INDIA NEWS

Press

भाजप शहराध्यक्षाचे दोन्हीही भाऊ फरार मात्र पोलीस यंत्रणा हतबल..

salim khan 24 august 2025

पंधरा दिवसापासून आरोपी टावरी बंधू गायब, राजकीय दबाव की तपास यंत्रणा बोथट

अकोट शहरातील नामांकित असलेले रेल्वे स्टेशन चौकातील टावरी मेडिकल वर कायद्याने बंदी असलेल्या गर्भपाताच्या गोळ्या खुलेआम विकल्या जात असल्याची माहिती अन्य व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती त्यानुसार त्यांनी सापळा रचून टावरी मेडिकल चे संचालक विपिन टावरी व त्याचा भाऊ पंकज टावरी यांना गर्भपाताच्या गोळ्या विकताना रंगेहात पकडले त्यानुसार टावरी बंधूवर 13 ऑगस्ट रोजी अकोट शहर पोलीस स्टेशनला गंभीर गुन्हे दाखल केले तेव्हापासूनच आरोपी विपिन टावरी व पंकज टावरी हे दोघेही फरार झाले आहेत अकोट शहर पोलीस त्यांचा शोध घेत आहेत मात्र मागील दहा दिवसापासून आरोपींचा कोणताही थांगपत्ता लागला नाही यादरम्यान आरोपीं विपिन टावरी यांनी सत्र न्यायालय अकोट येथे अटकपूर्व जामीन दाखल केला होता परंतु तो सुद्धा फेटाळला गेला आहे..

यापूर्वी राज्यातीलच नव्हे तर अनेक आंतरराष्ट्रीय पातळीवरचे आरोपी अवघ्या काही तासातच अकोट पोलिसांनी जेरबंद करण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे परंतु भाजप शहराध्यक्ष हरीश टावरी यांचे फरार आरोपी असलेले दोन्हीही बंधू पोलिसांच्या नजरेत का येत नाहीत असा संशय तपास यंत्रणेवर निर्माण झाला असून पोलिसांवर राजकीय दबाव तर नाही ना? की या गुन्ह्यांमध्ये पोलीस यंत्रणा बोथट झाली आहे असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत तसेच यापूर्वी डम्पिंग ग्राउंड व इतर अनेक गैर-कायदेशीर प्रकरणात भाजप शहराध्यक्ष हरीश टावरी यांना राजकीय मदत मिळाली आहे त्याचप्रमाणे या प्रकरणात सुद्धा राजकीय वर्धहस्त लाभलेल्या मोठ्या भावाच्या आशीर्वादाने आरोपी विपिन टावरी व पंकज टावरी यांना मदत मिळत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे त्यासोबतच पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचा संशय निर्माण झाला असून दोन्ही आरोपींना शोधण्यासाठी पोलीस हतबल असल्याचे चित्र आहे

प्रतिक्रिया

सरस्वती शाळेतील विनयभंग प्रकरणातील मुख्याध्यापक आरोपी भूषण ठाकूर व विपिन टावरी यांची पक्की मैत्री सर्वश्रुत आहे “एक मित्र विनयभंग करतो आणि दुसरा त्यावर उपाय म्हणून गर्भपाताच्या गोळ्या विकतो” आजपर्यंत हजारो चिमुकल्यांचा बळी घेण्याचे पाप या आरोपींनी केले आहे.
भूषण ठाकूर विनयभंग प्रकरणात फरार असताना त्यावेळी अटक पूर्व जामीन मिळेपर्यंत आरोपी विपिन टावरी यांने भूषण ठाकूरच्या सतत संपर्कात राहून सर्व प्रकारे मदत करून पक्की मैत्री निभावली होती त्याचीच परतफेड म्हणून भूषण ठाकूर फरार आरोपी विपिन टावरी ची मदत करीत असल्याची दाट शक्यता आहे

शिक्षक/शिक्षिका
सरस्वती विद्यालय अकोट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish