Akot : पाटील महिला मंडळ आयोजित संक्रांत महोत्सवाला उदंड प्रतिसाद..
Raviraj 12 February 2024
AKOT: श्री श्रेत्र श्रध्दासागर येथे दि.11 फेब्रुवारी
रविवार ला संत वासुदेव महाराज संस्थान श्री श्रेत्र श्रध्दासागर अकोट येथे पाटील महिला मंडळ अकोट यांनी ” सोहळा सुहवासीनीचा,, महिलांच्या आनंदाचा ,,” हा हळदीकुंकू चा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्या कार्यक्रमा मध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धे मधे शेकडोच्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या त्या मधे किरण सुरेन्द्र वसु ,मेघा ताई झामरे, निताताई नारे, सुलभा रेळे, वैशाली सपकाळ, मोनीका नाथे, गौरी राठोड, योगीता नवलकार, सोनटक्के. या महिला विजेत्या ठरल्या. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे डॉ. मेघना ताई पोटे, प्राध्यापिका भाऊसाहेब पोटे कॉलेज अकोट ,माधुरी ताई देशमुख प्राध्यापिका का शिवाजी कॉलेज अकोट तसेच परिक्षक म्हणून स्नेहा ताई हिंगणकार ब्युटीशियन ,दिपीका ताई ठक्कर पाक कला पारंगत या होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाच्या सचिव सौ सुषमा नरेंद्र कुकडे यांनी केले तर या मंडळाच्या संस्थापिका स्नेहल ताई तराळे यांची प्रमुख उपस्थिती होती तर मंडळाच्या अध्यक्षा सौ पदमा ताई हिंगणकार उपाध्यक्ष सौ मिनाक्षी ताई आडे, श्यामल जायले, कोष्याध्यक्ष कल्पना अहेरकर , सौ. स्वातीताई विजय शिंदे, रंजना ताई मोरे, सारीका ताई दौंड, ईंद्रावती पाचडे, तर आभार शितल ताई तायडे यांनी केले तसेच मंडळाच्या सर्व महिलानी कार्यक्रम खुप छान प्रकारे पार पाडला. कार्यक्रमाला सर्व स्तरावरील शेकडो महिलांनी उपस्थिती लावली..