INDIA NEWS

Press

अकोल्यात लोकसभेची तिरंगी लढत नसून एकतर्फी! एकच उमेदवार सहा लाख मते घेणार..

RaviRaj 3 March 2024

अकोल्यात लोकसभेची तिरंगी लढत नसून एकतर्फी ! एकच उमेदवार सहा लाख मते घेणार..परंतु तो उमेदवार कोण हे मात्र अस्पष्ट..

Akola : देशाच्या इतिहासात पहिल्यांदा मागील काळात फोडाफोडीच्या राजकारणामुळे अनपेक्षित घडामोडी घडल्या आहेत त्यामुळे महायुती असो की महाविकास आघाडी या दोन्हीही आघाड्यांकडून उमेदवारांची अंतिम यादी अगदी शेवटच्या क्षणी जाहीर झाली आहे..शिवसेना फोडल्यानंतर एकनाथ शिंदे यांना विद्यमान १४ खासदार पेक्षा जास्त खासदार निवडून येतील या अपेक्षेने शिंदे यांनी ऐतिहासिक विद्रोह करून भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला परंतु आजची राजकीय परिस्थिती पाहता एकनाथ शिंदे यांचा भ्रमनिरास झाल्याचे स्पष्ट होते त्याचप्रमाणे अजित पवारांनी सुद्धा पक्ष वाढीकरिता व आपल्या खासदारांची संख्या वाढवण्याकरिता भाजपासोबत उपमुख्यमंत्री पदाची ऑफर स्विकारली परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांचा संपूर्ण भ्रमनिरास झाला व विधानसभेला सुद्धा हीच परिस्थिती राहणार असल्याची खात्री शिंदे व पवार यांना पटली असून भाजपसोबत जाऊन पक्ष वाढणार नसून उलट पक्ष संपत चालला आहे हे आता दोन्हीही मित्र पक्षांच्या लक्षात आलेले आहे.

आपल्या संतप्त प्रतिक्रिया देताना विशाल पाटील सोनोने..

परंतु अजित पवार व एकनाथ शिंदे यांचे परतीचे दरवाजे बंद झाल्यामुळे त्यांची भाजपामध्ये घुसमट होत आहे..
या फोडाफोडीच्या राजकारणामुळे जनता गोंधळलेली असून कुणालाही मतदान केले तरी तो उमेदवार भाजपमध्ये जाईल याची खात्री मतदाराला असल्यामुळे आज रोजी जनतेचा कुणावरच विश्वास राहिलेला नसल्याचे दिसून येते.. त्यामध्ये भाजपाने अकोल्यात अनुप धोत्रे ला उमेदवारी देऊन पुन्हा एकदा घराणेशाहीला प्राधान्य दिल्यामुळे खुद्द भाजपचे कार्यकर्तेच नाराजी व्यक्त करताना दिसतात..अकोट तालुक्यातील मक्रमपूर येथील विशाल पाटील सोनोने यांनी तर थेट भाजपा खासदार व आमदारांवर गंभीर आरोपच केले..

भाजपच्याच सरकार मधील दोन आमदार व खासदार असून सुद्धा मागील दहा वर्षापासून जिल्ह्यातील सर्व जनतेला पडलेला सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अकोट-अकोला रस्ता प्रलंबित का ठेवला..सर्व देशातील ऐतिहासिक रस्ते बनवणारे आपल्या विदर्भातीलच असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अकोट-अकोला रस्ता हा खराब बनवलेला असून उखडून टाकण्याचे निर्देश काही दिवसांपूर्वी दिले होते.परंतु नितीन गडकरींच्या आदेशाची सुद्धा अंमलबजावणी झाली नाही.याचाच अर्थ निवडणुकीच्या तोंडावर नितीन गडकरी च्या तोंडातून फक्त कोरडी घोषणा करून घेण्याचे षडयंत्र दोन्ही आमदारांनी केल्याचे दिसते व त्याला नितीन गडकरी सुद्धा बळी पडले.त्यामुळे आज नितीन गडकरींच्या भूमिकेवर जनतेला संशय निर्माण झाला आहे..गडकरी हे स्पष्ट बोलतात व जे बोलतात ते करतात अशी त्यांची ओळख आहे परंतु अकोट-अकोला रस्त्याच्या बाबतीत गडकरींची दुटप्पी भूमिका सतत बघायला मिळत आहे..अख्ख्या देशात रस्त्यांचे जाळे पसरवणाऱ्या गडकरी यांनी 72 तासात 50 किलोमीटरचा रस्ता बनवून जागतिक विक्रम नोंदवला परंतु त्याच जिल्ह्यातील अकोट – अकोला रस्ता हा दहा वर्षापासून प्रलंबित का? अकोटच्या जनतेशी अशी वागणूक का? यामध्ये जनतेचा काय दोष ? फक्त अकोट तालुक्यातील जनता दहा वर्षापासून भाजपाला मतदान करते एवढाच दोष !अकोटच्या जनतेचा असून यापुढे मात्र तालुक्यामध्ये तीव्र असंतोष व मतदारांमध्ये आक्रमकता दिसून येत आहे..

नितीन गडकरी यांचा अकोट – अकोला खराब रस्ता उखडून फेका हा आदेश हवेत विरघळताना..

लोकांच्या मनामध्ये मागील दहा वर्षापासून विद्यमान खासदार संजय धोत्रे व आ. प्रकाश भारसाकळे यांच्या बद्दल तीव्र नाराजी असून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे..त्यामुळे अकोल्यात तिरंगी लढत नसून एकतर्फी लढत होणार आहे.. फक्त एकाच उमेदवाराला सहा लाख मते मिळणार आहेत म्हणून विद्यमान भाजपातील नेत्यांनी, आमदारांनी कितीही शक्तिप्रदर्शन केले व कितीही मोदीच्या सभा घेतल्या तरीही निवडणुकीच्या वेळेपर्यंत जनतेचा निर्णय बदलणार नाही अशा जनभावना विशाल पाटील सोनोने यांनी व्यक्त केल्या..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish