Breaking | अमरावतीमधील लव जिहाद प्रकरणातील तरुणी सापडली, लोहमार्ग पोलिसांनी घेतले ताब्यात….
Published: September 08, 2022 7:44 AM
या तरुणीचा पत्ता लागला असून ही तरुणी पुणे लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात आहे….
पुणे:अमरावतीत एका मुलीला पळवून नेऊन आंतरधर्मीय विवाह केल्याचा प्रकरण समोर आल्यानंतर वातावरण चांगलं तापलं होतं. हिंदू तरुणीचे अपहरण करून तिचा आंतरधर्मीय विवाह केला. त्यानंतर या मुलीला डांबून ठेवल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला होता. खासदार नवनीत राणा यांनी या बेपत्ता मुलीवरून पोलीस ठाण्यात जोरदार राडा केला होता. दरम्यान या तरुणीचा पत्ता लागला असून ही तरुणी पुणे लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात आहे.
लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरावती पोलीस ठाण्यात ही तरुणी मिसिंग असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या मुलीचे लोकेशन पुणे लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीत असल्याने तिचा शोध व्हावा अशी विनंती लोहमार्ग पोलिसांना करण्यात आली होती. त्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी या मुलीचा फोटो पाठवून शोध सुरू केला.
दरम्यान ही मुलगी निजामुद्दीन ते वास्को-द-गामा गोवा एक्सप्रेसने गोव्याच्या दिशेने प्रवास करत असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळाली होती. ही ट्रेन सातारा या ठिकाणी असल्याने पोलिसांनी स्टेशन मास्तर यांना फोन करून गाडी स्टेशनवरच थांबवावी अशी विनंती केली. त्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास या मुलीला ताब्यात घेतले.
लोहमार्ग पोलिसांनी यावेळी रेल्वेच्या 22 डब्यांची तपासणी केली. त्यातील एस 6 एस 7 या डब्यामध्ये ही मुलगी एकटी प्रवास करताना आढळून आली आहे. पोलीस अधिकारी मेनकर व पाटील यांच्या पथकाने या मुलीला सुरक्षित ताब्यात घेतले असून सध्या ती सातारा लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात आहे.
तुमच्या सर्व बातम्या महत्त्वाच्या आणि बरोबर आहेत, मी त्या वेबसाईटवर करतो, त्यासाठी app आहे का?