपी बंद न केल्यास पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर या अवैध धंद्यामुळे पिडीत असलेले हजारोंच्या संख्येने माझे बांधव आणि भगिनी सह ठिय्या आंदोलन करणार असल्याचे निवेदनाद्वारे स्पष्ट केले असून अवैध धंद्यांचे सर्व व्हिडिओ व इतर पुरावे पोलीस अधिक्षक चांडक यांच्यासमोर सादर केले आहेत विशेषता अकोट हिवरखेड रोडवरील व उमरा बिटमध्ये येणारा ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत धरम काट्यावर जोमात सुरू असलेली वरली, तसेच तालुक्यातील सर्वात मोठी दररोज लाखो रुपयाची उलाढाल सुरू असलेल्या अकोट अंजनगाव रोडवरील जुगार क्लब सबळ पुरावे सादर केले आहे त्यामुळे तात्काळ अकोट विभागातील सर्व अवैध बंद ठेवण्याचे आश्वासन पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांनी दिले आहेत

रविराज मोरे पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ता

पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांचा अवैध धंदे माफियांना दणका

वरली, मटका, जुगार, क्लब, सर्व अवैध धंदे बंद, थेट कारवाईचे आदेश

अखेर रविराज मोरे यांच्या प्रयत्नाला यश, थेट संपर्क करण्याच्या सूचना

अकोट शहराची संवेदनशील ही ओळख पुसण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार रविराज मोरे हे मागील सहा महिन्यापासून वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करीत आहेत शहरातील वातावरण खराब करून संवेदनशील होण्यासाठी वरली, मटका, जुगार, क्लब व इतर सर्व अवैध धंद्यातून मिळवलेल्या दोन नंबरच्या काळ्या पैशातून हे सर्व समाजविघातक प्रकार केले जातात त्यामुळे अकोट मधील वारंवार दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण होण्यासाठी अवैध धंदे व्यवसायिक अप्रत्यक्ष जबाबदार आहेत तसेच हे धंदे फोफावण्याकरीता पोलीस प्रशासनातील काही भ्रष्ट अधिकारी यांच्याकडून सुद्धा प्रोत्साहन दिल्या जात आहे या सर्व प्रकारामुळे अकोट विभागातील जनता मात्र भरडल्या जात आहे

या गुंड प्रवृत्तीच्या माफियांच्या विरोधात रविराज मोरे यांनी चांगलाच एल्गार पुकारला आहे त्यामध्ये कधी बातम्यांच्या माध्यमातून तर कधी आंदोलनाच्या माध्यमातून मोरे यांनी जनहिता करिता पाठपुरावा केला आहे यादरम्यान अवैध धंदे करणाऱ्या टोळीने मोरे यांच्यावर प्राण घातक हल्ला सुद्धा केला सोबतच खोटे गुन्हे दाखल केले परंतु रविराज मोरे यांनी हताश न होता पुन्हा जोमाने हा लढा उभा केला असून नव्यानेच रुजू झालेले अकोला येथील पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांच्यासमोर संपूर्ण पुराव्यानिशी अवैध धंदे माफीयांचा पाढाच वाचला या संवेदनशील प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ पोलीस अधिक्षक चांडक यांनी सर्व अवैध धंदे यापुढे कायमस्वरूपी बंद होतील असे आश्वासन रविराज मोरे यांना दिले असून गौहत्या कायद्याची कठोर अंबलबजावणी व इतर अनेक वेगवेगळ्या विषयावर मोरे यांच्या टीम सोबत चांडक यांनी विस्तृत चर्चा केली सोबतच यापुढे अवैध धंदे सुरू असल्याची माहिती थेट माझ्या मोबाईलवर संपर्क करून मला द्यावी अशा सूचना सुद्धा चांडक यांनी दिल्या आहेत

त्यामुळे अकोला जिल्ह्याला अर्चित चांडक यांच्या माध्यमातून बेधडक निर्णय क्षमता असणारा पोलीस अधिक्षक मिळाल्याचे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे तरी चांडक यांची हीच कार्यपद्धती कायम राहावी अशा भावना व अपेक्षा अनेक अनुभवी तज्ञांकडून व्यक्त केल्या जात आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish