अखेर इंडिया न्यूज च्या बातमी नंतर दखल ! अकोला-अकोट रोड वरील टोल नाका दुरुस्ती..
RaviRaj 30 March 2024
“वाकलेला टोल नाका जीव घेण्यासाठी सज्ज” अशा मजकुराची बातमी 18 मार्च रोजी इंडिया न्यूज ने प्रकाशित केली होती त्याचीच दखल म्हणून तात्काळ संबंधित कंत्राटदाराने दोन दिवसात टोल नाका दुरुस्त केला..
Akola : टोलनाका दुरुस्तीचे काम ज्या पद्धतीने तात्काळ कंत्राटदाराने केले त्याचप्रमाणे अकोट -अकोला रस्ता पूर्ण का करीत नाही.. यामागे कोणते राजकारण सुरू आहे नितीन गडकरींनी स्पष्ट निर्देश दिल्यावरही रस्ता पूर्ण का होत नाही व गडकरी यांच्या निर्देशाप्रमाणे जो रस्ता बांधकाम केला आहे तो सुद्धा खराब असल्याचे गडकरींच्या निदर्शनास आल्यामुळे त्यांनी रस्ता उखडून टाकण्याचे सुद्धा स्पष्ट निर्देश दिले होते..
परंतु केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सारख्या नेत्यांच्या निर्देशांना सुद्धा कंत्राटदाराकडून केराची टोपली दाखवल्या जाते याचा अर्थ काय होतो.. हे जनतेला समजण्यापलीकडे निश्चितच नाही.. एकतर नितीन गडकरी यांच्या निर्देशाला विद्यमान सरकारमध्ये महत्त्व दिल्या जात नाही किंवा गडकरींच्या आदेशाचे अस्तित्व शून्य आहे की काय..या निमित्ताने अधोरेखित होत आहे.. अकोट अकोला रस्त्याचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे हे खुद्द देशाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा मान्य केले तरीही अशा बांधकाम झालेल्या खराब व निकृष्ट रस्त्याचा टोल वसुली करिता टोलनाका उभा का केला जातोय ..टोलनाका उभा करण्याची एवढी काय घाई आहे.. असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
नितीन गडकरी भाषणांमध्ये जे बोलतात ते स्पष्ट बोलतात अशी त्यांची ओळख आहे परंतु त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून अकोट वासियांना तात्पुरता का होईना दिलासा मिळाला होता..परंतु गडकरी यांच्या निर्देशाप्रमाणे आतापर्यंत काहीच झाले नसून त्याच्या उलट लोकांची लूट करण्याकरिता टोल नाका उभा करून अकोट वासियांची पुन्हा एकदा निराशाच झाली.. त्यामुळे नितीन गडकरींच्या व्यक्तिमत्त्वावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत..
नितीन गडकरी यांचे शासन दरबारी किंवा सरकारमध्ये कोणतेही अस्तित्व नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे कंत्राट दारावर -कुणाचाही वचक राहिलेला नाही किंवा नितीन गडकरी बोलतात एक आणि करतात दुसरे अशा प्रकारचा त्यांच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण झाला आहे..त्यामुळे अकोट -अकोला रस्ता प्रलंबित ठेवणे यामागे खूप मोठे राजकारण शिजत असल्याच्या चर्चा संपूर्ण जिल्ह्यात रंगताना दिसत आहेत..