INDIA NEWS

Press

भाजप व आरएसएस निगडित शिक्षण संस्थांवर कार्यवाही नाही.. संस्थानिकांना आत्मविश्वास मात्र सरकार हतबल..

salim Khan 23 June 2025

अकोल्यातील दिग्गज शिक्षण संस्थांकडून करोडो रुपयाचा भ्रष्टाचार

नागपूर प्रमाणेच अकोला जिल्ह्यात सुद्धा अनेक शिक्षण संस्था करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करीत आहेत त्यामधील शिक्षक सुद्धा विद्यार्थ्यांच्या भविष्याचे व शिक्षण व्यवस्थेचे लचके तोडत आहेत परंतु आरएसएस व भाजप समर्थित संस्था असल्यामुळे आमचे कुणीच काही करू शकत नाही असा दावा अनेक शिक्षण संचालकांकडून केला जात आहे..
नागपूर मध्ये बोगस शिक्षक प्रकरणात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे निकटवर्तीय अध्यक्ष असलेल्या विठ्ठल रुक्मिणी शिक्षण संस्थेच्या दिलीप धोटे यांच्यावर अटक कार्यवाही झाली यामध्ये महत्त्वाचा आरोपी असलेला शिक्षण उपसंचालक सतीश मेंढे हा फरार झाला असून भाजपचे माजी खासदार सुनील मेंढे यांचा भाऊ आहे त्यामुळे भाजप नेतृत्वावर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे असाच गंभीर प्रकार अकोला जिल्ह्यात सुद्धा अनेक शिक्षण संस्थांकडून होत आहे बोगस शिक्षकांना प्रोत्साहन देऊन करोडो रुपयाचा मलिदा लाटण्याचे काम अनादी काळापासून शिक्षणाच्या नावावर संस्थानिक करीत आहेत यामध्ये जवळपास सर्वच शिक्षण संस्था यांच्या डोक्यावर भाजप व संघाचा हात असल्याचे दिसून येते त्यामुळे नागपूर प्रमाणे अकोला जिल्ह्यातील शिक्षण संस्थांवर कार्यवाही होणे शक्य नाही ” सरकार आमच्या समोर हतबल आहे” असा आत्मविश्वासच शिक्षण संस्थेच्या संचालकांनी व्यक्त केला आहे. नागपूर मध्ये झालेल्या कारवाईनंतर शिक्षण संस्था संचालक भयभीत झाल्याची प्रतिक्रिया अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी व्यक्त केली होती. परंतु अकोला जिल्ह्यातील निगरगट्ट असलेल्या शिक्षण संस्था मात्र “आमचे कुणीच काही करू शकत नाही” अशा भूमिकेत असल्याचे दिसून येते. तसेच अगदी तोंडावर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असल्यामुळे सरकारकडून संघाची मजबूत पकड व भाजप निगडित असलेल्या शिक्षण संस्थांना निश्चितच अभय देणार असल्याचा दावा अनेकांनी केला आहे त्यामुळे या शिक्षण संस्थासमोर महाराष्ट्र सरकारच नव्हे तर केंद्र सरकार सुद्धा हतबल झाल्याचे दिसून येते..

प्रतिक्रिया

शिक्षण संस्थांवर कठोर कारवाई करण्यासाठी मी आझाद मैदान मुंबई येथे उपोषणाला बसलो होतो शिक्षण संस्था संघ निगडित असो की भाजप नेत्यांच्या निकटवर्तीयांची कायदा हा सर्वांसाठी समान असला पाहिजे कोणताही भेदभाव सरकारने करू नये त्यावेळी उपोषणादरम्यान दिलेल्या आश्वासनांची सरकारने तात्काळ अंमलबजावणी करावी अन्यथा पुन्हा आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करण्यात येईल..

रविराज मोरे सामाजिक कार्यकर्ते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish