INDIA NEWS

Press

अखेर राष्ट्रवादी काँग्रेस चा जाकीर शाह रशीद शाह याच्यावर 420,417 नुसार गुन्हे दाखल..दोन महिलांची केली फसवणूक..

Akot : शहरातील पडसाद उमटलेल्या आसाम दंगल मधील कुख्यात असलेला राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता जाकीर शाह रशिद शाह यांने दोन महिलांची पंधरा लाखांची फसवणूक केली..अखेर अकोट शहर पोलीस स्टेशनला फसवणुकीचे 420, 417 नुसार गुन्हे दाखल..

महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून अमरावती, नाशिक अशा वेगवेगळ्या शहरातून आणखी तक्रारी येण्याची शक्यता..

Salim Khan 23 March 2023

आसाम दंगल मधील कुख्यात असलेला राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता जाकीर शाह रशीद शाह..

एकेकाळी भाजपमध्ये सक्रिय असलेला व पंकजा मुंडे ह्या बहीण असल्याचे सांगत जनमानसात बढाई मारणारा जाकीर शाह रशीद शाह याच्यावर दोन महिलांची पंधरा लाखाने फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अकोट शहर पोलीस स्टेशनला 420, 417 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, त्यापैकी एका पीडित महिलेच्या मुलीला नोकरी लावून देतो असे अमिष दाखवून अकरा लाखाने फसवणूक केली तर सतत तीन वर्षापासून पिडीतेच्या मुलीला कोणतीही नोकरी न लावता पैसे परत द्यावे लागतील म्हणून अकरा लाखाचा चेक देऊन जाकीर शाह मोकळा झाला, परंतु मागील तीन वर्षापासून जाकीर शाह उडवाउडवीचे उत्तरे देऊन पैसे देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे पीडित महिलेच्या आपली फसवणूक झाली हे लक्षात आल्याने तिने तात्काळ बँकेत चेक वटवण्यास दिले असता जाकीर शाहच्या खात्यात पैसे नसल्यामुळे चेक परत आला त्यामुळे पीडित महिलेने जाकीरशाह रशीद शाह याच्यावर मा.अकोट न्यायालय येथे 138 अंतर्गत केस दाखल केली आहे.

महिलांची आर्थिक पिळवणूक करणारा माजी नगरसेवक जाकीर शाह रशीद शाह..

तर दुसऱ्या पीडित महिलेच्या सुद्धा मुलाला आरोग्य विभागात नोकरी लावून देतो असे आमीष दाखवून चार लाख रुपयांची फसवणूक केली आहे. जाकीर शाह याच्या गोड बोलण्याला व अनेक राजकीय दिग्गजांसोबत ओळख असल्याचे फोटो दाखवून महिलांची फसवणूक करून त्यांचा आर्थिक बळी घेण्यात हातखंडा असलेला जाकीर शाह याला घरातील सर्व दाग दागिने बँकेत गहाण ठेवून मागील चार वर्षापासून जाकीर शाह याला चार लाख रुपये देऊन पीडित महिलांनी स्वतःचा संसार धोक्यात टाकला आहे.इतकेच नव्हे तर चार वर्षापासून गहाण ठेवलेले दागिने व संसार वाचवण्याकरिता चार लाख रुपयांचे व्याज सुद्धा प्रायव्हेट नोकरी करून स्वतःच्या पोटाला चिमटा देऊन बँकेत भरावे लागत आहेत,यादरम्यान पीडित महिलांनी जाकीर शाहला पैसे दिल्याच्या चुकीमुळे परिवारातील सदस्यांचा मानसिक त्रास सुद्धा सहन करावा लागत असून तो त्रास असह्य होऊन आत्महत्या सुद्धा करण्याचा प्रयत्न पिडीतांनी केला आहे परंतु मुलांचा विचार करून आज या दोन्ही पीडित महिला समाजविघातक प्रवृत्ती असलेला जाकीर शाह रशीद शाह याच्याविरुद्ध लढाई लढत असून त्यांच्या प्रकरणाची अखेर अकोट शहर पोलिसांनी दखल घेऊन जाकीर शाह याच्यावर फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत..

महिलांची आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल असलेला कुख्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता जाकीर शाह रशिद शाह..

अशाच प्रकारे संपूर्ण राज्यात नाशिक, अमरावती अशा वेगवेगळ्या ठिकाणी अनेक महिलांची आर्थिक फसवणूक जाकीर शाह रशीद शाह याने केली आहे.अजून यापुढे अनेक प्रकरणे बाहेर येतीलच या सर्व गोष्टी टाळण्यासाठी जाकीर शाह वेगवेगळ्या पक्षात जाऊन अनेक नेत्यांची सहानुभूती घेऊन पीडितांवर दबाव तंत्राचा वापर करण्यासाठी नेत्यांचा सुद्धा वापर करण्यात मागे पुढे पाहत नाही एकेकाळी भाजपमधे सक्रिय असलेला जाकीर शाहची गुन्हेगारी प्रवृत्ती हा पूर्व इतिहास भाजपच्या नेत्यांना माहिती झाल्याने तात्काळ त्याला पक्षाच्या बाहेरचा रस्ता दाखवला त्यानंतर पोटभरायचे कोणतेही साधन नसल्यामुळे व अपघाताने व अनावधानाने नगरसेवक झालेला परंतु राजकारणाचा छंद असल्यामुळे जाकीर शाह याने पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात सक्रिय होण्याचा प्रयत्न केला परंतु अकोला जिल्ह्यातील विशेषता अकोट मधील काँग्रेस नेत्यांना जाकीर शाह चा पूर्व इतिहास व कुख्यात असलेली पार्श्वभूमी ही मान्य नसल्याने काँग्रेस पक्षात सुद्धा जाकीर शाह याची डाळ शिजली नाही. त्यानंतर शेवटचा पर्याय म्हणून काही काळापुरता एम आय एम पक्षात सुद्धा जाकीर शाह यांने अंधारात चाचपडत असलेले आपले भविष्य आजमावण्याचा प्रयत्न केला परंतु याची सुद्धा खूप मोठी किंमत 29 दिवस सेंट्रल जेलमध्ये राहून जाकीर शाहला चुकवावी लागली

https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid0XYMEdUgTKvR2tW2XP3T9RT8gQygCFrufDjsmp9kRpKUPsCV4EbgMyWJm8PdadBEPl&id=100011714107545&sfnsn=wiwspwa&mibextid=RUbZ1f

link touch kara 👆👆👆👆👆👆👆

त्यामुळे आयुष्यात सपशेल अपयशी ठरलेला व जीवन जगण्याचे कोणतेही साधन किंवा दोन वेळच्या जेवणाची सुद्धा सोय नसलेला जाकीर शाह रशीद शाह हा अकोट मधीलच माजी काँग्रेस अध्यक्ष व आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा सुरुवात करीत पाय रोवण्याचा प्रयत्न करीत असलेल्या व जाकीर शाहसारख्या बोल बच्चन कार्यकर्त्यांची गरज असल्याने माजी काँग्रेस नेत्यांचा हात पकडून उभे राहण्याचा प्रयत्न करीत आहे, परंतु जाकीरशाह याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा देशातील सर्व पक्षाचा प्रवास करून आलेला जाकीर शाह हा जास्त काळ टिकणार नाही हे निश्चित..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish