हेल्मेट सक्ती ठरतेय अतिशयोक्ती..परीक्षार्थी आणि महिलांना हेल्मेटची डोकेदुखी..
अकोला जिल्ह्यातील अकोट मध्ये हेल्मेट सक्ती केल्या जात आहे ही हेल्मेट सक्ती परीक्षार्थी यांना व महिलांना डोकेदुखी ठरत आहे अपघात हा हेल्मेट न वापरल्यामुळे होतो किंवा अपघातात मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते असा समज प्रशासनाचा असल्यामुळे हेल्मेट सक्ती केल्या जात आहे परंतु गाड्यांना अतिरिक्त पांढरे लाईट लावल्यामुळे डोळ्यावर दीर्घ प्रकाश पडून अपघाताचे प्रमाण वाढत आहे प्रमाणित नसलेले लाईट लावण्याची आजकाल क्रेझ वाढत चालली आहे त्यामुळे हा सुद्धा प्रकार गंभीर असून अपघाताला निमंत्रण देणारा आहे अशा प्रकारचे अनेक कारणे यामागे असल्याचे अभ्यासक सांगतात
chanchal pitambarwale 12 Feb 2025

अकोट मध्ये हेल्मेट सक्तीचा अतिरेक…
दर्जाहीन हेल्मेट मुळे जीव वाचणार की जाणार..
महिलांना गाडी चालवताना होतोय हेल्मेटचा त्रास..
अकोट
गेल्या आठवडाभरापासून अकोट शहर व ग्रामीण मध्ये हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे सर्व महत्त्वाचे कार्यालयीन कामकाज सोडून हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करण्यासाठी जवळपास ग्रामीण पोलीस स्टेशन व शहर पोलीस स्टेशनचे अर्धे कर्मचारी रस्त्यावर उभे आहेत त्यामुळे दंडाची रक्कम हेल्मेट पेक्षा जास्त असल्यामुळे नाईलाजास्तव हेल्मेट घ्यावे लागत आहे कालपासून बारावीची परीक्षा सुरू झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी यांना परीक्षा पेपर होईस्तोवर हेल्मेट ठेवण्याची खूप मोठी अडचण निर्माण होत आहे त्यामध्ये हेल्मेट हरवण्याचे प्रकार सुद्धा सुरू झाले आहेत अशा मानसिक त्रासातून परीक्षार्थींना जावे लागत आहे तसेच या हेल्मेट सक्तीमुळे महिलांना खूप मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहे सवय नसल्यामुळे गाडी चालवण्यात अत्यंत अडचणी निर्माण होत आहेत बाजारामध्ये खरेदी करीत असताना हेल्मेट मुळे खरेदी करण्यास मर्यादा लागलेल्या आहेत एक हात कायमस्वरूपी हेल्मेट मध्ये गुंतलेला असल्याने नियमित कामे करण्यास फार मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत तसेच वाहतुकीला अडचण ठरणाऱ्या अतिक्रमण मुळे जीवित हानी होण्याची शक्यता जास्त आहे यावर उपाययोजना न करता पोलीस प्रशासनाकडून हेल्मेट सक्ती करून नागरिकांवर एक प्रकारचा अन्याय होत आहे सोबतच हेल्मेट हे हलक्या प्रतीचे असल्यामुळे जीव वाचणार की जाणार याचे मात्र कुणालाच हमी नसल्यामुळे फक्त हेल्मेट चा व्यवसाय करणाऱ्यांसाठी ही हेल्मेट सक्ती फायदेशीर ठरत असल्याच्या अशा भावना अनेक महिलांनी बोलून दाखवल्या