आ. सुलभा खोडके प्रमाणेच आ. प्रकाश भारसाकळेंना निलंबित कराकाँग्रेस प्रमाणेच भाजपा पक्षनिष्ठेला प्राधान्य देणार का ?
chanchal pitambarwale 25 January 2025
विधानसभा निवडणुका संपल्या परंतु पक्षांतर्गत हेवेदावे हे मात्र संपत नसून उलट कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे अकोला जिल्ह्यातील भाजप अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे त्यामध्ये विशेष करून अकोट मधील 11 पदाधिकाऱ्यांचे निलंबन केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच भडका उडाल्याचे मागील काळात दिसून आले विधानसभा निवडणुकीपूर्वीच महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा चंचल पितांबरवाले यांनी राजीनामा दिला होता तरीसुद्धा 11 पदाधिकाऱ्यांच्या यादीमध्ये नाव आल्यामुळे चंचल पितांबर वाले यांनी मध्यंतरी आक्रमक पवित्रा घेतला होता त्याचा चांगलाच भडका संपूर्ण जिल्ह्यात उडाला होता ही आग शांत होत नाही तोवर निलंबन यादी मधीलच दुसरे पदाधिकारी मंगेश चिखले हे सुद्धा आक्रमक झाले आहेत चिखले यांनी तर थेट आ.प्रकाश भारसाकळे यांनाच निलंबित करण्याची मागणी केली आहे
विधानसभा निवडणुका दरम्यान दर्यापूर मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार कॅप्टन अभिजीत आडसूळ असून सुद्धा युती धर्म न पाळता आ.भारसाकळे यांनी अपक्ष उमेदवार बुंदेले यांचा खुला प्रचार केला होता मतदारांना बुंदेलेकरिता मते मागितली होती त्याचे पुरावे सुद्धा मंगेश चिखले यांनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यासमोर सादर केले आहेत विधान परिषदेच्या निवडणुकीदरम्यान अमरावतीच्या आ.सुलभा खोडके यांच्यावर विरुद्ध पक्षाला मतदान केल्यामुळे पक्षविरोधी कटकारस्थान केल्याचा आरोप ठेवून काँग्रेस पक्षाने तात्काळ सहा वर्षासाठी खोडके हे विद्यमान आमदार असूनही निलंबित केले होते ध्येयधोरणे तत्त्वासाठी व कार्यकर्त्यांच्या भावनांची दखल घेऊन प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी आमदारांची संख्या कमी असून सुद्धा इतर कोणताही विचार न करता हा कठोर निर्णय घेतला होता त्यामुळे भाजप सुद्धा काँग्रेस प्रमाणेच पक्षनिष्ठेला प्राधान्य देणार की आमदारांच्या दबावात येऊन निष्ठावान कार्यकर्त्यांना असेच डावलत राहणार हे सुद्धा या माध्यमातून स्पष्ट होईल तसेच पक्षाच्या प्रचलित नियमानुसार कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता निलंबन करता येत नाही असे मत मंगेश चिखले यांनी व्यक्त केले आहे विधानसभेचे तिकीट मंगेश चिखले, प्रा.राजेंद्र पुंडकर, विशाल गणगणे, राजेश पाचडे, कनक कोटक, रणजीत पाटील व चंचल पितांबरवाले अशा दिग्गज नेत्यांनी पक्षाकडे मागितल्यामुळे आ.भारसाकळे यांना पक्षश्रेष्ठींनी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी करिता झुलवत ठेवले होते त्यावेळी आ. प्रकाश भारसाकळे यांच्या पायाखालची जमीन सरकली होती तसेच आ. भारसाकळे यांच्या निकटवर्तीयांचे सुद्धा धाबे दणाणले होते त्यामुळे भविष्यात हे एकनिष्ठ असलेले पदाधिकारी त्रासदायक ठरतील म्हणून त्याचाच वचपा काढून रस्त्यातील काटा काढण्याचे काम या निलंबनाच्या माध्यमातून केले आहे असे गंभीर आरोप सर्वच कार्यकर्त्यांनी केले आहेत
तसेच पदाधिकाऱ्यांची मानहानी करण्याच्या उद्देशाने हकालपट्टी हा शब्द वापरून आमचा खूप मोठा अपमान केल्याचे दुःख मंगेश चिखले यांनी बोलून दाखवले त्यामुळे हा सर्व प्रकार असह्य व वेदनादायी असल्याने आझाद मैदान मुंबई येथे उद्या पासून आमरण उपोषण करण्याचा टोकाचा निर्णय चिखले यांनी घेतला आहे ही लढाई वैयक्तिक नसून सर्वत्र महाराष्ट्रातील तळागळातील कार्यकर्त्यांची असून हजारोंच्या संख्येने उद्या मुंबई येथे आझाद मैदानावर उपस्थित राहण्याचे आवाहन सुद्धा मंगेश चिखले यांनी केले आहे त्यामुळे भाजप आ.भारसाकळे यांना निलंबित करणार की चिखले यांची मनधरणी करणार हे ऐतिहासिक असलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच महाराष्ट्राच्या जनतेसमोर येईल