INDIA NEWS

Press

एसटी महामंडळ नफ्यात परंतु प्रवाशांचा जीव धोक्यात ! एसटी बस मध्ये प्रवाशांना शेळ्या मेंढरांसारखा प्रवास करण्याची वेळ-जनतेमध्ये सरकार विरुद्ध जनआक्रोश…

RaviRaj 6 Oct 2023

प्रवाशांच्या वेदना जाणून घेताना इंडिया न्यूज चे सर्वेसर्वा

Akot : महाराष्ट्र शासनाने एसटी मधील प्रवासाकरिता महिलांकरिता अर्धे तिकीट व ज्येष्ठ नागरिकांकरिता मोफत तिकीट जाहीर केल्यापासून महाराष्ट्रातील सर्वच बस स्थानकांमध्ये अतोनात प्रवाशांची गर्दी बघायला मिळत आहे हा सर्व खटाटोप महाराष्ट्र शासनाने एसटी महामंडळ नफ्यामध्ये यावे याकरिता केला आहे परंतु या योजनांची घोषणा करताना अत्यंत राजकारणातील चाणक्य व दृष्टये समजले जाणारे देवेंद्र फडणवीस यांनी ही अत्यंत गंभीर चूक केल्याची जाणीव महाराष्ट्रातील जवळपास सर्वच बस स्थानकातील प्रवाशांकडून व्यक्त होत आहे…

एसटी बसच्या प्रवासाला कंटाळलेली महिला प्रवासी

त्याचे कारण असे की घाई गडबडीत राजकारणातील चाणक्य होण्याच्या हव्यासापोटी देवेंद्र फडणवीस यांनी हा विचारच केला नाही की एसटी बसेसची संख्या फार तोडकी आहे महाराष्ट्रातील कोणत्याही आगारामध्ये परिपूर्ण बसेसची संख्या उपलब्ध नसल्याने आज रोजी प्रवाशांना जीव मुठीत घेऊन व मेंढ्या बकऱ्यांसारखे कोंबून पैसे देऊन सुद्धा अगदी चोरासारखा खूप संघर्षमय प्रवास करावा लागत आहे एका बस मध्ये जवळपास शंभर ते दीडशे लोकांना प्रवास करावा लागत आहे त्यामध्ये महिलांना प्रवास करताना बस मध्ये श्वास घेण्याकरता सुद्धा जागा नसल्यामुळे अगदी मुंबई शहरातील लोकल सारखा कोंबून प्रवास करावा लागतो आहे त्यामध्ये महिलांची फार कुचंबना होत असून त्यांच्यावर होणारी आपबीती ही कुणालाही सांगू शकत नाहीत ….तसेच 75 वर्षाच्या वरील असलेले ज्येष्ठ नागरिक यांची सुद्धा एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये प्रवास करताना नाकीनव येत आहेत. गर्दीमध्ये मोकळा श्वास सुद्धा घेता येत नसल्यामुळे जीव गुदमरून जीवित हानी होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही त्यामुळे या वयात अनेक आरोग्य विषयक समस्या बीपी शुगर व प्रवासामध्ये उभे राहून प्रवास करण्याची शक्ती ही अजिबात नसल्यामुळे संघर्षमय प्रवास हा त्यांचा जीवनातील शेवटचा प्रवास ठरू शकतो..

तीन ते चार तास बस लेट असल्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे..

सोबतच शाळेचे विद्यार्थी बालगोपाल यांना सुद्धा बसच्या खिडकीतून घुसण्याची वेळ प्रवासादरम्यान येत असते महाराष्ट्रातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले अकोला जिल्ह्यातील अकोट आगार येथे असे प्रकार सर्रास पाहायला मिळतात अकोट अकोला हा अतिशय महत्त्वाचा व जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या वर्दळ व सर्वात जास्त वाहतूक प्रवासी असलेला रस्ता असून महाराष्ट्र सीमेवरील शेवटचे बस स्थानक अकोट आहे व मध्य प्रदेश सीमा ही अतिशय जवळ असल्याने तेथील सुद्धा अनेक व्यापारी व प्रवासी हे अकोट बस स्थानकामधून प्रवास करतात.त्यामुळे अकोट हे खूप वर्दळीचे बस स्थानक आहे. परंतु अकोट अकोला किंवा अकोल्यावरून अकोट येताना प्रवाशांचा अतिशय वाईट अनुभव हा एसटी बसेसचा व आगार व्यवस्थापनाचा येत आहे त्यामध्ये दोन्ही आगाराकडून एसटी बसेस चे नियोजन हे शून्य असल्याचे दिसते कोणतेही वेळापत्रक बसेसचे नसून तीन ते चार तास बसेसची वाट बघावी लागते त्यामुळे अनेक प्रवासी जास्तीत जास्त संख्येने एकत्र येऊन अचानक शंभर ते दीडशे प्रवासी एकाच बसवर तुटून पडतात ज्येष्ठ नागरिकांची व महिला प्रवाशांची, गरोदर महिलांची आरोग्य विषयक समस्या असलेले पेशंट यांची सुद्धा तारांबळ उडते व मानसिक दृष्ट्या खच्चीकरण होऊन एसटी प्रवास हा नकोसा वाटू लागत आहे. तसेच पैसे देऊन सुद्धा स्वाभिमानाने सीटवर बसून मोकळा श्वास घेत सन्मानाने प्रवास कधीच करता येत नसून पारतंत्र्यात असल्याच्या भावना प्रवासांच्या मनामध्ये निर्माण होत आहेत एसटीचा प्रवास करणे म्हणजेच स्वतःच्याच हक्कावर गदा आणणे असा समज काहीसा होत आहे एसटीचा प्रवास म्हणजे गुलामगिरीत असल्याची जाणीव अनेक प्रवाशाकडून व्यक्त होत आहे. प्रवाशांच्या सहनशक्तीचा बांध फुटलेला असून सतत संघर्ष करीत असलेला मजबूर प्रवासी हा फक्त आणि फक्त सर्व सहन करीत अगदी चुपचाप काहीच न बोलता आपल्या स्वतःच्या गालावर दोन थापडा मारून डोळ्यामध्ये पश्चातापाची आग ठेवून विद्यमान सरकारच्या राजकारणाला कंटाळून भयंकर आक्रमक झालेला आहे…

आकोट आगार प्रमुख यांच्याशी संवाद साधताना इंडिया न्यूज चे संपादक..

पालकमंत्री पदाच्या शर्यतीत दंग असलेले महाराष्ट्रातील जनतेला असह्य वेदना होत असताना त्यांच्या मूलभूत प्रश्नाला बघण्यासाठी सरकारमधील एकाही मंत्र्याला किंवा एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना गांभीर्य असल्याचे दिसत नाही असा रोष जनसामान्यातून व्यक्त होत असल्याने सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सामान्य जनता होरपडल्या जात असून विद्यमान सरकारला धडा शिकवण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीची आतुरतेने वाट पाहत आहे.. महिला सन्मान योजना व ज्येष्ठ नागरिकांकरिता मोफत योजना सुरू केल्यानंतर लगेचच बसेसची संख्या वाढवणे गरजेचे होते परंतु याकडे दुर्लक्ष करीत सरकारला जनतेच्या संघर्षाचे गांभीर्य नसून माणसाला माणूस न समजता थोडे थोडे पैसे वाचवण्याकरिता शेळ्या मेंढरांसारखा प्रवास हा महाराष्ट्रातील जनता करणारच आहे याची खात्री असल्याने विद्यमान सरकारने जनतेच्या भावनांचा खेळ रंगवलेला आहे अर्धे तिकीट व मोफत तिकीट केल्याने सरकारला येणाऱ्या निवडणुकीत यश संपादन करता येईल याची शक्यता फार कमी असल्याचे प्रवाशांच्या गंभीर व तिखट प्रतिक्रियांमधून जाणवते आहे तरी हा तळागणातील जनतेचा संवेदनशील व अतिशय महत्त्वाचा प्रश्न सरकारने गांभीर्याने घेतलेला नसून अर्धे व मोफत तिकिटांचे गाजर दाखवून सुद्धा प्रवाशांमध्ये अत्यंत नाराजीचा सूर उमटत आहे एसटी प्रवासात तिकिटांची सवलत ज्या उद्देशाने सरकारने दिली आहे तो उद्देश एसटीच्या अनियोजित कारभारामुळे सरकारवरच उलटतो की काय असे वातावरण निर्माण होताना दिसत आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish