* बातमीचा इम्पॅक्ट * अखेर उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल यांना आला जाग !
RaviRaj 30 may 2024
१५ मे ला इंडिया न्यूज ने “हरमकर प्रकरण गळ्यात तरी अकोला पोलीस तोऱ्यात“.. अशा मथळ्याची बातमी प्रकाशित केली होती त्या बातमीची दखल उशिरा का होईना ग्रामीण पत्रकार संघाने दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल यांनी घेतली..
ग्रामीण पत्रकार संघटनेने पातुर येथील पत्रकार राहुल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत अंमलबजावणी करून कारवाईची मागणी निवेदना मार्फत अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल यांना केली.. व सोबतच निवेदन देतांना चे फोटो काढून मित्तल यांनी पत्रकारांचा मान राखला.. त्यामुळे उशिरा का होईना अनमोल मित्तल यांनी स्वतःच्या दालनामध्ये निवेदन देण्याकरिता आलेले संघटनेचे पदाधिकारी यांचे निवेदन फोटोसह स्विकारून इंडिया न्यूज च्या बातमीची दखल घेऊन जनतेला चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला..
परंतु हाच स्वयंघोषित नियम सर्वसामान्य जनतेकरिता कायम राहील का? की नेहमीप्रमाणे दोनच निवेदक अनमोल मित्तल यांच्या दालना मध्ये प्रवेश करतील व दालनाच्या बाहेर नोटीस बोर्ड लावल्याप्रमाणे मोबाईल बाहेर ठेवण्यात येतील का? हे पाहणे पुढील काळात औत्सुक्याचे ठरेल..