भुसावळ-वर्धा पॅसेंजर १५ नोव्हेंबरपासून पुन्हा प्रवाशांच्या सेवेत
पहिल्या लॉकडाऊन काळात बंद झालेली भुसावळ-वर्धा-भुसावळ ही पॅसेंजर गाडी पुन्हा एकदा प्रवाशांच्या सेवेत रुजू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. सामान्य प्रवाशांची लेकुरवाळी अशी ओळख असलेली ही गाडी १५ नोव्हेंबर २०२२ पासून धावणार असून, अकोल्यासह इतर छोट्या स्थानकांवर या गाडीला थांबा राहणार असल्याने सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. याशिवाय एक्स्प्रेस गाड्यांमध्ये होणारी प्रवाशांची गर्दी कमी होणार आहे.