आसेगाव बाजार येथील शाळेच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाच्या भ्रष्टाचाराची निष्पक्ष चौकशी होणार!- सरपंचासह सर्व सदस्यांच्या उपोषणाला यश..
Salim Khan 9 May 2023
अकोट तालुक्यातील आसेगाव बाजार हे जिल्हा परिषद सर्कल असून तालुक्यातील सर्वात मोठ्या लोकसंख्येचे व अनेक दिग्गज नेते असणारे गाव आहे अकोट तालुक्याचे राजकारण हे आसेगाव बाजार शिवाय अपूर्ण असते अशा या विकसित गावाचे सरपंच निलेश नारे व त्यांचे सहकारी यांच्यावर आज उपोषण करण्याची वेळ आली हे दुर्दैव आहे….
गावातील एकमेव असलेली महत्त्वपूर्ण जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा ही खूप शिकस्त अवस्थेत असल्यामुळे जिल्हा परिषद अकोला यांच्याकडून शाळेच्या बांधकामाकरिता 44 लक्ष रुपये निधी मंजूर केला नियमाप्रमाणे दोन वर्षांपूर्वी सदरचा कॉन्ट्रॅक्ट अकोट येथील बांधकाम व्यवसायिक अमोल गडम यांनी मिळवला परंतु बांधकाम करण्याची मुदत 2022 मध्येच संपली असल्याने अतिशय घाईघाईने सहा महिने उशिरा का होईना अमोल गडम यांनी बांधकाम पूर्ण केल्याचे बांधकाम अभियंता श्री भास्कर यांनी शिक्का मोर्तब केले व तात्काळ गडम यांचे शेवटचे बिल निविदा काढण्याची प्रक्रिया सुद्धा पूर्ण केली ही बाब सरपंच निलेश नारे व बाकी सर्व सदस्यांच्या लक्षात आल्यामुळे तात्काळ आज दि. 9 मे २०२३ च्या सकाळपासून शाळेसमोरच उपोषण सुरू केले.
तत्पूर्वी जि प सदस्य यांनी नवीन बांधकाम झालेल्या शाळेचे अचानक उद्घाटन करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता परंतु सरपंच व इतर ग्रामपंचायत सदस्य यांनी उद्घाटनाच्या कार्यक्रमाला प्रतिसाद न देता उलट संपूर्ण कार्यक्रम प्रक्रियेवर बहिष्कार टाकून आपला बांधकामाच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या मागणी करीता उपोषणाला सुरुवात करून रोष व्यक्त केला यामुळे विद्यमान जि प सदस्य व सरपंच यांच्यामध्ये थोडेफार मतभेद असल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आले गावातील लहान मुलांचे भविष्य असणाऱ्या शाळेकरीता सरपंच व सदस्य यांनी राजकारण बाजूला ठेवून व कोणत्याही दबाव तंत्राला बळी न पडता गावाच्या विकासावर लक्ष केंद्रित केले आहे शाळेच्या बांधकामांमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप करीत विद्यमान सरपंच व सर्व सदस्य हे आज सकाळपासूनच आमरण उपोषणाला बसले होते
दिवसभरात अनेक दिग्गज नेते मंडळींनी या उपोषणाला आपले समर्थन दर्शविले त्यामध्ये आसेगाव बाजार येथील सर्व गावकरी मंडळी व विशेषतां माजी आमदार संजय गावंडे यांनी कार्यकर्त्यांसह उपोषण कर्त्यांना भेट दिली व तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना कठोर निर्देश दिले त्यामुळे लगेच अकोट येथील कार्यालयातील अधिकारी थेट आसेगाव बाजार येथील उपोषण मंडपात पोहोचली त्यामध्ये पंचायत समिती अकोटचे गटनेता धीरज शिरसाट, शाखा अभियंता भास्कर, जि प पुनसे, दिनेश सरकटे यांनी मध्यस्थी करीत तात्काळ सदर बांधकामाची पुढील आठ दिवसात निष्पक्ष चौकशी करण्यात येईल व तोपर्यंत कॉन्ट्रॅक्टर चे देयक हे अदा करण्यात येणार नाही असे लेखी आश्वासन दिले
त्यामुळे उपोषण कर्ते सरपंच निलेश नारे उपसरपंच राहुल धांडे उमेश धांडे सुगत धांडे रोहित धांडे चंदू धांडे दिनेश धांडे संदीप आग्रे हरिअर पळसकर सुगत वानखडे रोहित धांडे सम्यक विद्यार्थी आंदोलन तालुका प्रसिद्धी प्रमुख श्रीराम खंडारे अनिरुद्ध धांडे राज धांडे उद्देश शिरसाट संदीप धांडे राजू पाखरे विकी तेलगोटे गणेश तायवाडे शैलेश नारे नितीन धांडे नागोराव धांडे निलेश धांडे दिलीप धांडे तुषार धांडे सोनू धांडे शंतनू धांडे यांनी वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष मयूर सपकाळ पंचायत समितीचे गटनेता धिरज शिरसाट दिनेश सरकटे अभियंता जि प पुनसे शाखा अभियंता भास्कर या सर्व गावकरी व सन्माननीय मंडळींच्या उपस्थितीत पुढील आठ दिवसाच्या कालावधी करिता उपोषण स्थगित करण्यात आले व वरील आश्वासनाची पूर्तता न झाल्यास पुन्हा बहुसंख्येने खूप मोठ्या व्यापक स्वरूपात व कठोर भूमिका घेऊन आंदोलन करण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य सुगत धांडे यांनी दिला आहे..