INDIA NEWS

Press

“हम आपके है कौन” सभापती,तहसीलदार, एसडीओ, आमदार, खासदार,यांचा शेतकऱ्यांना सवाल..!

Raviraj 2 Sep 2024

नाफेड च्या भोंगळ कारभारामुळे अकोट मधील अधिकारी व पदाधिकारी यांनी केले हात वर..

अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेड ने अचानक ज्वारीची खरेदी बंद केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला. शेतकऱ्यांना मेसेज देऊनही नाफेड 31 शेतकऱ्यांचा ज्वारी वान खरेदी करू शकली नाही.नाफेडचे पोर्टल अचानक बंद झाल्यामुळे खरेदी-विक्रीचे सर्व व्यवहार ठप्प झाले. दि.३१ ऑगस्ट ही ज्वारी खरेदीची शेवटची तारीख असल्याने नाफेड कडे नोंदणीकृत असलेल्या शेतकऱ्यांना अकोट खरेदी विक्री यांच्याकडून ज्वारी घेऊन कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट येथे बोलवण्यात आले होते. परंतु शेवटच्या दिवशी नाफेड कडे एकाच वजन काट्याची व्यवस्था असल्यामुळे पोर्टल बंद होईपर्यंत 17 वाहनांमध्ये 31 शेतकऱ्यांचा माल हा नाफेड घेऊ शकली नाही व अचानक या शेतकऱ्यांना हा माल स्वीकारला जाणार नाही असे निर्देश दिले.

कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट..

कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट..

त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला की खरेदी करायची नव्हती तर आम्हाला मेसेज कशाला पाठवले भाडेतत्त्वावर ट्रॅक्टर व इतर वाहनांची व्यवस्था करून आम्हाला तीन दिवसापासून या कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कशासाठी उभे ठेवलेले आहे हा आर्थिक व अतिरिक्त भुर्दंड कुणी सोसावा असे संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केले. तीन ते चार दिवसापासून भाडेतत्त्वावर आणलेल्या वाहनांची भाडे हे दहा हजाराच्या वर झालेली आहेत..

नाफेड ने केली शेतकऱ्यांच्या मालांची अवहेलना शेतकरी आत्महत्येला प्रवृत्त..

त्यामुळे ज्वारी व नाफेड हे समीकरण शेतकऱ्यांच्या जीवावर बेतणार असल्याच्या प्रतिक्रिया जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांकडून उमटत आहेत..याकरिता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत पाचडे, खरेदी विक्रीचे अध्यक्ष हिदायत पटेल, विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे व तहसीलदार सुनील चव्हाण, एस डी ओ, लोणारकर यांच्याकडे सुद्धा शेतकऱ्यांनी न्याय मिळेल या आशेने धाव घेतली परंतु “हम आपके है कौन”आमचा याच्याशी काहीही संबंध नाही असे प्रत्युत्तर या सर्वांकडून शेतकऱ्यांना मिळाले त्यामुळे या निर्दयी भाजप सरकारमध्ये शेतकऱ्यांचा वाली कुणीच नाही.

शेतकऱ्यांची दखल घेताना शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाळे..

तसेच सहकार क्षेत्रातील नेत्यांचीही उदासीनता यावरून स्पष्ट होत असून निवडणुकांपुरताच वापर हा शेतकऱ्याचा केला जातो हे पुन्हा अधोरेखित झाले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish