भाजप सरकारच्या टक्केवारीच्या खेळात जीव जाणार लाडक्या बहिणीचा पाण्यात
RaviRaj 15 March 2025
Akot: महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या विभागामार्फत जल जीवन मिशन अंतर्गत राबविण्यात येणारी अकोट तालुक्यात पोपटखेड 97 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा 134 कोटी रुपयांची योजना ही फक्त कागदावरच राहिली आहे
या योजनेची कालमर्यादा संपलेली असून दहा टक्केही काम कंत्राटदाराकडून करण्यात आले नाही उलट मुख्य कंत्राटदार असलेली मल्टी अर्बन इन्फ्रा कंपनी चा सब कंत्राटदार शासनाचे लाखो रुपये घेऊन पळून गेला परंतु शासनाच्या एकाही अधिकाऱ्याने याची दखल घेऊन पळून गेलेल्या सब कंत्रदाराची एफ आय आर केली नाही
जनतेचा पैसा हा कंत्राटदारासह अधिकारी लुटून खात आहेत परंतु जनतेला मात्र अंधारात ठेवून योजनेचा एवढा मोठा निधी कुठे खर्च होत आहे याचा कुणालाही थांगपत्ता अधिकारी लागू देत नाहीत पोपटखेड शिवारातील विकासाच्या कोसो दूर असलेला घटक म्हणजे आदिवासी बहुल भाग यांना पिण्याच्या पाण्याकरिता संघर्ष करीत भटकंती करावी लागत असल्यामुळे अकोट शहरातील व्यवसायिक तसेच समाजसेवक श्याम देशमुख यांनी मनाची उदारता दाखवून या योजने करिता स्वतःची जमीन शासनाला दान दिली होती
पिण्याचा पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटावा व पुढच्या पिढीला या माध्यमातून चांगले आरोग्य मिळावे हा उद्देश ठेवून देशमुख यांनी बिनशर्थ जमीन शासनाच्या हवाली केली होती परंतु ज्या उद्देशाने देशमुख यांनी जमीन दान दिली होती तो उद्देश पूर्ण होताना दिसत नसल्यामुळे श्याम देशमुख यांनी दिलेले दानपत्र रद्द करण्याची कठोर भूमिका घेतली आहे त्यामुळे कंत्राटदार व महाराष्ट्र जिवन प्राधिकरण मधील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत जमिनीचे दानपत्र रद्द झाल्यास ही योजना अंमलात आणणे शक्य होणार नसल्याची माहिती आहे त्यामुळे कंत्राटदार अधिकारी व मंत्री यांच्या कमिशन खोरीमुळे खूप मोठे नुकसान आदिवासी बांधवांचे होणार असून 97 खेड्यातील लोकांना यापुढे आयुष्यभर कधीच पिण्याचे चांगले पाणी मिळणार नाही यांचा पिण्याच्या पाण्यासाठी चालू असलेला संघर्षमय प्रवास हा अजूनही बिकट होण्याची चिन्हे आहेत व पुढील पिढीला आरोग्य विषयक समस्या ह्या कायम राहून याचे वाईट परिणाम सुद्धा भोगावे लागतील
त्यामुळे भाजप सरकारला लाडक्या बहिण योजनेचे आमिष दाखवून निवडून येण्यापुरताच लाडक्या बहिणीचा वापर करायचा होता हे आज पुन्हा स्पष्ट झाले असून त्याच लाडक्या बहिणी व त्यांचे परिवार वाऱ्यावर सोडून त्यांना पुन्हा पिण्याच्या पाण्याकरिता भटकंती करावी लागणार हे मात्र निश्चित? कंत्राटदाराच्या मुजोरी मुळे काम करण्यासाठी मजूर सुद्धा मिळत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे पैसे मिळत नसल्याने अनेक मजूर ठेकेदार निघून गेल्याची माहिती आहे त्यामुळे या भाजप सरकारमध्ये टक्केवारीच्या खेळात लाडक्या बहिणीला डोक्यावर मडके घेऊन उन्हातानात पिण्याचे पाणी आणावे लागणार आहे किंवा लाडक्या बहिणीला मुख्यमंत्र्यांनी दिलेले पंधराशे रुपये पाणी विकत घेण्यामध्ये गमवावे लागणार असून ही योजना गुंडाळण्याची चिन्हे दिसत आहेत