‘छप कर बिकते ते जो अखबार…. सुना है इन दिनो बिक के छपा करते है !’
Ravi Raj 6 January 2024
दरवर्षीप्रमाणे आपण पत्रकार मंडळी तसेच आपले सहकारी मित्र यांच्याकडून पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा देतात.. परंतु शुभेच्छा ह्या आदरपूर्वक व मनापासून दिल्या जातात व त्या शुभेच्छा आपण मनापासून स्विकारतो सुद्धा पण अलीकडच्या काळात प्रसार माध्यमे व पत्रकार यांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देण्यामागे सन्मान व तेवढा आदर बघायला मिळत नाही कारण व्यवस्थेमधील काही थोडक्या लोकांच्या दबावांमध्ये व काही प्रमाणात छोट्या छोट्या फायद्यांसाठी काही आमचे पत्रकार मित्र खरी पत्रकारिता करू शकत नाहीत दबावाला बळी पडून समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्यात अशा पत्रकारांचा थोडाफार वाटा असतोच.. हे सत्य नाकारता येत नाही….
प्रसारमाध्यमे ही अलिकडच्या काळातील सर्वसामान्यांची आवश्यक गरजच झालेली आहे. माणसांना जीवन जगत असताना अन्य,पाणी,हवा, हे जसे शरीरासाठी आवश्यक आहे तसेच सामाजिक व राजकीय जीवनात प्रसारमाध्यमांची आवश्यकता आहे. अन्न,वस्त्र,निवारा हे मानवी जीवनात आवश्यक असू शकतात तसेच प्रसारमाध्यमांचीही आवश्यकता असते. परंतू प्रसारमाध्यमांनी चुकीचे दर्शन घडवले तर मानवी मेंदू मानसिक गुलाम होतो. आणि आता सध्यातरी प्रसारमाध्यमं मानवी मेंदू गुलामच करताना दिसत आहेत. काल परवा विधानसभेच्या निवडणुकांचे मतदान इव्हीएम मशिन्सच्या घाईगडबडीतच पार पडले परंतू मतदान झाल्यानंतर केवळ काही तासातच सर्वे न करताच काही प्रसारमाध्यमं एक्झिट पोल देतात म्हणजेच हे लोकशाहीची गळचेपी आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.मी माझे मतं कोणाला देतो हे माझ्या घरातल्यांनासुद्धा माहित नसते आणि हे मीडियावाले तर सत्ता काेणाची येईल हे मतमोजणीच्या अगोदरच निर्णय देऊन टाकतात तेव्हा पश्न निर्माण होतो. आणि मग प्रसारमाध्यमांना एकच प्रश्न करावासा वाटतो की, एक्झिट पोलवाल्यांनो तुम्ही तरी सांगा ना. पुलवामात ३५० किलो (आरडीएक्स) स्फोटकं कुणी-कोठून आणि कसं आणलं होतं ? याचं उत्तरही प्रसारमाध्यमांनी दिलं तर त्यांनी जो निवडणुकीचा जो पोल दिलाय तो योग्य म्हणता येईल. अन्यथा आमच्या सर्वसामान्य लोकांना मुर्ख समजून त्यांच्या मताला काडीचीही किंमत नाही हेच सिद्ध होतंय. नाहीतर मग ह्यापुढे कशाला हव्यात निवडणुका, त्याऐवजी सर्व प्रसारमाध्यमांनी एक सर्वे करून निकाल द्यायला काय हारकत आहे ? त्यामुळे कोट्यावधी रूपयांची होणारी उलाढाल आणि उमेदवारांचा मतदारांवर होणारा अनावश्यक खर्च आणि निवडणुक आयोगाकडून होणारी शासकीय कर्मचा-यांची होणारी पिळवणूक व पोलिस कर्मचारी यांच्या कामाचा ताणही कमी होऊन सोप्यात सोप्या पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पुर्ण होईल नाही का ? जर निकालापुर्वीच मिडीयालाच सर्व समजत असेल तर मग मिडीयालाच विचारुन सत्ता स्थापण करायला काय हरकत आहे.उगाच सरकारचा निवडणुकीवर होणारा खर्च आणि वेळ या दोन्हींचीही बचतच होईल नाही का ?
एका घरातील व्यक्ती स्वत:च्याच घरातील दुस-या व्यक्तीला मत कोणाला केलं हे उघडपणे सांगत नाही परंतू प्रसारमाध्यमं जनतेच्या मनातले मत ओळखून एक्झिट पोल प्रसिध्द करत असतील तर मग प्रसारमाध्यमांनी चोरी, बलात्कार, खुन, आतंकवादी हल्ले यांचे पण सर्वे करून त्यांची गोपणीय माहीती पोलिसांना द्यायला काय हारकत आहे. तेवढीच आपल्या देशातील गुन्हेगारी कमी होईल किंवा त्यावर आळा बसेल त्यामुळे तैमुरच्या हागण्या मुतण्याच्या बातम्यांची ब्रेकींग न्यूज देण्यासाठी वेळही भेटणार नाही.आजची मिडीया ही राजकारण्यांच्या घरातील दलाल आहे का ? असे वाटते. कारण त्यांनी महाराष्ट्रातील किंवा देशातील किती टक्के लोकांचे प्रश्न सामान्यांची मते जाणून आभ्यासून ज्वलंतपणे मार्गी लावली आहेत हाच प्रश्न पडतो. ही प्रसारमाध्यमं फक्त राजकीय लोकांची वाहवा करण्यात गुंतली आहेत ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे का ? आजचा मिडीया हा राजकीय लोकांच्या हातातील कटपुतळीसारखा किंवा लहान मुलांच्या हातातील खेळण्याप्रमाणे झाला आहे. ज्यांची सत्ता त्यांचाच उदो उदो करणारी मिडीया म्हणजे ‘जिकड गुलाल तिकडं चांगभलं’ अशी अवस्था मिडीयाची आहे. पण सामान्याचे प्रश्न आणि सत्य परिस्थितीचा आढावा घेणं आणि तो लोकांसमोर मांडण हे महत्त्वपुर्ण काम प्रसारमाध्यमं विसरली आहेत का ? असेच वाटते. पुरूषोत्तम खेडेकर हे त्यांच्या प्रसारमाध्यमातील दहशतवाद या पुस्तकात ते लिहतात की, अविकसित व विकसनशील समाजात सत्तावाटप अत्यंत विषम असते. त्यामुळेच अनेक सत्ता ह्या शोषणवादी, विषमतावादी, लहान परंतू सर्वसत्ताधारी घटकांच्या ताब्यात असतात.ह्या भुमिकेतून महाराष्ट्रातील प्रचार – प्रसारमाध्यमांच्या हक्क, अधिकार, कर्तव्य, जबाबदा-याकडे पहावे.
बस स्थानकाजवळ घाणीच्या ठिकाणी गुप्तरोगाच्या जाहीरतीची पेंन्टींग करणा-यास आणि निवडणूकीनंतर सर्वे करणा-या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना आजपर्यंत कोणीही पाहील नाही, तरीही निकालानंतर लगेच काही क्षणातच मीडीया एक्झीट पोल देतेच कसा ? आजही प्रसारमाध्यमं घडलेली घटना जशीच्या तशी न देता केवळ चार तासातच आलटून पालटून तीच ब्रेकींग न्यूज बनवून लोकांना वेड्यात काढतात हे काही नवीन नाही. प्रत्यक्षात घडलेली घटना वेगळीच असते तर प्रसारमाध्यमांनी बनवलेली ब्रेकींग न्यूज वेगळीच असते हा रोजचाच अनुभव येताना दिसतोय. त्यामुळेच तर मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरूषोत्तम खेडेकर म्हणतात की, कार्यकारी संपादक, उपसंपादक, स्तंभ लेखक, विचारवंत हे सारे कर्मठ ब्राम्हण त्या वृत्तपत्राची हागणदारी करण्यासाठीच कार्यरत असतात.
प्रसारमाध्यमं भारत देशातील कायद्यांतर्गत काम करतात. भारतीय राज्यघटनेने प्रत्येकास काही मुलभूत अधिकार दिलेत. त्यात वैयक्तिक लिहण्या-बोलण्याचे-विचार व्यक्त करण्याचे प्रत्येकालाच आहेत. पण ही मिडीया आणि प्रसारमाध्यमं मोफत सेवा म्हणून वर्तमानपत्रे व वाहीन्या सुरू केलेल्या नाहीत तो त्यांचा पैसा मिळवण्याचा प्रमुख धंदा व्यवसाय आहे. काही वर्तमानपत्रांना तर बहुजन महामनवांची आणि त्यांच्या जयंतीविशेष दिनाची अॅलर्जीच आहे का ? कारण तसे वाचकांच्या वारंवार निदर्शनास आलेले आहे. काही वाचकांनी तर काही वर्तमानपत्रांच्या संपादकांना संपर्क साधून त्यांचा समाचारही घेतलेला आम्ही पाहीलेला आहे.
सप्टेंबर २००३ मध्ये संभाजी ब्रिगेडने जेम्स लेन लिखित हिंदु किंग इन इस्लामिक इंडिया या पुस्तकावर बंदी आणून सर्वांना अटक करावी अशी मागणी केली. पण ही बातमी किंवा ब्रेकींग न्यूज कोणीही प्रसारित केली नव्हती परंतू काल परवा निवडणूक प्रक्रिया पार पडताच केवळ काही तासातच एक्झीट पोल जाहीर करणारा हाच तो इलेक्ट्रॉनिक मिडीया आहे हे आमच्या तरुणांनी ध्यानात घेऊन विचार केला पाहीजे.विज्ञानाने दिलेली देणगी म्हणजे इलेक्ट्रॉनिक मिडिया. याच मिडीयाने फेब्रुवारी २००४ मध्ये इटिव्ही ने ‘खुर्ची की मिर्ची’ हा विषय ठेवला होता. पण त्यात संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते गंगाधर बनबरेंचे भाषण कट केले. म्हणजेच प्रसारमाध्यमं खरं दाखवण्याऐवजी सत्यापासून दूर असणारी अनेक कथानकं, दृश्य प्रसारित करून व्यक्तीपाठोपाठच रोगट समाज निर्मितीचं काम प्रसारमाध्यमं करत आहेत. याविषयी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर म्हणतात की, भेसळ करणारे व्यापारी हे जर एकपट गुन्हेगार समजल्या गेले तर साहित्यिक सांस्कृतिक भेसळ करून ती प्रसारीत करणारे प्रसारमाध्यमे कमीत कमी हजारपट मोठे गुन्हेगार आहेत.
आज महाराष्ट्रात ऐन दिवाळीत पावसाने थैमान करून जाता जाता शेतकऱ्यांच्या हातातील तोंडचा घास पळवलाय हे दाखवण्याऐवजी ही मिडीया मात्र शिवसेना-भाजपा, राष्ट्रवादी-काँग्रेस यांचा सत्तेसाठी चाललेला कलगीतुरा दाखवतेय ही खूप मोठी शोकांतिका आहे.एक ना एक दिवस या देशात क्रांती घडेल आणि शेतकऱ्यांच्या व्यथा, अडचणी जणूनबुजून लपवणाऱ्या मिडीयाला जनता पायाखाली तुडवून मारेल. तेव्हा मिडीयावाल्यांनो तुमच्या व्यथा मांडायलाही मिडीया शिल्लक राहणार नाही हे मात्र निश्चित…..
पहले अखबार छपकर बिकते थें
अब अखबार बिककर छपते हैं !