अरे कंत्राटदारांनो किती पिळून खाणार !आमदाराच्या टक्केवारीत किती भागीदार.. लोकनेते विशाल सोनोने यांचे गंभीर आरोप..
Salim Khan.. 30 june 2024
आकोट मतदार संघातील नागरिकांचे हाल बेहाल आहेत कुणीही या मतदारसंघात दखल घ्यायला तयार नाही.. जनावरापेक्षाही माणसाचे आयुष्य या नेते मंडळींच्या राजकारणाने खराब झालेले आहे संपूर्ण जनजीवन विस्कळीत करून टाकलेले आहे कोणत्याही प्रस्थापित नेत्याला अकोट मतदार संघातील शेतकऱ्याचे प्रश्न असो की रस्त्याचे, खताचे प्रश्न असो की बियाण्याचे याच्याशी काहीही देणे घेणे नसल्याचे मागील दहा वर्षापासून दिसून येत आहे..अशा गढूळ राजकारणात सामान्य हा होरपळून निघत आहे त्याचेच एक उदाहरण म्हणजे दोन दिवसांपूर्वी रविराज मोरे यांनी शेतकऱ्यांच्या तसेच अकोट अकोला रस्त्याच्या महत्त्वाच्या प्रश्नासाठी केलेले आमरण उपोषण हे चांगलेच गाजले.. उपोषणामुळे जिल्ह्यातील व अकोट मतदार संघातील लोकांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झाले..
लोकांमध्ये दहा वर्षापासून निर्माण झालेली निराशाजनक परिस्थिती ही रविराज मोरे यांच्या उपोषणाने काहीशी कमी झाली असल्याचे अनेकांनी नमूद केले..अनेकांनी रविराज मोरे हे एक दमदार व्यक्तिमत्व असून असे निडर पत्रकार आपल्या तालुक्याला लाभले त्याबद्दल रविराज मोरे यांचे आभार सुद्धा व्यक्त केले..एक सामान्य माणूस आपल्या अधिकारासाठी सरकार व प्रशासनाला वठणीवर आणू शकते.. त्याचप्रमाणे एका सामान्य माणसाची ताकद रविराज मोरे यांच्या उपोषणाच्या माध्यमातून जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राने बघितली.. त्यामुळे रविराज मोरे यांच्या उपोषणाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सर्व स्तरांवरून झाला त्यामध्ये विशेषता स्वतःला प्रस्थापित नेते समजणारे व नाकाच्या वर जाणाऱ्यांचे पाय खेचणारे मग त्याकरिता शेतकरी विरोधी कट कारस्थान करावे लागले तरी चालेल अशा प्रकारचे काही प्रवृत्ती मुळेच आपल्या अकोट मतदार संघावर अनेक वर्षापासून बाहेरचे नेते येऊन राज्य करीत आहेत.. रविराज मोरे यांचे आमरण उपोषण अयशस्वी करण्यासाठी अनेक कटकारस्थान रचल्या गेले अनेक संघटनांवर दबाव टाकण्यात आला हा सर्व खटाटोप कशासाठी ? फक्त आणि फक्त तालुक्यात आणि जिल्ह्यात स्वतःचेच वर्चस्व कायम राहावे याकरिता परंतु अशा प्रकारचे वर्चस्व म्हणजेच जनसामान्यावर गुलामगिरी लादणे त्यांना गुलाम समजणे त्यामुळे या मागील 20 वर्षांपासूनच्या प्रस्थापितांच्या गुलामगिरीतून रविराज मोरे यांना अकोट मतदार संघाला बाहेर काढायचे आहे.. याची जाणीव मक्रमपूर येथील रहिवासी व लोकनेते विशाल सोनोने यांना झाली म्हणूनच त्यांनी अकोट मतदार संघात आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या आशीर्वादाने बोकडलेला भ्रष्टाचार बाहेर काढण्याचे काम केले..
अकोट येथून जवळच असलेले एक छोटेसे गाव कोलविहीर या गावाला मागील पन्नास वर्षापासून प्रतीक्षेत असलेला रस्ता हा तात्पुरता का होईना मिळाला परंतु हा रस्ता मक्रमपूर येथील प्रतिष्ठित नागरिक व सहकार क्षेत्रातील वरिष्ठ नेते यांनी हाताने उखडून दाखवला हा डांबरीकरण झालेला रस्ता दोन महिने होत नाही तर संपूर्णपणे वाहून गेला पुन्हा कोलविहीर गावकऱ्यांच्या नशिबी पुन्हा तोच पन्नास वर्षापासून करीत आलेला संघर्ष.. त्यामुळे आक्रमक झालेले सहकार नेते विशाल सोनोने यांनी प्रस्थापित नेत्यांचे व विद्यमान आमदारांचे चांगलेच कान उचलले ..तसेच नेहमी विशाल सोनोने यांची मतदारसंघातील कामांच्या बाबतीत तळमळ हि अनेक लोकहिताच्या कार्यातून समोर येते..अधिकारांची जाणीव असलेले व शेतकऱ्यांबद्दल तळमळ असलेले स्पष्टवक्ता स्वभाव असलेले विशाल सोनोने यांचे सर्वत्र कौतुक होत आहे..
अकोट मतदार संघाचा खरोखरच मागील वीस वर्षातील अपूर्ण राहिलेला विकास हा पूर्णत्वास नेण्याकरिता शेतकऱ्यांच्या दुःखांची जाण , व्यापारांच्या भावनांची कदर व गोरगरिबांचा कळवळा जपणारे बेधडक व सर्व समावेशक निर्णय क्षमता असणारे रविराज मोरे, विशाल सोनोने, संजय शेळके, पांडुरंग खवले, अशा अनेक तळागळातील विशेष व्यक्तिमत्वाची गरज आहे तरच आपल्या मतदारसंघातील जनतेला न्याय मिळेल..असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे..