मुख्याधिकारी नरेंद्र बेंबरे यांनी अकोट करांना सोडले वाऱ्यावर.. दोन-तीन खून होण्याची बघतायेत वाट..
RaviRaj 16 Feb 2025

नगरपालिकेच्या जागेवर अतिक्रमण करून दादागिरी, जिवित हानी होण्याची शक्यता
अतिक्रमित घर , आता खोका उभा करून अनेकांची पिळवणूक
मुख्याधिकारी नरेंद्र बेंबरे यांच्याकडून अतिक्रमणाला प्रोत्साहन
अकोट : मधील रेल्वे ब्रिजवर लाईट नसल्यामुळे सात वर्षाची मुलगी अपघातात मरण पावल्याची घटना ताजी असतानाच आशियाना बार समोरील सिंधी कॅम्प रोड च्या मधोमध आज रोजी असलेली खाली जागा यावर काही समाजातील वाईट प्रवृत्तींनी व्यवसाय करण्याच्या नावावर खोके उभे करून ठेवले आहेत व त्या जागेवर स्वतःच्या मालकीची जागा असल्यासारखे वागत आहेत आजूबाजूच्या गोरगरीब व्यवसायिकांवर दादागिरी व हप्ते वसुली करीत पैशाची मागणी करीत आहेत एकेकाळी त्या ठिकाणी महाराजा अग्रसेन पार्क होते ते शिकस्त झाल्यामुळे आज रोजी त्या जागेवर सर्व अतिक्रमित व्यवसाय सुरू झाले आहेत

नगरपरिषद अकोट यांच्याकडून महाराजा अग्रसेन पार्क या ठिकाणचे कोणतेही सुशोभीकरण होत नसल्याने त्याचाच फायदा अतिक्रमित लोकांकडून घेतला जात आहे सिंधी कॅम्प रोडवरील वॉटर सप्लाय च्या शेजारील भागात अतिक्रमण करून घर उभे केल्यामुळे हिंम्मत वाढून अकोट शहरातील संपूर्ण जागा ही स्वतःच्या मालकीची समजून एका समाजकंटकाने अग्रसेन पार्क या ठिकाणी खोका उभा करून दादागिरी सुरू केली आहे दोन दिवसांपूर्वीच एका म्हाताऱ्या केळे विकण्याचा व्यवसाय करणाऱ्या निराधार कुटुंबासोबत या वरली बहाद्दराने वाद केला हा इसम वरली मटका या व्यवसाय संबंधित असल्याने गोरगरिबांची पिळवणूक करीत जीवे मारण्याची धमकी देऊन खून करण्या इतपत यांची हिंम्मत गेली आहे त्यामुळे तत्काळ अग्रसेन पार्क आज रोजी असलेला छत्रपती संभाजी महाराज चौक येथील अतिक्रमण काढण्याची गरज आहे अन्यथा येणाऱ्या काळात अतिक्रमित जागेसाठी दोन-तीन खून झाल्याशिवाय राहणार नाहीत असा इतिहास अकोट शहराचा असून याच्याशी मुख्याधिकारी तथा प्रशासक नरेंद्र बेंबरे यांना मात्र काहीही देणे घेणे नसल्याचे चित्र आहे अव्वाच्या सव्वा बांधकाम परवानग्या देऊन दहा रुपयाची पावती फाडून अतिक्रमणाला प्रोत्साहन देण्याचे काम नरेंद्र बेंबरे यांनी केले आहे अकोटच्या जनतेला वाऱ्यावर सोडून दहा ते पंधरा दिवसांच्या सुट्टीवर जाण्याचा प्रकार हा सतत सुरू आहे त्यामुळे अतिक्रमित जागेच्या वादामध्ये जीवित हानी होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे तरी नरेंद्र बेंबरे यांनी अकोट करांची चिंता करावी अशा भावना जनसामान्यातून व्यक्त होत आहेत.