hacklink al hack forum organik hit kayseri escort casibom 895 com girispadişahbet güncel girişdeneme bonusu veren siteler463 marsbahisdeneme bonusu veren sitelersahabetdeneme bonusu veren sitelerviagra onlinetürbanlı porno izle izmir escortvaycasino1winbetbigobetmatiktipobetcasibomgrandpashabetistanbul escortultrabet girişmatbet

INDIA NEWS

Press

अखेर कोण हुशार ?अकोलेकर की अमरावतीकर..

RaviRaj 5 June 2024

अकोला व अमरावती मधील नेते मंडळी..

काल झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.. एकेकाळी अमरावती पेक्षा सर्व क्षेत्रात विकसित असलेला अकोला जिल्हा हा आज रोजी जातीपातीच्या राजकारणात पूर्णपणे गुरफटलेला दिसत आहे यावेळी लोकसभा निवडणुकांमध्ये अकोलेकरांना अतिशय सुशिक्षित, संवेदनशील सर्वसामान्यांचा आदर करणारे नम्रपणे हार स्विकारणारे डॉ अभय पाटील यांच्या निमित्ताने उत्कृष्ट असे उमेदवार मिळाले होते परंतु अकोलेकरांसाठी घराणे शाही च्या विरोधात बदल घडवून आणण्याची ही शेवटची संधी असल्यामुळे ही संधी सुद्धा थोड्याफार फरकाने अकोलेकरांना गमावावी लागली..

अभय पाटील यांनी मानले सन्मानपूर्वक कार्यकर्त्यांचे आभार..

अकोला जिल्ह्याच्या लागूनच असलेला मागास समजला जाणारा वाशिम जिल्ह्यातील जनतेने सुद्धा बदल घडवण्याला प्राधान्य दिले.. विकासात्मक दृष्टिकोनातून व देशाच्या व जनसामान्याच्या हिताकरिता बदल होणे हा गरजेचा आहे त्यामुळेच भारतीय संविधानामध्ये दर पाच वर्षांनी सरकारवर जनतेचे नियंत्रण राहण्याकरिता बदल आवश्यक असल्यामुळे निवडणुका घेण्याचे प्रावधान दिलेले आहे. परंतु अकोला जिल्हा म्हणजेच “सबके लिए खुला है मंदिर यह हमारा” अशी अवस्था झाल्याचे दिसते.. मागच्या सरकारमध्ये अचलपूर येथील बच्चू कडू पालकमंत्री होऊन गेले त्यासोबतच गेली दहा वर्षापासून अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील प्रकाश भारसाकळे अकोला जिल्ह्यातील अनाथ असलेल्या अकोट तालुक्याचे प्रतिनिधित्व करीत आहेत.. प्रकाश भारसाकळे यांच्या जिल्ह्याचे खासदार काँग्रेसचे बळवंत वानखडे व स्वतःअकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्याचे पार्सल समजल्या जाणारे भाजपचे आमदार हे समीकरण अकोला जिल्हा व अकोट मतदार संघातील जनतेला कितपत योग्य वाटते हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतच दिसेल..

दर्यापूर मतदार संघात प्रकाश भारसाकळे यांनी अनेक वर्ष आमदारकी भोगली तरीही लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा यांना निवडून आणण्यात कोणतीही भूमिका न बजावणारे प्रकाश भारसाकळे हे अकोल्याचे अनुप धोत्रे निवडून आल्यानंतर मोठ्या तोऱ्यात मतमोजणीच्या ठिकाणी अगदी शेवटच्या क्षणी पोहोचले हाच तोरा दर्यापूर हा स्वतःचा गड समजणारे प्रकाश भारसाकळे यांनी नवनीत राणा यांना मदत करण्यात दाखवला नाही अशी कोणतीही भूमिका निवडणुकीमध्ये बजावल्याचे दिसत नाही.. तसेच अकोट तालुका हा गेली दहा वर्षापासून अनाथ असल्याचे चित्र आहे अकोट मतदारसंघात असा एकही सक्षम उमेदवार नाही की बाहेरच्या पार्सल उमेदवाराला एवढ्या मोठ्या आकोट मतदार संघाचे प्रतिनिधित्व वारंवार करावे लागते ही खेदाची बाब असल्याची खंत आजच्या नवीन पिढीला वारंवार भेडसावते ..अकोला जिल्ह्याला धोत्रे घराण्याशिवाय कुणीच वाली नाही का.? एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या जिल्ह्याला धोत्रे घराण्याशिवाय कोणीच प्रतिनिधित्व करू शकत नाही का? डॉ.अभय पाटील यांच्यासारखे उमेदवार अकोलेकरांना नको आहेत तर मग कोण हवा ? असे अनेक प्रश्न पाटील यांच्या समर्थकांनी उपस्थित केले आहेत..अशा प्रकारची परिस्थिती जिल्ह्याची राहिली तर यापुढे कोणीच निवडणूक लढवण्यास पुढाकार घेणार नाही..

मागील प्रमाणे यापुढे सुद्धा अकोल्याचे राजकारण हे घराणेशाहीतच पूर्ववत राहील.. देशातील सर्व जनतेला यावेळेस लोकसभा निवडणुकीमध्ये बदल घडवणे गरजेचे आहे हे कळाले तसे झाले सुद्धा परंतु पूर्ण देशातील एकमेव अविकसित असलेला जिल्हा म्हणजेच अकोलेकरांना बदल घडवण्याची गरज वाटली नाही.. म्हणून अखेर अकोलेकर हुशार ठरले की अमरावतीकर याचे चिंतन करणे गरजेचे आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish