आसेगाव बाजार : येथील अखंड हरिनाम सप्ताह हा ऐतिहासिक.. 41 वर्षापासून परंपरा कायम..
RaviRaj 25 February 2024
आसेगाव बाजार : श्री संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त तब्बल ४१ वर्षापासुन संत वासुदेव महाराजांच्या प्रेरणेने अकोट तालुक्यातील आसेगाव बाजार येथिल श्री हनुमान मंदीर परीसरात श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे दरवर्षी आयोजन करण्यात येते.
सप्ताहाचे हे ४२ वे वर्ष असून सदानंद महाराज गावंडे यांच्या मार्गदर्शनात व रामदास महाराज हाके यांच्या नेतृत्त्वात यावर्षी म्हणजेच उद्यापासून २६ फेब्रुवारी ते ४ मार्च दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहात दैनंदिन काकडा आरती सकाळी ५ ते ६, ज्ञानेश्वरी पारायण सकाळी ७ ते ११, प्रवचन दुपारी ४ ते ५, हरिपाठ संध्याकाळी ६ ते ७ व हरिकिर्तन रात्री ८ ते १० संपन्न होणारं आहे.
सप्ताहात सुरेश महाराज तायडे, रामदास महाराज हाके, रामकिशन महाराज कराळे, वासूदेव महाराज मोहोकार, प्रकाश महाराज राजवैद्य यांचे प्रवचन होणार असून त्र्यंबक महाराज अवारे, वासुदेव महाराज खोले गुरुजी, राममहाराज गव्हारे, किशोरीताई सांगोले, नंदू महाराज इंगळे, मुकेश महाराज आखरे, मनोहर महाराज ठाकरे यांचे हरिकिर्तन संपन्न होणार असून ४ मार्च रोजी सप्ताहाची समाप्ती तुकाराम महाराज सखारामपुरकर यांचे काल्याचे किर्तनाने होणार आहे. ४ मार्च रोजी आसेगाव बाजार येथे विविध गावातील भजनी दिंड्या सहभागी होऊन गावात पालखी प्रदक्षिणा व मिरवणूक निघणार आहे. सप्ताहात गायनाचार्य नामदेव महाराज नरवाडे हिंगोली, चंद्रभान मुकाडे, विलासराव लोकुळे, कैलास म्हस्के, डिगांचर बुबा भोसले, धोडुजी कराळे, बापुराव राखोंडे, विश्वनाथ कराळे, रामकिसन कराळे, सुधाकर कराळे, भागवत देवराव कराळे, सांप्रदायीक भजनी मंडळ पुंडा मृदंगाचार्य यश महाराज बाजड़- आळंदी देवाची विणेकरी महादेवराव बोंडे, गोपाळराव पिंपळकार, महादेवराव धबडगाव, पुरुषोत्तम पिंपळकार यांची उपस्थिती लाभणार असून चार दशकाची परंपरा असणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन सर्व आसेगाव बाजार व मिर्झापूर गावकरी मंडळी तसेच श्री ज्ञानेश्वरी पारायण समिती हनुमान मंदिर यांच्या वतीने करण्यात आले आहे..