देहू ते पंढरपूर जनजागर यात्रा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कर्मभूमी गुरुकुंज आश्रमात – धनंजय पाटील काकडे
RaviRaj 11Feb 2023
अमरावती : जिल्ह्यात जनजागर यात्रा प्रचार करीत असताना अनेक गावी भेटी दिल्यात , अचलपूर तालुक्यात हरम, चांदूरबाजार तालुक्यातील वडूरा, अमरावती तालुक्यात, वलगाव, शिराळा, यावली,
डवरगाव, कापूस तळणी, तीवसा तालुक्यातील मोझरी ,वरहा, गुरुदेव नगर या प्रत्येक गावातून जनप्रबोधन करीत श्री गुरुदेव आश्रम राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कर्मभूमीत गुरुकुंज आश्रम येथे जागर दिंडी यात्रा दिनांक 11 फेब्रुवारी 2023 ला पोहोचली.
शेतकरी- वारकरी- कष्टकरी महासंघाचे अध्यक्ष- श्री धनंजय पाटील काकडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी जनजागर यात्रेतून महाराष्ट्रातील 21 जिल्ह्यात चर्चासत्र व प्रबोधन करण्यात येत आहे. ही प्रबोधन यात्रा तुकाराम गाथा मंदिर तीर्थक्षेत्र देहू येथून निघाली असून 21 फेब्रुवारी 2023 ला पंढरपूर येथे समारोप होणार आहे. जीवनावश्यक वस्तू कायदा, वन्य प्राणी संरक्षण कायदा, शेतकऱ्यांच्या विद्युत बिला बद्दल माहिती, इतर अनेक विषयावर प्रबोधन करण्यात येत आहे. या देशात वन्य प्राण्यांचे संरक्षण आहे ,पण शेतकऱ्यांचे संरक्षण नाही. शेती जर परवडत नाही म्हणून शेतकरी जर शेत मालाला भाव मागायला, आंदोलन करायला बाहेर निघाला, किंवा आपला हक्क मागायला निघाला, तर त्यावर शासन गोळीबार, अश्रुधुराच्या नळकाड्या सोडतो व कोर्टात केसेस सुद्धा दाखल करून त्याला गुन्हेगार ठरवितो. म्हणजेच बळीराजा, अन्नदाता, ग्रामनाथा ,पोशिंदा , अनेक त्याला उपाध्या देऊन ,या देशात त्याला स्लो poison देऊन मारल्या जात आहे. ही कृर नीती हाताळण्यासाठी जनतेने आता जागरुक होणे गरजेचे आहे.या प्रबोधन यात्रेच्या निमित्ताने शेतकऱ्यांना शेतकरी विरोधी कायदे, राज्य व केंद्र सरकार राबवत असल्याबद्दलची जाणीव होत आहे. त्यासाठी या देशात परिवर्तन करणे गरजेचे आहे. महात्मा गांधींनी 27 जानेवारी 1948 व 29 जानेवारी 1948 ला जनतेला दोन पत्र लिहून कळविले होते की, या देशाला स्वातंत्र्य मिळाले असेल तरी आर्थिक स्वातंत्र्य आणि सुराज्य मिळविण्यासाठी पुन्हा आंदोलन करून लढा द्यावा लागेल. राजकीय पक्ष बोगस जाहीरनामे प्रसिद्ध करून शेतकरी शेतमजुरांची मते पारड्यात पाडतात, व जनतेची दिशाभूल करतात. त्यावर कोणतेही कोर्टाकडून ॲक्शन घेतल्या जात नाही. त्यामुळे जनता ही नेहमी हवाल दिल होत आहे. केंद्र व राज्य सरकार शेतकरी विरोधी कायदे राबवत असल्यामुळे दरवर्षी हजारो शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्यासाठी आर्थिक धोरणाचे विचारवंत, बुद्धीवान शेतकरी प्रतिनिधी विधानसभा व लोकसभेमध्ये निवडून पाठविण्याचे गरज आहे. आज विधान भवन लोकसभेत शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर एकही प्रतिनिधी बोलत नाही. त्यासाठी सर्व शोषित समाजाने एकत्र येऊन लढा दिला पाहिजे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (संयुक्त आघाडी), अखिल भारतीय कुरेशी समाज, व शेतकरी संघटना, तसेच वारकरी व गुरुदेव उपासक मंडळी आता या शोषण व्यवस्थेच्या विरुद्ध लढा देण्यासाठी जागरूक झाली आहे. प्रचार यात्रे दरम्यान श्री धनंजय पाटील काकडे गावोगावी चर्चा करून अशी माहिती देत आहेत..