अँटी करप्शन ब्युरो ची प्रतिमा मलीन..बेवड्या अधिकाऱ्याची रेस्ट हाऊस ला पार्टी..तर दारूच्या नशेत अपघात..
salim khan 15 September 2025
अधिकाऱ्याच्या गैरकृत्यामुळे एसीबीची नामुष्की ! दारूच्या नशेत अधिकाऱ्याची पळझळ..पोलिसांची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात.

Akola: अकोट न्यायालयात साक्ष देण्यासाठी एसीबी विभागातील एक अधिकारी ३ सप्टेंबर रोजी
आले होते. मात्र न्यायाधीश रजेवर असल्याने केवळ 10 मिनिटातच अधिकारी मोकळे झाले. मग काय तर अधिकाऱ्याने आपल्या काही “खास” मित्रांसोबत विशेषतः अकोट-तेल्हारा पोलीस ठाण्यात पूर्वी नोकरीच्या काळातील संपर्कात आलेल्या सहकार्या सोबत मद्यपानाचा आनंद लुटला.? अकोट लगत असलेल्या सातपुडा पर्वतरांगात मौजमजा करून अती सेवन झाल्याने साहेबांनी थेट बांधकाम विभागाच्या विश्राम गृहात काहीकाळ वेळ घालवला. थोडी उतरल्यावर साहेबांनी आपल्या खासगी वाहनाने अमरावतीच्या दिशेने प्रयाण केले. मात्र अती सेवण झाल्याने सांगळूद फाट्याजवळील वळणावर त्यांच्या कारने लोखंडी पाईपला जोरदार धडक दिली. गाडीची अवस्था बिकट झाली होती, साहेबांचा तोल सुटलेला होता आणि मद्यधुंद अवस्थेत त्यांना वाहनाबाहेर काढण्याची वेळ काही गावकऱ्यांवर आली. सरळ उभे राहण्याची अवस्था त्यांची नसल्याचे काहीनी सांगितले.या घटनेची माहिती मिळाल्यावर येवदा पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. मात्र अधिकाऱ्याने मी एसीबी मध्ये आहे असे तोऱ्यात सांगितल्याने आलेल्या पोलिसांनी कुठलीच कारवाई केली नसल्याचा आरोप होत आहे.

वास्तविक हा प्रकार सरळ ड्रंक अँड ड्राईव्हचा होता, मग प्रकरणाची नोंद झाली की नाही ? अधिकारी एसीबीतील असल्यामुळे पोलिसांनी कारवाई दडपली का, असा संशय उपस्थित होत आहे. अपघातग्रस्त वाहन तात्काळ दुरुस्तीला कसे पोहोचले, मद्यधुंद अधिकाऱ्याला अमरावती गाठण्यासाठी कोण मदतगार ठरले, या सर्व गूढ प्रश्नांवर चर्चा रंगत आहे. हा विषय बाहेर येऊ नये याकरिता संबंधित सर्वांनीच चांगलीच खबरदारी घेतली मात्र गावकऱ्यांच्या चर्चेतून हा गंभीर विषय समोर आला.सर्वांत गंभीर बाब म्हणजे अकोटमधील या अधिकाऱ्याचे जुने पोलीस मित्र, इतर ओळखीचे मंडळी यांनी हा लाजिरवाणा प्रकार झाकण्यासाठी चांगलीच कसरत केली? अशा व्यसनी अधिकाऱ्यांच्या वर्तनामुळे एसीबीसारख्या भ्रष्टाचारविरोधी संवेदनशील विभागाची प्रतिमा डागाळत असल्याची तीव्र चर्चा सर्वत्र सुरू आहे.लोकांचा विश्वास टिकवायचा असेल तर या दारुड्या अधिकाऱ्याचा संपूर्ण प्रकार चौकशीत आणणे अत्यावश्यक आहे. अन्यथा एसीबीसारख्या महत्त्वाच्या यंत्रणांवर नागरिकांचा विश्वास राहणार नाही.

प्रतिक्रिया
अधिकाऱ्याचे काम केवळ दहा मिनिटात झाले असतानाही थेट बारातास हे अधिकारी शहरात कोणासोबत होते ? काय करत होते ? याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेणे आवश्यक आहे आहे. तसेच
“या अधिकाऱ्याची पुन्हा साक्ष येत्या 25 तारखेला असून मागच्या वेळी केलेल्या गैरकृत्य प्रकारातून काही धडा घेतला आहे का ? की पुन्हा त्याच गलिच्छ प्रकाराची पुनरावृत्ती होणार हे पाहण्यासाठी शहरातील काही नागरिक अक्षरशः डोळ्यात तेल घालून उत्सुकतेने 25 तारखेची वाट बघत आहेत.







