हिवरखेड मधे सापडली चोरीची दुचाकी..पोलीस कर्मचारी धिरज साबळे यांचे सर्वत्र कौतुक..आरोपी सह दूचाकी तामगांव पोलीस स्टेशनच्या ताब्यात..
parmeshwar hatole 14 june 2024

हिवरखेड येथील ट्रॅफीक म मध्ये कर्तव्यावरअसलेले पोलीस कर्मचारी धिरज साबळे हे बस स्टॅडवर आपले कर्त्यव्य बजावत असतांना त्याना विना नबंर प्लेट ची गाडी बगिच्या मधील अफरोज खाॅन जाकीरखाॅन यांचे जवळ अकोट रोड वर चालवताना दिसली त्यांनी गाडी ऊभी करुन गाडीचे कागद पञे मागीतले असता वरील आरोपीने ऊडवा ऊडवीची ऊत्तरे दिली

यावरुन पो काॅ धिरज साबळे यांनी आरोपीस हिवरखेड पोलीस स्टेशनला दुचाकी सह आरोपीला आणले असता पोलिसी चक्रे फिरवल्यानंतर गाडी चोरीची असल्याचे दिसून आले गाडीच्या चेसीस वरील नबंर वरुन माहीती घेतली असता ती बुलढाणा जिल्ह्यातील असल्याचे समजले यावरुन तामगाव पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या काटेल कोलद येथील अनिल गोविंद कूकडे यांची mh 28 be 3248 हि गाडी असून चोरट्यानी दिनांक 28/9/23 चोरी गेल्याचे पोलीस स्टेशन मधे एफ आय आर 0256 नोंद आहे

तसेच त्याच गावातील भगवान काशिराम कूकडे यांची mh 28 ay 2274 क्रमांकाची दुचाकी सुद्धा 2 एप्रिलपासून चोरी गेलेली आहे. त्याचप्रमाणे आणखी एक पळशी झाशी येथील गोपाल वसंत वाघ यांची गाडी mh 28 ay 7193 क्रमाकाची गाडी त्यांचे घराजवळून चोरी गेल्याची तक्रार दाखल असून सोनाळा पोलीस स्टेशन अतर्गत सूद्दा अशा चोरीच्या अनेक घटना घडल्या असून गाडी चोरीच्या घटनांमध्ये सदर आरोपी तर नाहीत ना?

असा संशय बळवलेला असून मध्यप्रदेश सिमा लगत असुन गोधन चोरी अवैध धंद्यांचे माहेर घर असलेल्या हिवरखेडात पोलिसी खाक्या दाखवल्यास अशा बिना नंबरप्लेट खोट्या नंबर प्लेट लावून चोरी करणाऱ्या चोरांवर जरब बसू शकतो..
हिवरखेड पोलीस स्टेशनला गवसलेली गाडी ट्रॅक्टरच्या आडून ऊभी केलेली होती चोरट्यानी वायरींगतोडून विना चावीने चोरून नेली..

सदर प्रकरणी हिवरखेडला आरोपी पकडला होता यावेळी ठाणेदार गोंवीद पाडंव, दूय्यम ठाणेदार श्रीराम जाधव यांनी कार्यवाई करीत गाडी व आरोपीला तामगाव पोलीस गुन्हा दाखल असल्यामुळे तामगाव पोलीस स्टेशनला स्टेशनला वर्ग केला आहे…