अकोल्यातील नरेंद्रनाथ महाराजांना अयोध्येचे निमंत्रण- ही गौरवाची बाब.. स्वप्निल रोम यांनी घेतली कार्याची दखल…
RaviRaj 21 January 2024
अकोला : येथील नाथ शक्तिपीठ हे चैतन्य श्री मच्छिंद्रनाथांपासून सुरू झालेल्या आणि अखंड गुरुपरंपरेने चालत आलेल्या नवनाथ पंथाचे प्रखर सिद्ध असे पीठ आहे. कलियुगातील खडतर कुप्रभावांना नाहीसे करून सज्जनशक्तीच्या पाठीशी सामर्थ्य उभे करणे तसेच श्री गुरु मार्गी असणाऱ्यांना आत्मोन्नतीच्या प्रवासात कृपाप्रसाद देणे यासाठी भगवान योगेश्वर आणि कलियुगाच्या सुरुवातीपासूनच सुरुवातीपासूनच नाथपंथाची स्थापना केली. म्हणून नाथपंथ हा सर्वच पंथ संप्रदायांचा गुरु पंथ आहे. गेल्या पाच हजार वर्षांपूर्वी ब्रह्मांडनायकांनी स्थापन झालेल्या या पंथाचे कार्य अखंड गुरुपरंपरेने कलियुगाच्या अंतिम क्षणापर्यंत सुरू राहणार आहे. आदिगुरू भगवान श्री दत्तात्रेय पंथाचे नियंत्रक आहेत. नाथशक्तीपीठ हे अध्यात्मिक ऊर्जा स्रोत आहे. या पिठातून गेल्या तीन दशकांपासुन वर्षांपासून अखंडपणे जनकल्याणाचा संकल्प घेऊन अध्यात्म योग महर्षी परमपूजनीय नाथ शक्तिपीठाधीश श्री नरेंद्रनाथ महाराज , एम. कॉम. एफ सीए हे अविरतपणे कार्यरत आहेत. नाथ शक्ती पिठाच्या कार्याची तसेच परमपूजनीय श्री नरेंद्रनाथ महाराजांच्या अध्यात्मिक ,धार्मिक, नैतिक, सांस्कृतिक, अपारंपारिक शिक्षणाची तसेच वेद सेवा आणि अनुसंधान कार्याची दखल आध्यात्मिक क्षेत्रातील विभूतिमत्वांनी , शास्त्रज्ञांनी , तपस्वींनी तसेच साधकांनी नेहमीच घेतलेली आहे.
अध्यात्म योग महर्षी परमपूजनीय नरेंद्रनाथ महाराजांचे भरीव योगदान लक्षात घेता श्रीराम जन्मभूमी न्यास अयोध्याने राजाधिराज भगवान रामचंद्र महाराजांच्या बालस्वरूपातील मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे निमंत्रण पाठविले आहे. ज्या विभूतीमत्त्वांच्या परममंगल उपस्थितीमुळे प्राणप्रतिष्ठेच्या सोहळा निर्विघ्नपणे व आनंदाने संपन्न होणार आहे अशा निवडक पाच-दहा आध्यात्मिक विभूतिमात्वांपैकी परमपूजनीय नरेंद्रनाथ महाराज एक आहेत. भारत सरकार , राज्य सरकार व उपमुख्यमंत्री यांनी देखील सोहळ्याचे आमंत्रण श्री महाराजांना पाठवले आहे. आमंत्रणापूर्वी श्री राम जन्मभूमी न्यासाने श्री नरेंद्रनाथ महाराजांची तसेच नाथशक्तिपीठाच्या कार्याच्या सविस्तर माहितीचे संकलन केले. श्री नरेंद्रनाथ महाराजांनी १९९३ च्या महाशिवरात्री च्या पावन पर्वावर चैतन्य श्री व्यंकटनाथ महाराजांच्या पूर्ण कृपेने आणि आज्ञेने नाथ शक्ती पिठाच्या माध्यमातून अखंड गुरुपरंपरेच्या पुढील पर्वाचा प्रारंभ केला. वेदमंत्रांच्या माध्यमातून भाग्याचे पुनरूज्जीवन या ब्रीद सूत्राला घेऊन नाथ शक्ती पीठ कार्य करीत आहे. आजवर श्री नरेंद्रनाथ महाराजांनी ७ अतिसौरी महायाग आणि ८०० हून अधिक यज्ञ यागांचे आयोजन जनकल्याणांचा संकल्प घेऊन संपन्न केले आहे. नाथपंथाचा प्रसार आणि प्रचार कार्यासाठी त्यांनी सबंध भारतभर प्रचार दौरा केला आहे. शुध्द पर्यावरण , तसेच देव देश आणि धर्मासाठी सज्जनशक्तीच्या संघटनाचा संकल्प हाती घेऊन ते कार्यरत आहेत. आत्मोन्नती हा प्रत्येक जीवाचा अधिकार आहे. त्यासाठी प्रथम श्रीगुरु मार्गदर्शनात राहून शरीर शुद्ध करावे आणि शुद्ध शरीराकडून उचित अशा कर्मांनी आत्मोन्नतीचा प्रयास साधावा यासाठी यासाठी त्यांनी हजारोंच्या संख्येत जिज्ञासुंना प्रत्यक्ष रूपाने मार्गदर्शन केले आहे आणि करीत आहेत. प्रत्येक जीव हा आध्यात्मिक , धार्निक , नैतिक , सांस्कृतिक , अपारंपरिक शिक्षणानी संपन्न झाला पाहिजे या साठी त्यांनी विशेष अशी उपसना पध्दती विकसित केली आहे. सध्या श्री नरेंद्रनाथ महाराजांचे वय ८७ वर्षांचे आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. वयोमान व प्रकृतीच्या मर्यादा लक्षात घेऊन आयोध्येच्या कार्यक्रमाचे दरम्यान होणारी धावपळ त्यांचे प्रकृतीमानास सहन होणार नाही असे लक्षात आल्यामुळे न्यासाने परमपूजनीय श्री नरेंद्रनाथ महाराजांच्या वतीने त्यांचे कृपांकित शिष्य शक्तिपीठाचे डॉक्टर श्रीकांत शास्त्री गदाधर यांना प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यासाठी आमंत्रित केले आहे.
सावरगाव महाराष्ट्र , येथील महामहोपाध्याय श्री यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे हे त्यांचे विद्या गुरु आहेत. वैदिक आणि ज्योतिष शास्त्रातील त्यांचे ज्ञानाचा गौरव म्हणून हत्तीवरून मिरवणुकीचा मान त्यांना बहाल करण्यात आला होता. न्यासातर्फे आयोध्या येथील ऋग्वेद स्वाहाकार या धार्मिक सोहळ्यासाठी देखील त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र नाथशक्तीपिठातील मकर संक्रमणाच्या हवनाचा आणि श्री गुरु कार्याचा भाग लक्षात घेता त्यांनी विनम्रपणे या अयोध्येचे आमंत्रण बाजूला ठेवले होते. मात्र प्रभू रामचंद्र यांच्या सेवे करता महाराजांचे शिष्य म्हणून व वैयक्तिक रित्या त्यांना प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात उपस्थित राहण्याचे भाग्य प्राप्त झाले आहे. श्री दत्त जयंतीच्या दरम्यान अयोध्येहून आमंत्रण अक्षतांचा मंगल कलश नाथशक्तिपीठामध्ये भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आला होता.. या कार्याची दखल घेऊन सर्व गुणसंपन्न व नाथ शक्ती पिठाजवळच वास्तव्यास असलेले समाजसेवक स्वप्नील रोम यांनी या कार्यक्रमाचे औचित्य साधून वरील सर्व बाबींना प्रोत्साहन दिले याकरिता स्वप्निल रोम यांनी अथक परिश्रम घेतले.. त्यामुळे स्वप्निल रोम यांचे जिल्ह्यातूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुक होत आहे…