अमरावती – छत्रपती सेना अमरावती यांचा प्रेरणादायी उपक्रम…
तेजेंद्र मंजलवार
अमरावती -15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व साधून व विशिष्ट स्वरूपात स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्याकरिता छत्रपती सेना अमरावती यांच्याकडून स्वातंत्र्य दिनाचे निमित्त साधून एक प्रेरणादायी उपक्रम 15 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी १० ते २ या वेळेत जनाई हॉल, नेताजी कॉलनी, येथे ब्लड कॅम्प शिबिर आयोजित केले आहे हा अनोखा व विशेष उपक्रम छत्रपती सेना अमरावती चे संस्थापक अध्यक्ष करण भैय्या शाहू, छत्रपती सेनेचे अमरावती जिल्हा अध्यक्ष आदित्य यादव तसेच या उपक्रमाचे छत्रपती सेनेचे तडफदार व युवा मार्गदर्शक तेजेंद्र मंजलवार, रितेश खुलसाम यांनी जास्तीत जास्त संख्येने ब्लड कॅम्प शिबिर ला यशस्वी करण्यासाठी सहभाग नोंदवावा व या विशेष उपक्रमातून स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व वाढवून सर्व अमरावती वासियांना व महाराष्ट्रातील तमाम जनतेला या माध्यमातून छत्रपती सेना अमरावती यांच्याकडून खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्याचा प्रयत्न दिसत आहे…