Akola: राज राजेश्वर कावड यात्रेनिमित्त अनेक वाईट प्रवृत्ती कडून…
२२ ऑगस्ट 2022
अकोला: आज अकोला शहरांमध्ये अनेक वर्षापासून परंपरागत राज राजेश्वर कावड यात्रा संपन्न होत आहे त्यानिमित्ताने यात्रेमध्ये जिल्ह्यातील गाव पातळीवर असंख्य भाविकांचा समावेश असून अतिशय उत्साहाने आनंदाने या कावड यात्रेमध्ये भाविकांचा सहभाग असतो. परंतु ही कावड यात्रा अकोला अकोट रोडवरील गांधीग्राम येथील पूर्णा नदीवरून कावळ मध्ये पाणी भरून अनेक भाविक 25 ते 30 किलोमीटर चालत येत असतात त्यादरम्यान अकोट अकोला रोड वरील भाविकांच्या गर्दीमुळे वाहनांची सर्व प्रकारची वाहतूक ही बंद केली जाते परंतु अति आवश्यक सेवा ॲम्बुलन्स किंवा आरोग्य विषयक खाजगी वाहने यांना कमी वेळेत अकोला जिल्हा रुग्णालय येथे पोहोचण्याकरिता भाविकांच्या अनियोजित गर्दीमुळे अकोला जिल्हा रुग्णालय येथे पोहोचणे शक्य होत नाही व त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही तसेच भाविकांच्या गर्दीमध्ये सहभागी असलेल्या काही वाईट प्रवृत्ती कडून वाहनांची तोडफोड करणे लाथा बुक्क्या मारणे दारू पिऊन शिवीगाळ करणे अशा अनेक गंभीर कृत्य भाविकांमधील काही वाईट प्रवृत्ती कडून केल्या जाते परंतु त्यामुळे काही वाईट प्रवृत्ती कडून केल्या जाणाऱ्या या गंभीर कृत्यामुळे कावड यात्रा व त्यामध्ये श्रद्धेने मनापासून समाविष्ट असलेले भाविक यांना सुद्धा बदनामीचा सामना करावा लागतो अशीच एक घटना काही दिवसापूर्वी धारगड यात्रेनिमित्त श्रीहरी हॉटेल समोर अकोट येथे घडली आहे . भाविकांच्या एका ट्रॅक्टर मुळे दोन तास श्रीहरी हॉटेल समोर संपूर्ण ट्राफिक खोळंबली होती व रस्त्यावर उभे असलेल्या एसटी बसला भाविका मधील काही वाईट प्रवृत्तींनी लाथा बुक्क्या मारल्या व किरकोळ वादामुळे दोन तास संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडली होती त्यामुळे ह्या सर्व अडचणी लक्षात घेऊन दिनांक ५ ऑगस्ट 2022 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांना प्रत्यक्ष भेटून वरिष्ठ पत्रकार मंडळी त्यामध्ये रविराज मोरे,स्वप्निल रोम, अकबर खान, अनुराग, ज्ञानदेव मांडवे, जया भारती यांनी अकोला ते गांधीग्राम प्रत्येक एका किलोमीटरवर आपले पोलीस यंत्रणा किंवा कमीत कमी एक पोलीस कर्मचारी हजर असावा व वाहतूक व्यवस्था नियमित राहून यात्रेकरूंना व त्यांच्याकडून होणारा वाहनांना त्रास याचे नियोजन होऊन वारंवार पोलीस गस्त संपूर्ण गांधीग्राम पासून ते अकोला शहरापर्यंत कायम असावी की जेणेकरून अत्यावश्यक सेवा, आरोग्य विषयक सेवा यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये असे निवेदन दिले. या संबंधित डीवायएसपी मोनिका राऊत यांनी या सर्व अडचणीचा विचार करून तात्काळ दिलेल्या निवेदनाची अंमलबजावणी होईल असे आश्वासन दिले…