अख्ख्या महाराष्ट्राला हेवा वाटणाऱ्या उपोषणाची सर्वत्र चर्चा..उपोषण कर्ते रविराज मोरे यांनी 14 एप्रिल ला आझाद मैदान मुंबई येथे हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे केले आवाहन ..
RaviRaj 11 April 2025

रविराज मोरे यांच्या उपोषणाची होणार ऐतिहासिक नोंद
अकोट सारख्या संवेदनशील शहरातून धाडस करणारे मोरे यांचे सर्वत्र कौतुक
मुंबई
भाजप सरकारच्या हुकूमशाही धोरणाविरुद्ध अकोला जिल्ह्यातील अकोट शहरांमधून संविधानिक मार्गाने लढणारे व्यक्तिमत्व रविराज मोरे यांच्या माध्यमातून दिवसेंदिवस तयार होत आहे जनतेच्या भावना ओळखून अतिशय योग्य मुद्दे उपोषणाच्या माध्यमातून मोरे हे शासनासमोर ठेवणार आहेत
दहा रुपयाच्या तिकिटावर माहिती व न्याय मिळेल या आशेने गोरगरीब जनसामान्य माहिती अधिकार अंतर्गत माहिती घेण्यासाठी आयुष्याचे वर्षानुवर्षे खर्ची घालतो परंतु शासनाकडून फक्त आणि फक्त माहिती अधिकाराचा खेळ सुरू आहे

माहिती अधिकारात योग्य माहिती मिळणारच नाही अशी व्यवस्थाच कायद्यामध्ये सरकारने करून ठेवली आहे त्यामुळे अधिकाऱ्यांच्या मनमानीला आळा घालण्यासाठी एकमेव पर्याय उपोषणाचा रविराज मोरे यांनी स्वीकारला आहे
पत्रकारांच्या संरक्षणासाठी शस्त्र बाळगण्याचा परवाना तात्काळ मिळावा सोबतच अकोट शहराची संवेदनशील म्हणून असणारी ओळख हे कायमस्वरूपी नष्ट व्हावी याकरिता नवखे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची या ठिकाणी नियुक्ती न करता अनुभवी व मुरलेले अधिकाऱ्यांची अकोट सारख्या विभागाला गरज आहे

तसेच नगरपालिका असो की तहसील कार्यालय इतर सर्व शासकीय कार्यालय या ठिकाणी सुद्धा नवखे अधिकारी असल्यामुळे जनतेला अतोनात मानसिक त्रास या अधिकाऱ्यांकडून होत आहे हे सर्व अधिकारी विद्यमान आमदार यांच्या मर्जीतील असल्यामुळे मनमानी करीत हुकुमशहा पद्धतीने सामान्य लोकांना वागणूक देत आहेत

अशा अनेक समस्या अकोट सह संपूर्ण राज्यभरातच निर्माण झाल्या असून या सर्व गंभीर प्रकाराबाबत दाद मागण्यासाठी रविराज मोरे यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे 45 डिग्री तापमानात मुंबईसारख्या उष्ण ठिकाणी आझाद मैदानावर मोरे हे 14 एप्रिल पासून बेमुदत उपोषणाला बसणार आहेत

या उपोषणामध्ये निस्वार्थ भावना दिसत असल्यामुळे राज्यातीलच नव्हे तर संपूर्ण देशातून वेगवेगळ्या संघटनांचा पाठिंबा मिळत आहे सोबतच वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा या उपोषणामध्ये सार्वजनिक हित साध्य होणार असल्याने पाठिंबा दिला

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, ऑल इंडिया पॅंथर सेना, व तळागळातील असलेले अकोला जिल्ह्याची कामगार संघटना यांनी सुद्धा मोरे यांना पाठिंबा दिला. रविराज मोरे यांच्या बेधडक लेखणीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अनेक कामगार यांना न्याय मिळालेला आहे

त्याकरिता हजारोंच्या संख्येने कामगार संघटनेमधील कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला सोबतच महिलांनी सुद्धा या पाठिंब्याचे समर्थन केले आहे त्यामुळे रविराज मोरे यांच्या उपोषणाच्या माध्यमातून आझाद मैदान मुंबई येथे अकोट शहराचे नाव मात्र चमकणार असून अशा प्रकारचे उपोषण करणारे अकोला जिल्ह्यातील अकोट शहरातील एकमेव रविराज मोरे ठरणार आहेत

या निमित्ताने अकोट शहराचे नावलौकिक सर्वत्र महाराष्ट्रभर पसरणार असल्याची चर्चा रंगलेली आहे सोबतच उपोषणकर्ते रविराज मोरे यांनी महाराष्ट्रातील तमाम माझ्या बंधू आणि भगिनींनी या उपोषणामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.

“आता नाही तर कधीच नाही “अशी वेळ जनसामान्यांवर आलेली आहे अनेक समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत झोपलेल्या केंद्र आणि राज्य सरकारला जागे करण्यासाठी मोरे यांनी हे उपोषणाचे हत्यार उपसले आहे पुढील पिढी गुलामगिरीत जाऊ नये याकरिता आजच हे महत्त्वाचे पाऊल उचलणे गरजेचे आहे असे अनेक राजकीय व कायदे तज्ज्ञांनी मत व्यक्त केले आहे.