अमरावती : जात पडताळणी समितीला चपराक!-दिव्या चावडा हिचे गुजराती मोची (sc) जात प्रमाणपत्र कायम ठेवण्याचे नागपूर उच्च न्यायालयाचे आदेश..
RaviRaj 17 Jun 2023
अमरावती : आज एक ऐतिहासिक निर्णय मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिव्या मुकेश चावडा विरुद्ध महाराष्ट्र शासन जिल्हा जात पडताळणी समिती अमरावतीच्या प्रकरणांमध्ये दिला आहे मुळात प्रकरण असे आहे की दिव्या मुकेश चावडा ही अमरावती येथील मनिबाई गुजराती या शाळेची विद्यार्थीनी आहे. विज्ञान शाखेमध्ये शिकत असताना तिच्या जात प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी प्रस्ताव मनिबाई गुजराती शाळेने जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अमरावती कडे दिला होता जेव्हा प्रस्ताव समिती समोर आला समितीने सदर अर्जदाराने दिलेल्या कागदपत्रांची शहानिशा न करता व त्याची दखल न घेता अमरावती जात पडताळणी समितीने समस्त गुजराती समाज विरुद्ध केंद्र सरकार या खटल्याचा एक आधार घेत दिव्या मुकेश चावडा यांचे उपविभागीय अधिकारी अमरावती यांचे गुजराती मोची (sc) हे जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा आदेश दिला
परंतु दिव्या चावडा हिने शासनाची चुकीची धोरणे व जात पडताळणी समितीचा ढिसाळ कारभार यांच्याविरुद्ध जिद्दीने चिकाटीने शक्य फाउंडेशन अमरावती यांच्या मदतीने अमरावती जात पडताळणी समिती व उपविभागीय अधिकारी अमरावती यांच्याविरुद्ध थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठांमध्ये धाव घेतली व मागील जवळपास एक दीड वर्षाचा संघर्ष करीत अखेर दिव्या चावडा यांचे गुजराती मोची (sc) जात प्रमाणपत्र कायम ठेवून जात पडताळणी समिती अमरावती यांना गुजराती मोची (sc) जात प्रमाणपत्र तात्काळ दिव्या चावडा यांना देण्याचे आदेश 29 मे 2023 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत यामध्ये नागपूर उच्च न्यायालय येथील जेष्ठविधीज्ञ अॅड सिद्धांत घट्टे यांनी या प्रकरणाची संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पार पाडून दिव्या चावडा यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील गुजराती मोची समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे व हा एक देशभरातील गुजराती मोची समाजाकरिता ऐतिहासिक निर्णय समजल्या जात आहे अशा जात प्रमाणपत्रामुळे वंचित असलेल्या अनेक कुटुंबांकडून या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत केले जात आहे त्यामुळे अमरावती येथील बुधवारा मध्ये राहणारे गुजराती चावडा कुटुंबामध्ये सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे..