hacklink al hack forum organik hit kayseri escort casibom 895 com girispadişahbet güncel girişdeneme bonusu veren siteler463 marsbahisdeneme bonusu veren sitelersahabetdeneme bonusu veren sitelerviagra onlinetürbanlı porno izle izmir escortvaycasino1winbetbigobetmatiktipobetcasibomgrandpashabetistanbul escortmatbet girişmatbet

INDIA NEWS

Press

अकोट: प्रतीक्षा शेंगोकार (पर्यवेक्षिका) यांची तालुक्यातील अनेक अंगणवाड्यांना भेटीची प्रतीक्षाच !-सीडीपीओ व सीईओ यांचा खास आशीर्वाद..

RaviRaj 25 Feb 2023

राज्यातील अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलंय…. राज्यातील १६ जिल्ह्यांतील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस गेल्या तीन दिवसांपासून संपावर आहेत… तर काही जिल्ह्यांतील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आजपासून संपात सहभागी होणार आहेत. किमान समान कार्यक्रमाअंतर्गत भरीव स्वरुपाची मानधनवाढ करावी यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान, 28 फेब्रुवारीला राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत.

अंगणवाडी सेविका महाराष्ट्रभर करीत असलेले आंदोलन

परंतु या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पर्यवेक्षिका ,सीडीपीओ व उपमुख्य कार्यकारी अधिकारी सह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनामुळे अंगणवाड्या संपूर्ण बंद स्थितीत असल्याने या कर्मचाऱ्यांची मात्र अक्षरशः मौज सुरू आहे. याचे उदाहरण म्हणजे अकोला जिल्ह्यातील अकोट सर्कल मधील पर्यवेक्षिका प्रतीक्षा शेंगोकार यांची अनुकंपा तत्वावर मागील एक वर्षापासून अकोट सर्कल मध्ये नियुक्ती झालेली असून अंगणवाडी सेविकांच्या संपामुळेच नव्हे तर एक वर्ष उलटून गेले तरीही तालुक्यातील अनेक अंगणवाड्यांना प्रतिक्षा शेंगोकार यांनी भेट सुद्धा दिली नाही

अनेक गावातील अंगणवाड्या पर्यवेक्षिका प्रतीक्षा शेंगोकार यांच्या प्रतीक्षेत आहेत गृहभेटी, जन्म मृत्यू -कुपोषित बालके पोषण आहार तपासणी करणे अशा अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या पर्यवेक्षिका यांच्याकडे असतात परंतु नियुक्ती झाल्यापासून प्रतीक्षा शेंगोकार यांनी स्वतःचा मासिक अहवाल सुद्धा स्वतः भरलेला दिसत नाही तसेच पर्यवेक्षिका यांना नियमाप्रमाणे मुख्यालयावर निवासी राहायला पाहिजे परंतु प्रतिक्षा शेंगोकार ह्या अकोला रहिवाशी असून आपल्या स्वतःच्या चार चाकी गाडीमध्ये अकोट येथे जाणे येणे करीत असतात अनुकंपा तत्वावर नियुक्ती असलेले प्रतीक्षा शेंगोकार यांची एकाच वर्षात एवढी वेगाने आर्थिक प्रगती वरिष्ठांच्या आशीर्वादाने झाली असावी त्यामुळेच वरिष्ठ अधिकारी सुद्धा पर्यवेक्षिका यांच्या कार मध्ये सोबत प्रवास करताना नेहमी दिसतात तसेच वरिष्ठांनी देशाचे भविष्य घडवणाऱ्या अतिशय महत्त्वाच्या असलेल्या अंगणवाडी संस्था मधील योजनांचा खेळ व बाजार मांडलेला दिसतो आहे अशी कुजबुज सेविकांमध्ये सुरू आहे

दुसरीकडे दिवसभर अनेक समस्यांना तोंड देत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पडणाऱ्या सेविका व मदतनीस यांना फार तोडके मानधन असून ते सुद्धा नियमित होत नाही तीन महिन्यातून सहा महिन्यातून या सेविकांना मानधन शासनाकडून दिले जाते एकीकडे प्रतीक्षा शेंगोकार व वरिष्ठ अधिकारी यांना भरघोस पगार असून अंगणवाडी कडे बघायला सुद्धा या कर्मचाऱ्यांना वेळ नाही आणि दुसरीकडे अंगणवाडी सेविका मदतीस यांच्या महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या असून त्या आपल्या देशाचे भविष्य असणाऱ्या लहान बाळांचे संगोपन इमानदारीने पार पडत आहेत तरीही सेविकांच्या भावना जाणून घ्यायला शासनाकडे वेळ नाही हा अन्याय असह्य होत असल्यामुळे मानधनाच्या प्रश्नाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय..

या अनुषंगाने आक्रमक पवित्रा घेत 28 फेब्रुवारीला राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish