दहिगाव रेचा येथे दरवर्षीप्रमाणे भवानी माता गाडपगाड यात्रा महोत्सव साजरा!-सर्व गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…
Pradeep bedarkar 24 March 2023
अंजनगाव : तालुक्यातील दहिगाव रेचा येथे मागील अनादी काळापासून गेली 45 वर्षापासून अविरत सुरू असलेली प्रख्यात परंपरा भवानी माता गाडपगाड यात्रा अतिशय आनंदाने मोठ्या उत्साहात पार पडते या यात्रेला लहानांपासून तर मोठ्यापर्यंत सर्व धर्मीय बालगोपाल व वृद्ध गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतो ही परंपरा अशीच कायम राहील अशी ग्वाही दहिगाव रेचा या गावातील प्रतिष्ठित मंडळींनी दिली आहे
या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी गावातीलच नाहीतर जिल्ह्यातील व जिल्ह्याच्या बाहेरून सुद्धा अनेक पाहुणे व भक्तमंडळी येत असतात. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या सर्व महोत्सवांचे आयोजन गावकरी मंडळी कडून केल्या जाते त्यामुळे दहिगाव रेचा गावकऱ्यांचे सर्वत्र अमरावती जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र भर कौतुक होत आहे…