INDIA NEWS

Press

आमचं अकोट तेल्हारा पुरस्कृत “आम्हाला स्थानिक आमदार हवा” या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद..मतदार संघाला विकासाची दिशा देणारा उपक्रम..

RaviRaj 31 July 2024

विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या कार्यपद्धतीवर भाजप चे व शिंदे गटाचे कार्यकर्ते नाराज.

! आमचं अकोट तेल्हारा ! पुरस्कृत “आम्हाला स्थानिक आमदार हवा” या उपक्रमाला आकोट तेल्हारा मतदारसंघातील अनेक सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती..

अकोट मधील विख्यात असलेले नवनीत लखोटिया यांना सुद्धा विद्यमान आमदारांच्या कार्यपद्धतीमुळे भरपूर मानसिक त्रास सहन करावा लागत आहे..

सोबतच अकोट विधानसभा मतदारसंघातील सर्व दिग्गज पत्रकारांची या विशेष उपक्रमातील चर्चासत्राला हजेरी लागली ..

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एकनिष्ठ कार्यकर्ते जलील इनामदार यांनी सुद्धा विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे यांच्याविरुद्ध रणशिंग फुकले आहे ..

यामध्ये पत्रकारांनी अकोट तेल्हारा विधानसभा मतदारसंघातील ज्वलंत प्रश्न उपस्थित करून मागील दहा वर्षातील प्रलंबित असलेले अतिशय महत्त्वाचे प्रश्न पुन्हा एकदा या चर्चासत्राच्या माध्यमातून ऐरणीवर आले..

विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे यांनी आपला बोरिया बिस्तरा बांधून ठेवावा.. अकोट तेल्हारा मतदार संघात फक्त आणि फक्त महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून येणार..
🔥 अजहर शेख माजी नगरसेवक🔥
वेगवेगळ्या संघटनांनी पुढाकार घेत आमचं अकोट तेल्हारा या उपक्रमाचे भरभरून स्वागत केले आहे..

यामध्ये अतिशय महत्त्वाची असलेली अकोट खांडवा रेल्वे , सुतगिरणी कामगार, रस्ते, शेतकऱ्यांच्या समस्या, अघोषित लोड शेडिंग,

नगरपालिकेची मनमानी, नवीन तहसील कार्यालया मध्ये सुविधांचा अभाव ,नवीन ग्रामीण रुग्णालयाचे उद्घाटन करूनही थंड बस्त्यात असणारे काम ..

विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे यांना आठवे आश्चर्य घोषित करावे.. स्मशानभूमीच्या उपोषणाची इतिहासात नोंद..

विद्यमान आमदारामुळे अधिकाऱ्यांची वाढलेली हिंम्मत, सर्व कार्यालयातील अधिकाऱ्यांचा सुरू असलेला मनमानी कारभार अशा अनेक गंभीर विषयाला पत्रकारांनी हात घातला ..

अकोट तेल्हारा मतदारसंघातील विकास होताना मी मागील दहा वर्षापासून बघितलेलं नाही.. सुरेश अग्रवाल ज्येष्ठ समाजसेवक..

म्हणूनच “आम्हाला स्थानिक आमदार हवा”या चळवळीची अत्यंत गरज असल्याचे मत अनेक पत्रकारांनी सुद्धा व्यक्त केले..

तसेच भाजपमधील मागील दहा वर्षापासून नाराज असलेले व विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या हुकुमशहा कार्यपद्धतीला कंटाळून अनेक आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी या चर्चासत्रामध्ये पुढाकार घेतला

आमचं आकोट तेल्हारा अंतर्गत “आम्हाला स्थानिक आमदार पाहिजे” ही चळवळ यशस्वी.. तळागळातून उत्स्फूर्त प्रतिसाद..

व वरिष्ठांना विद्यमान आमदाराचा अकोट मतदार संघात खूप जास्त प्रमाणात अतिरेक होत आहे.. हा संदेश देण्याचा प्रयत्न या चर्चासत्रांमधून केला आहे..

भाजप पक्षाने तळागळातील धडाडीचे कार्यकर्ते राजेश पाचडे यांना एकदा संधी द्यावी.. विनोद खंडारे माजी पंचायत समिती सदस्य..

तसेच 2014 पर्यंत अकोट तेल्हारा भाजप संघटन अतिशय मजबूत होते परंतु

आमदार प्रकाश भारसाकळे हे आमदार झाल्यापासून मागील दहा वर्षात पक्ष संघटन हे पूर्णपणे विखुरले गेले आहे

विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे यांचे विरुद्ध सर्वांना एकत्र येणे गरजेचे.. लोकसभेला झालेली चूक येणाऱ्या विधानसभेला दुरुस्त करू..

पक्षांतर्गत गटबाजीला प्रकाश भारसाकळे यांनी पूर्णपणे प्रोत्साहन दिले आहे

मतदारसंघात अनेक सक्षम व अनुभवी उमेदवार नेतृत्व करण्यास तयार उपऱ्या उमेदवाराला घरी पाठवून देण्याची हीच ती वेळ..

असा पदाधिकाऱ्यांचा आक्रोश “आम्हाला स्थानिक आमदार हवा”या उपक्रमांतर्गत झालेल्या चर्चासत्रात समोर आला

विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे यांची कार्यपद्धती अतिशय बोगस.. मतदार संघ हा दहा वर्षांनी मागे पडला..

यामध्ये आयोजक कनक कोटक, भाजपचे राजेश पाचडे , डॉ.अरविंद लांडे, मधुकरराव बोडखे, जलील इनामदार, संतोष राऊत,

सुनील गिरी, नंदू लोखंडे, निलेश तिवारी, व उबाठा गटाचे राम प्रभू तराळे, सोबतच वंचित चे केशव बिलबिले यांचा सहभाग होता..

येणाऱ्या विधानसभेला आमदार प्रकाश भारतापासून कुणालाही तिकीट द्यावं.. अन्यथा आम्ही तटस्थ राहणार

या कार्यक्रमाचे संचालन जया भारती व आशिष वानखडे यांनी केले व हा कार्यक्रम श्रीहरी हॉटेल अकोट येथे संपन्न झाला असून या कार्यक्रमाला विशेष सहकार्य लाभलेले

आमदार प्रकाश भारसाकळे यांनी पक्ष संघटन मजबूत न करतां फोडाफोडीचे राजकारण केले..

सामाजिक कार्यकर्ते रविराज मोरे यांनी ” आपलं आकोट तेल्हारा ही चळवळ अकोला जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात खूप मोठ्या स्वरूपात उभी करणार असल्याचे मत व्यक्त केले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish