INDIA NEWS

Press

गंगाधर ने गब्बर टॅक्स वाढवला अन् शक्तिमान कमी करणार..थकित कर वसूल करण्याची जबरदस्त युक्ती !

salim Khan 5 august 2025

थकीत कर वसूल करण्याची युक्ती” तरी “गब्बर टॅक्स” थोपवणाऱ्यांची भक्ती

कंत्राटदार की अधिकारी” कुणाचा विकास,आकोटकरांचा मात्र खिसा होतोय भकास

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टॅक्स वाढवून कमी करण्याची भाजपची यशस्वी योजना

गंगाधर ही शक्तिमान है और शक्तिमान ही गंगाधर है”

अकोट नगरपरिषदेने अचानक 100 पटीने टॅक्स वाढवून अकोटकरांना आश्चर्याचा धक्का दिला आहे मागील महिनाभरापासून आकोटकर आकारलेल्या गब्बर टॅक्सच्या दहशतीमध्ये जगत आहेत घराच्या किमतीपेक्षा टॅक्स चा आकडा जास्त आकारलेला असल्याच्याही अनेक तक्रारी सामान्य जनतेकडून होत आहे टीन पत्र्याचे घर असूनही 15 ते 20 हजारापर्यंत नगरपालिकेकडून मनमानी कर आकारलेला असल्याचे दिसून येते त्यामुळे अकोटकर आक्रमक झाले असून हजारोंच्या संख्येने दररोज नगरपालिकेमध्ये गब्बर टॅक्स च्या विरोधात आक्षेप घेण्यासाठी रांगेत उभे राहत आहेत परंतु त्यामध्ये सुद्धा आर्थिक पिळवणूक करण्याची संधी प्रशासनाने सोडली नाही जुना थकीत कर भरल्याशिवाय आक्षेप सुद्धा नोंदवल्या जात नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे या जबरदस्त युक्तीमुळे टॅक्स वसूल करण्यासाठी नेहमीप्रमाणे पालिकेच्या कर्मचाऱ्यांना भटकंती करावी लागत नसून गब्बर टॅक्सच्या दहशतीमुळे जुना थकीत कर भरून घेण्याची नवीन यशस्वी योजना नगरपालिका प्रशासनाकडून आखल्या गेली आहे तसेच गब्बर टॅक्स विरोधात जवळपास सर्वच राजकीय पक्ष व लोकप्रतिनिधी मैदानात उतरले असून धरणे आंदोलन करून नगर प्रशासनाचा निषेध व्यक्त करीत आहेत परंतु हा एक योजनापूर्वक आखलेला राजकीय स्टंट असल्याचे बोलल्या जाते सर्वांचे प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर अगदी शेवटच्या क्षणी विद्यमान आमदार तथा भाजप लोकप्रतिनिधी हा गब्बर टॅक्स कमी करून श्रेय घेण्याचा प्रयत्न करतील असा अंदाज राजकीय तज्ञांकडून व्यक्त केल्या जात आहे जनतेची दिशाभूल करून गब्बर टॅक्सची भीती दाखवून करोडो रुपयांचा थकीत कर वसूल करण्याचा हा फंडा अकोटकरांच्या लक्षात आला असून प्रशासनाच्या या हुकूमशाही पद्धतीचा संताप अनावर झाला आहे हा प्रकार” दहा रुपयांच्या वस्तू चा भाव शंभर रुपये सांगून पन्नास रुपये कमी करणे असा आहे” गब्बर टॅक्सची भीती दाखवून दहशत निर्माण करण्याचा हा खेळ प्रशासनाकडून खेळल्या जात आहे जनतेच्या भावनांशी खेळून येणाऱ्या निवडणुका जिंकणे हाच एकमेव अजेंडा या माध्यमातून दिसून येत आहे त्यामुळे भाजपच्या या नवनवीन” जुमल्याला “अकोट ची जनता बळी पडणार की पुन्हा निवडणूका आल्यावर या सर्व जाणीवपूर्वक झालेल्या “मानसिक, आर्थिक व शारीरिक” त्रासाचा भोळ्या भाबड्या अकोटकरांना विसर पडणार हे येणाऱ्या निवडणुकांमध्ये कळेलच ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish