INDIA NEWS

Press

Akot: मुन्ना अग्रवाल ची कार्यपद्धती संशयास्पद- शशिकांत अग्रवाल च्या मुजोरी मुळे शहरातील अनेक बांधकाम व्यवसायिक अडचणीत…

Salim Khan 2 Oct 2023

आज महात्मा गांधी जयंती निमित्त सर्वत्र देशभरात स्वच्छता अभियान राबवण्याचे कार्य सर्व स्थानिक पातळीवर सुरू आहे या निमित्ताने प्रत्येक शहराचे नैसर्गिक सौंदर्य टिकवून ठेवण्याचे आपले सर्वांचे कर्तव्य असून तशा प्रकारचे शासकीय यंत्रणांकडून आवाहन सुद्धा वेळोवेळी दिले जाते. त्याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणून शहरातील नैसर्गिक सौंदर्य खराब करण्याला जास्तीत जास्त जबाबदार बांधकाम व्यवसायिक असून अवैध बांधकामे करून खूप मोठ्या प्रमाणात अनैसर्गिक छेडछाड हि बिल्डर माफियांकडून होत आहे..व यांना मूकसंमती देऊन स्थानिक नगर प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी यांचे प्रोत्साहन सुद्धा या सर्व प्रकाराला जबाबदार आहे .. नियमबाह्य अतिक्रमणे रस्त्यावर उभे असणारे वाहने पार्किंगची कमतरता बिना पार्किंगची बांधकामांना प्रोत्साहन अशा अनेक कारणांमुळे शासनाचे स्वच्छता अभियान याला आळा घालण्याचे काम भ्रष्ट व अनेक वाईट प्रवृत्ती कडून सतत होताना दिसत आहे या अवैध बांधकाम व बिल्डरांच्या मुजोरीमुळे स्वच्छता अभियान यशस्वीरित्या पार पडताना दिसत नाही…

अकोट: शहरातील आयुष्यभर अवैध बांधकामे करून खोटी आश्वासने देऊन अनेक गोरगरिबांची सतत फसवणूक करणारा बांधकाम व्यवसायिक शशिकांत अग्रवाल उर्फ मुन्ना अग्रवाल..

Akot: मधील गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर म्हणून ओळखल्या जाणारा मुन्ना अग्रवाल उर्फ शशिकांत अग्रवाल हा रस्ते बांधकाम व्यवसायात सपशेल अयशस्वी ठरलेला मुजोर कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्या या हेकेखोर स्वभावामुळे अपार्टमेंट बांधकाम व्यवसायात सुद्धा मागील दहा वर्षापासून सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून वादग्रस्त ठरलेला आहे एकही अपार्टमेंट किंवा बांधकाम हे पूर्ण केलेले नाही सर्व बांधकामे अपूर्ण व वादग्रस्त करून ठेवलेले आहेत त्यामुळे बांधकाम व्यवसायातील इतर अनेक बिल्डर लोकांची प्रतिमा या मुन्ना अग्रवाल मुळे खराब झाल्याची दिसून येते अग्रवाल मुळे शहरातील विख्यात असलेले इतर बांधकाम व्यवसायिक यांच्यावर सुद्धा अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत.. मुन्ना अग्रवाल याची कार्यपद्धती ही सर्व स्तरांवर संशयास्पद असून आज पर्यंत शहरांमध्ये अग्रवाल यांने बांधकाम केलेले अपार्टमेंट व इतर बांधकामाची कोणतीही परवानगी ही नगरपरिषद मधून नियमानुसार घेतलेली नाही त्याचप्रमाणे बांधकाम पूर्ण झाल्याचे कॉम्प्लिशन सर्टिफिकेट सुद्धा नगरप्रशासनाकडे दिले नसून भोगवटा प्रमाणपत्र व ॲक्युपॅन्सी सर्टिफिकेट उपलब्ध करून दिले नाही तसेच मुन्ना अग्रवाल ने आजपर्यंत एकाही बांधकामाचे पूर्णत्वाचे सर्टिफिकेट हे नगरपरिषदच्या रेकॉर्डवर उपलब्ध होऊ दिले नाही त्यामुळे मुन्ना अग्रवाल ने शहरांमध्ये आजपर्यंत जेवढे बांधकाम केलेले आहेत त्याची नगर परिषद च्या दप्तरी कायदेशीर नोंद नाही हे सर्व बांधकामे आजही अपूर्ण व नियम बाह्य असल्याचे दिसून येतात त्यामुळे नैसर्गिक आपत्ती आल्यास या नियमबाह्य बांधकामांमध्ये कुठल्याही स्वरूपाची जीवित हानी झाल्यास याला शासकीय यंत्रणा प्रशासन जबाबदार राहणार नाही असे अपार्टमेंट अॅक्ट 1971 च्या कायद्यानुसार सांगितले जाते तसेच वरील सर्व कागदपत्रे नसल्यामुळे खरेदी विक्री करण्यास सुद्धा अडथळा निर्माण होतो त्याचप्रमाणे बँकेचे कर्ज सुद्धा अशा फ्लॅट धारकांना किंवा दुकानदारांना नाकारण्यात येत आहे मोफा अॅक्ट 1965 व रेरा नोंदणी असलेले बांधकाम व्यावसायिक यांनाच प्राधान्य देण्यात आलेले आहे त्यामुळे मुन्ना अग्रवाल च्या कार्यपद्धतीमुळे शहरातील इतर अनेक बांधकाम व्यवसायिक यांच्यावर ग्राहकांकडून शंका व प्रश्न उपस्थित होत आहेत त्यामुळे नवीन फ्लॅट, गाळा किंवा दुकान, डुप्लेक्स विकत घेताना संबंधित सर्व कागदपत्रे पडताळून पाहण्याची गरज आहे अन्यथा आपली लाख मोलाची आयुष्यभराची कमाई या बांधकाम व्यावसायिकांना सुपूर्द करून अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ठ करून कोर्टात दहा-पंधरा वर्ष फ्लॅट धारकांना झुलवत ठेवण्याचे प्रकार बिल्डरांकडून सतत सुरू आहेत…

त्यामुळे सर्व फ्लॅट धारक मेटाकुटीस आलेले असून जवळपास शहरातील सर्वच बांधकाम व्यवसायिक (बिल्डर्स) विरोधात रोष व्यक्त करीत आहेत एवढेच नव्हे तर या भ्रष्ट बिल्डर माफियांकडून नगर प्रशासनाला फसवून अनेक अवैध बांधकामे शहरांमध्ये सुरू आहेत.. त्यामुळे वरील सर्व कागदपत्रे असल्याशिवाय ग्राहकांनी कोणत्याही बिल्डरांकडून डुप्लेक्स, फ्लॅट,गाळा, दुकाने व सर्वांना पुरेपूर वापरण्यासाठी असलेले पार्किंग तसेच लिफ्ट चे भविष्यातील मेंटेनन्स ची व्यवस्था कायमस्वरूपी असावी किंवा सोसायटी रजिस्टर करून घेणे ह्या सर्व गोष्टी उपलब्ध असतील तरच खरेदी विक्री करावी बांधकाम अपूर्ण स्थितीत असताना फक्त बिल्डरांच्या शब्दावर त्यांच्या वचनावर विश्वास न ठेवता वरील सर्व गोष्टी उपलब्ध करून दिल्यानंतरच फ्लॅट, डुप्लेक्स, गाळा किंवा दुकाने खरेदी विक्री करावी ही प्रत्येक ग्राहकांची स्वतःची जबाबदारी आहे अन्यथा खूप मोठ्या प्रमाणात आपली फसवणूक होऊन पश्चाताप करण्याची वेळ येईल.. वरील सर्व कागदपत्रे फ्लॅट धारकांना इतर ग्राहकांना तसेच नगर प्रशासनाला सुद्धा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही संपूर्णपणे बांधकाम व्यवसायिक(बिल्डर) याची असते बिल्डर कडून मिळालेल्या खोट्या आमिषाला बळी न पडता संपूर्ण बांधकाम पूर्ण झाल्यानंतर व सर्व सुविधा मिळाल्यानंतरच कोणतेही आर्थिक व्यवहार करावे असे आवाहन वेळोवेळी महाराष्ट्र शासनाने व जिल्हा प्रशासनाने केलेले आहे.. यापूर्वी चा इतिहास पाहता अनेक अपार्टमेंट, कॉम्प्लेक्स हे नैसर्गिक आपत्तीमुळे पडल्याने उभ्या महाराष्ट्रात अनेक जीवित हानी झालेल्या आहेत त्यामध्ये शासनाने फक्त आणि फक्त बांधकाम व्यवसायिक याच्यावर तुटपुंजी कारवाई करून बिल्डरला जबाबदार ठरवून स्पष्टपणे हात झटकलेले आहेत परंतु यामध्ये अनेक परिवार रस्त्यावर आले आहेत त्यांचे नुकसान कधीच न भरून निघणारे आहे आज असे बेघर झालेले कुटुंब कुठे आहेत त्यांचा वाली कोण आहे याचा थांगपत्ता कुणालाच ठाऊक नाही अपार्टमेंटमधील फ्लॅटच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करून आयुष्यभराची पुंजी हे बिल्डर विश्वासात घेऊन खोटी वचने देऊन अगदी व्यवस्थितशिरपणे नियमांचे बारकावे ग्राहकांना माहिती नसल्यामुळे फसवणूक करीत आहेत ..याचाच फायदा घेत मुन्ना अग्रवाल सारखे अनेक बिल्डर लोकांच्या भावनांशी खेळ खेळत असून मोकाट फिरत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish