INDIA NEWS

Press

प्रहार मोहीम यशस्वी मात्र आका चे वर्चस्व कायम अवैध धंदे अमर – माफियांना आत्मविश्वास

Salim Khan 1 June 2025

Pअकोल्याचे नवनियुक्त पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांनी वरली, मटका, जुगार, क्लब, इतर सर्व अवैध धंदे बंद करण्यासाठी प्रहार मोहीम सुरू केली त्या अंतर्गत संपूर्ण जिल्ह्यामध्ये अवैध धंदे माफियांवर बेधडक कारवाया सुरू केल्या आहेत काल जिल्ह्यातील अतिशय संवेदनशील असलेल्या अकोट मध्ये मटका अड्ड्यावर कार्यवाही झाली त्यामध्ये नऊ बहादरांवर अटक कार्यवाही करण्यात आली याचे सर्वत्र कौतुक होत आहे परंतु या कारवायांमध्ये मुख्य सूत्रधार कोण हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे यापूर्वी सुद्धा अशा थातूरमातूर कारवाया झाल्या असून अवैध धंदे माफीयांच्या मात्र कायमस्वरूपी मुसक्या आवळण्यात आजपर्यंत पोलीस प्रशासन यशस्वी होऊ शकलं नाही असा यापूर्वीचा इतिहास आहे कारवाईनंतर काही दिवस शांत राहून पुन्हा नवीन जोमाने हे अवैध धंदे करणारे मुखियामार्फत कोणत्या ना कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत कनेक्शन लावून हे सर्व धंदे सुरू करतात असा आत्मविश्वास या बहाद्दरांना आहे.. अवैध धंदे करणाऱ्या या माफियांना दोन नंबरच्या पैशाची चटक लागली असल्यामुळे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कितीही खालची पातळी हे माफिया गाठू शकतात त्यामध्ये कुणाचा खून जरी करावा लागला तरीही हे बहाद्दर, मागेपुढे पाहणार नाहीत वर्ष दोन वर्ष जेलमध्ये राहून पुन्हा या व्यवसायात आपला वचक कायम ठेवण्यासाठी हे माफिया प्रयत्नशील असतात तसेच पोलिसांच्या कारवाईमध्ये अटक झाल्यावरही कोर्टामध्ये नाममात्र दंडाची रक्कम भरून पुन्हा हे बहाद्दर आयत्या पैशाचे तोंडाला रक्त लागल्यामुळे अवैध धंदा सुरू करतात त्यामुळे पोलीस अधिक्षक असो की पोलीस महासंचालक हे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करू शकत नाहीत व आमचे कुणीच काही बिघडू शकत नाही असा आत्मविश्वास या माफीयांच्या बोलण्यातून दिसत आहे
या अगोदर सुद्धा अनेक पोलीस अधिक्षक येऊन गेले त्यांनी सुद्धा सुरुवातीला असाच प्रकार केला होता परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही दोन-तीन महिन्यातच ह्या प्रहार सारख्या सर्व मोहिमा थंडावतात आणि या बहादरांनी ठरवलेल्या व्हाईट कॉलर मुखिया कडून पोलीस यंत्रणेला मॅनेज केल्या जाईलच व पुन्हा जोमाने हे सर्व बंद झालेले अवैध धंदे सुरळीत सुरू होतील असे भविष्य सुद्धा अनेक माफियांनी वर्तवले आहे त्यामुळे अवैध व्यवसाय हे अमर आहेत हे कायमस्वरूपी कधीच बंद होणार नाहीत असे भाकीतच अनेक बहाद्दरांनी वर्तवले आहे

नवनिर्वाचित पोलीस अधिक्षक रुजू झाल्यामुळे काही दिवस त्यांचा मानसन्मान ठेवून सर्व अवैध धंदे खुलेआम न करता वातावरण शांत होईपर्यंत चोरीछुपे करावे लागणार आहेत आणि थोड्याच दिवसातच अवैध धंदे माफियांचा आका हा पोलीस प्रशासनासोबत योग्य कनेक्शन लावून पुन्हा हेच अवैध धंदे पूर्ववत खुलेआम सुरू होतीलच असे चॅलेंजच माफियांच्या आका कडून दिल्या जात आहे याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे त्यामुळे या माफियांचा आत्मविश्वास हा खरा ठरणार की,बेधडक कार्यपद्धतीसाठी ओळखले जाणारे दबंग पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांची प्रहार मोहीम यशस्वी ठरणार हे पुढील काळात समोर येईलच तसेच मुख्य सूत्रधाराच्या मुसक्या आवळून कायमस्वरूपी गुदमरलेल्या संवेदनशील अकोट शहराला मोकळा श्वास घेण्यासाठी पोलीस अधिक्षक कोणती पावले उचलणार हे बघणे औत्सुक्याचे ठरेल..

One thought on “प्रहार मोहीम यशस्वी मात्र आका चे वर्चस्व कायम अवैध धंदे अमर – माफियांना आत्मविश्वास

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish