अकोट शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधिक्षक बच्चन सिंग गंभीर
RaviRaj 30 March 2025

अकोला जिल्ह्यातील अकोट हे संवेदनशील म्हणून ओळखल्या जाते अकोट शहराचा पूर्व इतिहास हा घातक असल्यामुळे रमजान ईद च्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिक्षक बच्चन सिंग यांनी सुद्धा अकोट शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सर्वप्रथम प्राधान्य दिले आहे त्याकरिता काल श्रीहरी हॉटेलमध्ये रमजान ईद सह पुढील सर्व उत्सव कोणतेही गालबोट न लागता पार पडावे याकरिता मार्गदर्शन केले यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल सह विभागातील पोलीस स्टेशनचे सर्व ठाणेदार उपस्थित होते पोलीस अधिक्षक बच्चन सिंग यांचे आवाहन हे तळागळातील जनतेपर्यंत पोहोचवण्याकरिता सर्व इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडिया उपस्थित असणे गरजेचे होते परंतु नेहमीप्रमाणे गोपनीय विभागातून कोणतीही पूर्वसूचना पत्रकारांना मिळाली नसल्यामुळे अनेक पत्रकारांनी या महत्वपूर्ण मीटिंग कडे पाठ फिरवली
यादरम्यान मीटिंग आटपून बच्चन सिंग यांचा ताफा अकोला पोहोचताच लोहरी रोडवर स्थित असलेल्या ग्राउंडवर अनमोल मित्तल सह शहर व ग्रामीणचे ठाणेदार यांनी काही कर्मचाऱ्यांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला यावेळी दहा ते पंधरा कर्मचारी सोबतच गोपनीय विभागाचे प्रमुख सुद्धा या खेळात सहभागी होते अकोट पोलिसांचा क्रिकेट खेळण्याचा आनंद पाहून आजूबाजूच्या रहिवाशांनी सुद्धा आश्चर्य व्यक्त केले या खेळामुळे अनेक कर्मचाऱ्यांचे वाढलेले पोट हे या निमित्ताने कमी होईल याचे समाधान सुद्धा व्यक्त केले परंतु रमजान ईद च्या बंदोबस्त करिता इतर जिल्ह्यातील पोलीस एस आर पी व इतर अनेक प्रकारच्या तुकड्या अकोट येथे तैनात केल्या जातात कधी काळी तर पोलीस कर्मचाऱ्यांना 48 ते 72 तास सतत कर्तव्यावर हजर राहावे लागते मात्र स्थानिक जबाबदार वरिष्ठ अधिकारी व महत्त्वाची भूमिका बजावणारे गोपनीय विभाग सुद्धा क्रिकेट खेळण्याचा आनंद घेत असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या आहेत क्रिकेट खेळणे किंवा इतर कोणताही खेळ खेळणे हा आरोग्यासाठी अतिशय चांगला व उत्तम पर्याय आहे आणि तो पोलीस कर्मचाऱ्यांसाठी तर फार आवश्यक आहे परंतु अशावेळी रमजान ईद तोंडावर असताना हा खटाटोप करणे हे चुकीचे लक्षण असल्याचे निरीक्षण अनेकांनी नोंदवले आहे तसेच वैयक्तिक आरोग्यासाठी पोलीस कर्मचारी क्रिकेट खेळण्यासाठी जात असल्यास शासकीय गाड्यांचा वापर करणे हे कितपत योग्य आहे हा जनतेच्या पैशांचा अपव्यय सुरू असल्याची कुजबुज शहरात सर्वत्र सुरू झाली आहे काल घडलेल्या या सर्व प्रकारामुळे अकोट पोलीस यंत्रणा किती गंभीर आहे हे दिसून येते शहराचा मागील इतिहास पाहता आकोटकर मात्र या अधिकाऱ्यांच्या अशा या मनमानी कार्यपद्धतीमुळे जाणीवपूर्वक भरडल्या जात असून पोलीस यंत्रणेकडून जनसामान्यांनी अपेक्षा ठेवायच्या की नाही असा प्रश्न उपस्थित झालेला आहे