बुलढाणा: येथे जालन्यातील मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज विरोधात आंदोलनामध्ये 13 सप्टेंबरला जळगाव जामोद येथील मराठा बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार..
parmeshwar hatole 11 Sept 2023
जालना जिल्ह्यात झालेल्या मराठा बांधवांवर पोलिसांकडून अमानुष लाठीचार्ज झाला त्याच्या निषेधार्थ व मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ दिनांक 13 सप्टेंबर 2023 बुधवार रोजी बुलढाणा येथे मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे या मोर्चाच्या नियोजना संदर्भात जळगाव जामोद तालुक्याची नियोजन बैठक आज श्री संत सखाराम महाराज मंगल कार्यालय जळगाव जामोद येथे घेण्यात आली या बैठकीमध्ये बुलढाणा येथे होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चा मध्ये जळगाव जामोद तालुक्यातील बहुसंख्य मराठा बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले.. या बैठकीला अनेक प्रतिष्ठित मराठा बांधव व सर्वपक्षीय नेते मंडळी उपस्थित होती..