अमरावती : भातकुली नगरपंचायत आयुक्त करिष्मा वैद्य यांना २०००० हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात अटक..
मोहन पांडे 11 NOV 2022
भातकुली : यातील 42 वर्षीय महिला तक्रारदार यांनी दिनांक 31/10/2022 रोजी लेखी तक्रार दिली की नगरपंचायत भातकुली येथील मुख्याधिकारी श्रीमती करिष्मा वैद्य यांनी तक्रारदार यांना भातकुली येथील दुकानांमध्ये शिलाई मशीन प्रशिक्षण व गारमेंटचा व्यवसाय सुरू करण्याकरिता ना हरकत प्रमाणपत्र देण्या साठी 50,000 रुपये लाचेची मागणी करीत असल्याबाबत लेखी तक्रार प्राप्त झाली.
सदर तक्रारीवरून दिनांक 2/11/2022 रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कार्यवाही दरम्यान मुख्याधिकारी श्रीमती करिष्मा वैद्य यांनी तक्रारदार यांना भातकुली येथील दुकानांमध्ये शिलाई मशीन प्रशिक्षण व गारमेंटच्या व्यवसाय सुरू करण्याकरिता ना हरकत प्रमाणपत्र देण्याकरिता 50,000/- रुपये लाचेची मागणी करून त्यापैकी 20,000/- रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर दिनांक 10/11/2022 रोजी आयोजित करण्यात आलेल्या सापळा कार्यवाही दरम्यान यातील आलोसे यांनी तक्रारदार यांना त्यांचे घरी पैसे घेऊन येण्यास सांगितले वरून आज दिनांक 11/11/2022 रोजी आयोजित करण्यात आलेल्या सापळा कार्यवाही दरम्यान आलोसे श्रीमती करिष्मा वैद्य यांनी 20,000/- रुपये लाच रक्कम स्वीकारल्याने मा. श्री. मारुती जगताप, पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अमरावती. यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले नमूद आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन खोलापूरी गेट अमरावती शहर येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.