अखेर जि प महिला बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अरेराविला चाप ! कर्मचाऱ्यांचे डोके आणले ठिकाणावर..
parmeshwar hatole 28 March 2024
इंडिया न्यूज च्या बातमीचा इम्पॅक्ट ! बातमीनंतर दिलेली 174 रुपयाची चालान..
Akola : जि.प अकोला अंतर्गत असलेल्या महिला बालकल्याण विभागाचा भोंगळ कारभार हा इंडिया न्यूज चे वरिष्ठ संपादक रविराज मोरे यांनी 24 मार्चला जनतेसमोर आणला होता. अकोट आयसीडीएस कार्यालय अंतर्गत वाटप होत असलेला पोषण आहार हा मागील दोन वर्षापासून सतत निकृष्ट दर्जाचा येत असून त्याचा तपासणी अहवाल रविराज मोरे यांनी माहिती अधिकारांतर्गत मागितला होता त्या माहितीचे शुल्क 174 रुपये हे भरण्याकरिता महिला बालकल्याण कार्यालयातील स्वतःला अनुभवी ,अभ्यासू व अति-आत्मविश्वासातून शहाणे समजणारे अधिकारी तसेच कर्मचारी यांना माहिती अधिकार अंतर्गत माहिती देण्याकरिता पैसे भरण्यासाठी चालान पास करून द्यावी लागते व त्यानंतरच बँकेत पैसे भरता येतात ही माहिती नसल्यामुळे किंवा अनभिज्ञ असल्याचे सोंग घेतल्यामुळे 24 मार्चला इंडिया न्यूज ला बातमी प्रसारित करावी लागली त्यामुळे महिला बालकल्याण मधील अधिकाऱ्यांनी इंडिया न्यूज च्या बातमीची तात्काळ दखल घेऊन वरिष्ठांचे मार्गदर्शन घेतले असावे..
म्हणून लगेचच 26 मार्चला महिला बालकल्याण विभागातून माहिती अधिकार अंतर्गत माहिती चे मूल्य 174 रुपये भरण्याकरिता चालान पास करून कर्मचाऱ्यांनी रविराज मोरे यांना संपर्क साधून चालान घेऊन जावे व तात्काळ पैसे भरून आपली माहिती घेऊन जाण्याची विनंती केली..परंतु जनसामान्यांचे काय ! पत्रकार मंडळींना वरिष्ठ अधिकारी कर्मचारी अशा प्रकारचा मानसिक त्रास देत असतील तर ग्रामीण भागातील जनतेचे काय हाल होत असतील याचा अंदाज न लावलेला बरा.. मिनी मंत्रालय असलेले जिल्हा परिषद येथील अधिकाऱ्यांची मानसिकता फक्त गडगंज पगार घेऊन गोरगरिबांना त्रास देऊन त्यांची पिळवणूक करण्यासाठी व कर्मचाऱ्यांच्या एकमेकांच्या चुका लपवण्याकरिता प्रोत्साहन देण्यासाठीच बसले आहेत.. परंतु या सर्व मानसिक त्रासातून रविराज मोरे यांनी हताश न होता अखेर पोषण आहाराचा चाचणी अहवाल मिळवला.. परंतु पोषण आहाराची Shri analytical testing and research laboratory.. (Nashik region) येथे उत्कृष्ट तपासणी केल्यावरही गरोदर महिला व देशाचे पुढील भविष्य असणारे बालगोपाल यांचा तोंडातील घास असलेला पोषण आहार हा अकोट ला पोहोचेपर्यंत वारंवार निकृष्ट दर्जाचा कसा होतो या सर्व भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता किती मिळतो अशा अनेक प्रश्नांचा उलगडा भविष्यात होईलच..
त्यामुळे शासनाची फसवणूक करून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी व संबंधित अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी रविराज मोरे यांचा आवाज दाबण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केलेले अतिहुशार व दादागिरी करून राजकारण्यांच्या आशीर्वादाने एकाच आवडत्या कार्यालयात गैरकायदेशीर रित्या ठान मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांनी रविराज मोरे यांना हलक्यात घेऊन स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली की काय ? माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर दादागिरी करणाऱ्यांना अतिहुशारी महागात पडणार का ? अशा प्रकारच्या गंभीर चर्चा जिल्ह्यातील अनुभवी जाणकारांकडून होत असून अंगणवाडी मधील निरागस व जिवनाची सुरुवात करणाऱ्या चिमुकल्यांचा तोंडातील आहार निर्दयपणे हिसकावून घेणाऱ्या सर्व जबाबदार असलेल्या भ्रष्टाचारी कर्मचारी, कंत्राटदार व इतर सर्व यंत्रणांवर तात्काळ कार्यवाही होणे गरजेचे आहे..अन्यथा शिक्षणाच्या बाजारात एकमेव राहिलेल्या पवित्र अशा शिक्षणरुपी अमृत पाजणाऱ्या अंगणवाडी वरील विश्वास आर्हता कमी होण्याची शक्यता अनेक पालकांनी व्यक्त केली..