अकोट विधानसभा निवडणूक” संशयाच्या भोवऱ्यात” लोकशाहीची गळचेपी झाल्याची सर्वत्र चर्चा..
बोगस मतदान झाल्याची दाट शक्यता ! अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह..महेश गणगणे हेच जनतेच्या मनातील आमदार,सर्वत्र चर्चा
salim Khan 10 august 2025

Akot: लोकसभा तथा विधानसभा निवडणुकांवर मागील सहा महिन्यापासून कायम संशय व्यक्त करणारे राहुल गांधी यांनी अखेर भाजप सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणला दिल्लीमध्ये काल परवा देशातील संपूर्ण मीडियासमोर राहुल गांधी यांनी निवडणुकांमध्ये इलेक्शन कमिशन तथा भाजप यांच्याकडून बोगस मतदान करून कशा प्रकारची धांदली केली हे पुराव्यानिशी जाहीर स्पष्टीकरण दिले सोबतच कर्नाटक मधील महादेव पुरा मतदार संघातील आक्षेप घेतलेल्या बोगस मतदारांना प्रत्यक्ष इंडिया टुडे ची टीम प्रतिक्रिया घेण्यासाठी गेली असता त्या ठिकाणी पडताळणी करून बोगस मतदान झाल्याचा राहुल गांधी यांचा आक्षेप खरा ठरला यादरम्यान महाराष्ट्रातील अनेक मतदार संघातील पडताळणी सुद्धा काँग्रेस नेत्यांनी सुरू केली असून राहुल गांधी यांचे आरोप खरे असल्याचे दिसून येते त्यामुळे अकोट मतदार संघात सुद्धा अशा बोगस मतदारांची धांदली करून भाजप उमेदवार आ.प्रकाश भारसाकळे निवडून आले असावे असा संशय अनेकांनी व्यक्त केला आहे तथा लोकशाहीची गळचेपी करून निवडून आलेल्या आमदाराकडे जनता संशयाने बघू लागली आहे राहुल गांधींच्या आरोपामध्ये तथ्य असल्याचे अनेक तज्ञांनी शिक्का मोर्तब केले असून राजकीय तज्ञ प्रशांत किशोर यांनी सुद्धा भाजपला धारेवर धरले आहे त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार महेश गणगणे यांनी इमानदारीने निवडणूक लढवली असून आज रोजी जनतेच्या मनातील आमदार गणगणेच असल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे लाडकी बहिण योजना व इतर अनेक दावे निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने त्यावेळी केले होते परंतु निवडणुकीनंतर लाडक्या बहिणीचा सुद्धा विश्वासघात भाजप सरकारने केला आहे फोडाफोडीचे राजकारण व अनैसर्गिक युत्या करून सत्तेची पोळी शेकण्याचा हा अघोरी प्रयत्न अयशस्वी ठरणार असे चित्र संपूर्ण देशात उभे राहिले आहे सोबतच खच्चीकरण झालेल्या काँग्रेस पक्षात राहुल गांधीच्या या महत्त्वाच्या “बॉम्ब” मुळे पदाधिकाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे त्यामुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला असून येणाऱ्या निवडणुकांमध्ये मात्र काँग्रेस मधील नवयुवक हा नवीन जोमाने उभा राहून ताकद दाखवणार हे निश्चित ?

अकोट मतदार संघात निवडणुकीदरम्यान बोगस मतदान होणार हा अंदाज आलेला होताच मतदान मोजणीच्या दिवशी धांदली झाल्याचे अनेक आरोप मी निवडणूक अधिकाऱ्यांसमोर केले होते परंतु निवडणूक अधिकाऱ्यांकडून मला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही वारंवार पाठपुरावा करून सुद्धा मला सीसीटीव्ही फुटेज देण्यात आले नाहीत मला माझ्या अकोट मतदार संघातील जनतेवर पूर्णपणे विश्वास आहे मला भरघोस मते माझ्या सर्व मतदार बांधवांनी दिले आहेत त्यांचा सन्मान राखून या हुकूमशाही विरोधात मी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे
महेश गणगणे
विधानसभा उमेदवार,काँग्रेस

मतदान मोजणीच्या दिवशी जवळपास सर्वच मतमोजणी मशीन चे शील तुटलेले होते याविरुद्ध तात्काळ मी निवडणूक अधिकारी यांच्या समोर आक्षेप घेतला असता निवडणूक अधिकाऱ्यांनी संशयास्पद वागणूक देऊन कोणतीही दखल माझ्या आरोपाची घेतली नाही त्यामुळे अकोट मतदार संघात बोगस मतदान झाले आहे हे निश्चित ? दिपक बोडखे, विधानसभा उमेदवार,
वंचित बहुजन आघाडी







