अकोट पोलिसांना झाले तरी काय !आरोपी मोकाट अन् पोलीस आंत..गरिबांचा जीव घेणार ! तर 420 चा आरोपी मोकाट फिरणार..
RaviRaj 12 May 2024
गेल्या पाच महिन्यापासून फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल असूनही आसाम दंगल मधील कुख्यात आरोपी जाकीर शाह रशीद शाह हा अकोट पोलिसांच्या छातीवर बिनधास्तपणे शहरात वावरतोय.. फिर्यादी महिलांना धमक्या देतोय पोलीस माझे काहीच करू शकत नाहीत तक्रारी मागे घ्या अन्यथा तुम्हाला आकोटात मी जगू देणार नाही.. अशा प्रकारचा दबाव जाकीर शाह कडून येत आहे..कुख्यात असलेला आंतरराष्ट्रीय गुंड लॉरेन्स बिश्नोई चे कनेक्शन उघडकीस आणणारे अकोट पोलीस जाकीर शाहला अटक करण्याच्या बाबतीत इतके उदासीन का आहेत..
कुणाच्या दबावाखाली अकोट पोलीस काम करीत आहेत.. दोन वेळच्या जेवणाची सोय नसलेला जाकीरशाह रशीदशाह पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांना हात जोडून तक्रारदार महिलेचे पैसे परत करतो अशी हातावर तुरी देणारा जाकीर शाह पुन्हा तोच फार्मूला पोलिसांसमोर वापरताना दिसत आहे त्याकरिता मध्यस्थी करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष व विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशा अनेक प्रकारच्या दिग्गज मंडळींना हाताशी धरून प्रयत्न करीत आहे परंतु जाकीरशाह याची नियत संपूर्ण जिल्ह्यातील नेते मंडळींना चांगली ठाऊक आहे त्यामुळे कोणताही नेता जाकीर शाह याची मध्यस्थी करण्यास तयार नाही.
https://www.facebook.com/share/v/uBVEczjTJn7g6CAY/?mibextid=xfxF2i link touch kara 👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
प्रकरण संपवण्यासाठी गेली तीन वर्षापासून घर विकण्याचे कारण देऊन फसवणूक केलेल्या अनेकांना तात्काळत ठेवले परंतु दोन वर्षात दोन वेळा स्वतःचे राहते घर विकून भाड्याच्या घरात राहणारा व चोहट्टा येथील नंदू राणे यांच्या शेतावर अवैध ताबा घेऊन करोडपती होण्याचे स्वप्न बघणारा जाकीर शाह याला अकोट पोलिसांची सहानुभूती का? असे अनेक प्रश्न तक्रारदार यांना उपस्थित झाले फिर्यादी महिलेने कुख्यात अशा आसाम दंगल मधील असलेला मुख्य आरोपी जाकीर शाह यांच्या विरोधात हिम्मत करून 25 जानेवारी 2024 ला कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणारे पोलीस प्रशासनावर विश्वास ठेवून न्याय मिळेल या अपेक्षेने तक्रार दिली परंतु गुन्हे दाखल होऊन पाच महिने उलटून गेल्यावरही आकोट पोलीस आरोपी जाकीर शाह याला अटक करण्यास अपयशी ठरले..
अकोट पोलिसांच्या वेळ काढू पणामुळे जाकीर शाह ला अटकपूर्व जामीन घेण्याकरिता पोलिसांकडून सूट देण्यात आल्याची दिसते.. अशा या पोलिसांच्या संशयास्पद कार्यपद्धतीचे वारंवार गेल्या काही दिवसापासून धिंडवडे निघत आहेत.. पोलिसांच्या या दुटप्पी भूमिके मुळे फिर्यादी महिलांनी कुणावर विश्वास ठेवायचा? शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणारे पोलिसांनीच एका निष्पाप जिवाचा बळी घेतला.. एका निराधार महिलेची आयुष्यभराची पुंजी व म्हातारपणाची काठी असलेला एकुलता एक मुलगा अकोट पोलिसांच्या दादागिरीमुळे कायमस्वरूपी गमवावा लागला त्यामुळे पोलिसांचे अस्तित्व धोक्यात असल्याचे दिसून येते. मारहाणीत जीव गेलेल्या परिवाराला न्याय देण्याचा प्रयत्न एकाही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून होताना दिसत नाही..
उलट आपल्या कर्मचाऱ्यांना वाचवण्याकरिता बदल्यांचा खेळ सुरू झालेला दिसत आहे..अशा परिस्थितीमध्ये अनेक महिलांना फसवणारा आसाम दंगल मधील कुख्यात गुंड गुन्हे दाखल होऊनही गेली पाच महिन्यापासून मोकाट फिरत असून पुन्हा त्याची हिंमत वाढून अनेकांची फसवणूक करण्यासाठी सज्ज झालेला असून पोलिसांच्या अशा संशयास्पद भूमिकेमुळे यापुढे कायदा हातात घेण्याची वेळ अनेक फिर्यादी मंडळीवर येईल व पुन्हा मागील काही घडामोडी पाहता अकोट पोलीसांचे अस्तित्व टिकवून ठेवणे हे आव्हानात्मक ठरेल.. अशी कुजबुज आता सर्वसामान्य जनतेकडून होताना दिसत आहे..