गांधीग्राम: संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाच्या जवानांनी तिघांचे प्राण वाचवले – दीपक सदाफळे यांच्या संपूर्ण टीमचे जिल्हाभरातून कौतुक..
RaviRaj 28 Sept 2023
गणेश विसर्जन दरम्यान पुर्णा नदीपात्रात मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाच्या जवानांनी तीन जनांना जिवनदान दिले.…
▶️ *आज 28 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी मा.अजित कुंभार सर* यांच्या आदेशाने निवासी उप-जिल्हाधिकारी मा.विजय पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक मा.संदीप घुगे सर यांच्या सहकार्याने आज सकाळ पासुन गांधीग्राम येथे श्रीगणेश विसर्जन स्थळी आणी पुर्णानदीपात्रात संरक्षणासाठी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख (जिवरक्षक) दिपक सदाफळे आणी त्यांचे सहकारी अंकुश सदाफळे,मयुर सळेदार,ऋषिकेश तायडे,विष्णू केवट,मयुर कळसकार,आशिष गुगळे, कीशु तायडे,शेखर केवट, अश्वीण केवट,संकेत देशमुख, अर्जुन केवट,जितेंद्र केवट, हे आणी रेस्क्यु बोट सह शोध व बचाव साहीत्यासह एक रुग्णवाहिका आणी सर्च रेस्क्यु वाहन सोबत सज्ज होऊन चोखपणे सुरक्षा सेवा देत असताना दिवस भरात एकजण मुर्तीबुडवताना तर एक जण लहान पुलाजवळुन मोठ्या पुलाकडे धारेत पोहत असतांना तर तीसरा मोरीत घुसलेल्या अवस्थेत असताना धारेतील प्रवाहात लागुन पाण्यात वाहून जाताना एकुण तीन जनांना वेग वेगळ्या घटनेत वाचविले ही मोठी यशस्वी कामगीरी केल्याचे समाधान जिवरक्षक दिपक सदाफळे यांनी व्यक्त केले..
रात्री उशीरा पर्यंत संरक्षणासाठी आमची सज्ज राहणार आहे.यामध्ये तहसीलदार अविनाश शिंदे साहेब, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे साहेब,नायब तहसीलदार राहुल डोंगरे साहेब आणी दहीहांडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार देवानंद वानखडे साहेब यांचे सहकार्य लाभले अशी माहीती पथक प्रमुख दिपक सदाफळे यांनी दिली आहे…