INDIA NEWS

Press

अकोल्यात बालगोपालांची लूट..दोन कार्यकर्त्यांचा अन्नत्याग, तरीही समिती व मुख्याधिकारी हतबल..

salim khan 15 September 2025

“जिल्हा परिषदेचा गलिच्छ कारभार सेविकांच्या जिवावर, बालकांच्या हक्कावर निर्लज्ज माफिया राज !”

निरागस बालकांच्या न्यायासाठी लढणारे दोन योद्धे विजयकुमार ताले व राजरत्न कांबळे

अकोला जिल्हा परिषद ही आज बालगोपालांच्या तोंडचा घास लुटणाऱ्या अधिकाऱ्यांचा आणि कंत्राटदारांचा राक्षसी अड्डा बनली असून निरागस बालकांच्या आयुष्याशी खेळणारा हा निर्लज्ज आणि अमानुष लूटखोरीचा काळा खेळ सुरू आहे, देशाचे भविष्य असलेल्या मुलांचा आहार आणि पाणी सुद्धा अधिकारी व कंत्राटदार संगनमताने पळवत आहेत, अंगणवाडी सेविकांकडून जबरदस्तीने पैसे उकळले जात आहेत, न दिल्यास नोकरीवरून हाकलण्याची धमकी दिली जाते आणि हे सगळं घडत असताना मुख्याधिकारी मात्र भ्रष्टांच्या जोखडात अडकून खुर्चीवर बसलले पण आदेश न पाळला जाणारा पोकळ पुतळा ठरले आहेत.

पातुर तालुक्यातील कार्यकर्ते विजयकुमार ताले आणि राजरत्न कांबळे यांनी या घृणास्पद भ्रष्टाचाराविरोधात तब्बल नऊ दिवस अन्नत्याग आंदोलन करावे लागले, म्हणजे बालगोपालांचा तोंडचा घास वाचवण्यासाठी दोन कार्यकर्त्यांना आपले प्राण पणाला लावणे हीच या प्रशासनाच्या संवेदनाशून्यतेची व निर्लज्जपणाची जिवंत साक्ष आहे, अखेर दबावाखाली मुख्याधिकारींनी त्री-सदस्यीय चौकशी समिती नेमली परंतु ही समिती ठरली फक्त भ्रष्ट अधिकाऱ्यांचे आणि कंत्राटदारांचे संरक्षण करणारी कागदी ढाल, आठ दिवसांत अहवाल द्यायचा आदेश असून पंधरा दिवस उलटून गेले तरी अहवाल नाही, चौकशी नाही आणि कारवाई नाही म्हणजे समितीचे कामच गुन्हेगारांना झाकण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी होते हे उघड झाले आहे,

यापूर्वीही आकोट येथील पर्यवेक्षिका प्रतीक्षा शेगोंकार यांच्या मनमानी कारभाराला सीडीपीओ आणि उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सरळ पाठिंबा दिला होता, इतकेच काय तर त्यांच्या कार्यालयीन कामकाजाचाच प्रकार अकोला शहरातील सितारा टॉवर या खाजगी इमारतीतून चालतो आणि अधिकृत नोंदी कार्यालयात नसल्याचे उघड झाले म्हणजे संपूर्ण जिल्हा परिषद ही लुटमारीचे आणि काळेबाजारी कारभाराचे कुजके अड्डे बनले आहेत, आज परिस्थिती अशी आहे की मुख्याधिकारींचा वचक संपला आहे, समिती ही भ्रष्टांचे रक्षण करणारी निर्लज्ज ढाल ठरली आहे, पर्यवेक्षिका आणि सीडीपीओ यांनी सेविकांच्या जिवावर उभी केलेली ही लूटयंत्रणा अव्याहतपणे सुरू ठेवली आहे आणि कंत्राटदारांनी बालगोपालांचा घास बाजारात विकण्याचा माफिया राज उभा केला आहे,

म्हणजेच जिल्हा परिषद ही आज बालकांच्या हक्काची थट्टा करणारी आणि समाजाच्या भविष्याचा घात करणारी राक्षसी यंत्रणा बनली आहे, ज्यात सामील झालेले अधिकारी हे सामान्य जनतेच्या शत्रूपेक्षा भयंकर आहेत. या महास्फोटक भ्रष्टाचारामुळे जनतेत प्रचंड संताप उसळला असून आंदोलनकर्त्यांनी जाहीर इशारा दिला आहे की जर परिस्थिती अशीच राहिली आणि बालगोपालांचा घास लुटणाऱ्या गुन्हेगार अधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर गुन्हे दाखल करून कारवाई झाली नाही तर पुन्हा रस्त्यावर उतरून राक्षसी भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध निर्णायक लढा देण्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish